Home राशीभविष्य या आठवड्यातलं ग्रहमान कोणत्या राशींना करणार मालामाल? वाचा आठवड्याचं राशिभविष्य…
राशीभविष्य

या आठवड्यातलं ग्रहमान कोणत्या राशींना करणार मालामाल? वाचा आठवड्याचं राशिभविष्य…

8
Weekly Horoscope September
Weekly Horoscope September

महिन्याची सुरुवातच गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात झाल्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. या उत्साहाच्या आठवड्यात तुमच्यावर गणेशासोबत कोणत्या ग्रहांची कृपा राहणार आहे, याबद्दल माहिती घेऊया… 

मेष- या आठवड्यात कोणताही ग्रहपालट नाही. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे अनुकूल घटना घडतील. ठरवलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्या तरुणांना सुसंधी चालून येतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मोठे निर्णय घेतले जातील. आठवड्याच्या उत्तरार्धात इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. मित्र परिवाराबरोबर मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील आठवड्याचा उत्तरार्ध अतिशय आनंदात जाईल. 

शुभ दिनांक – 7, 8

वृषभ- आपल्या राशीतून व्ययेश मंगळाचे, तर अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तेव्हा महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांना सहकार्य करावे लागेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कोणालाही जामीन राहू नका. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सहकार्याने काही कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. नोकरीत भरती बदलीचे योग संभवतात. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. 

शुभ दिनांक – 11

मिथुन- राशीच्या सप्तमस्थानातून धनेश चंद्राचे भ्रमण होत आहे. भागीदारी व्यवसायात मनापासून कष्ट घेतल्यास असामान्य यशप्राप्ती होईल. दिनांक 7, 8 रोजी प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या विचारशक्तीच्या जोरावर मोठे निर्णय यशस्वी करता येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. तरुणांना नोकरीतरुणांना नोकरीच्या सुसंधी लाभतील. सामाजिक कार्यात थोडी अलिप्तता ठेवावी म्हणजे अकारण शत्रुत्व येणार नाही. हितशत्रूंच्या कारवायांचा उत्तरार्धात त्रास जाणवेल. अध्यात्मिक उन्नती होईल. रेंगाळलेली सरकारी कामे आत्मविश्वासाने पार पाडाल. 

शुभ दिनांक – 9, 10

कर्क- आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम केले जाईल, त्यामुळे आपण वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. धनस्थानातील रवी, शुक्र आपली आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळतील. आपल्या बुद्धीचातुर्याने आणि मृदू बोलण्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. संतती सौख्य लाभेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगला फायदा होईल. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घ्याल. पत प्रतिष्ठा उंचावेल. 

शुभ दिनांक – 10, 11

सिंह- आपल्या राशीतून रवी शुक्राचे भ्रमण होत आहे, तर पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. संततीस शिक्षणासाठी परदेश गमनाचे योग येतील. संतती संबंधीत सुवार्ता कानी येतील. वाहन वास्तू खरेदीचे योग येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक जीवनात आपला शब्द परवलीचा शब्द मानला जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग येतील किंवा एखादी अध्यात्मिक मार्गातील व्यक्ती भेटेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. 

शुभ दिनांक – 5, 6

कन्या- आपल्या राशीतून बुधाचे तर सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे, तर वेळ स्थानातून रवी शुक्राचे भ्रमण होत आहे. उंची वस्त्रालंकाराची खरेदी केली जाईल. गृह सुशोभीकरणासाठी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील. मातृसौख्य लाभेल. संतती संबंधीच्या समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्याने हाती पैसा येईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने भरभराट होण्यास अनुकूल कालावधी आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. 

शुभ दिनांक – 11

तूळ- आठवड्याच्या सुरुवातीलाच धाडसी कार्य केले जाईल. कामानिमित्त प्रवास घडतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनस्वास्थ्य लाभेल. आपल्या संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होण्यास या आठवड्यातील ग्रहमान अनुकूल आहे. उत्तरार्धात मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. राजकारण समाजकारण या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींच्या हातून चांगली कामगिरी पार पाडली जाईल. विरोधकांच्या कारवायांवर मात कराल.

शुभ दिनांक – 9, 10

वृश्चिक- आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तेव्हा आर्थिक कोंडी नक्कीच सुटणार आहे. परंतु एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, तेव्हा दाम करी काम या उक्तीला विसरून चालणार नाही. योग्य व्यक्तीच्या सहकार्याने आपली कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. संतती स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. 

शुभ दिनांक 11

धनु- आपल्या राशीतून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. धाडसी नेतृत्व केले जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. सरकार दरबारी खोळंबून राहिलेली कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता होऊन हाती पैसा येईल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. व्यवसाय उद्योगात नवीन उपक्रम राबविले जातील. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. परदेशस्थ भावंडांशी गाठीभेटी होतील. कुटुंबीयांसोबत धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. गृहसुशोभीकरणासाठी वेळ दिला जाईल. 

शुभ दिनांक – 5, 6.

मकर- आठवड्याच्या सुरुवातीलाच कामानिमित्त प्रवास घडतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाचे निर्णयांचे अंमलबजावणी करताना अत्यंत विचारपूर्वक करणे आवश्यकयक आहे. मानसिक तणाव जाणवण्याची शक्यता राहते. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. स्थावर मालमत्तेसंबंधीची  कामे मार्गी लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरीत अनपेक्षित बदल घडतील. विरोधकांच्या कारवायांवर मोठ्या जीकीरीने मात करावी लागेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संत सज्जनांचा सहवास मिळेल. 

शुभ दिनांक – 7, 8.

कुंभ- आपली जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असाल, तर त्यात यश संभवते. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. भविष्यासाठी गुंतवणूक केली जाईल. मात्र शेअर्समध्ये गुंतवणूक टाळावी. व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल असल्यामुळे मोठे व्यावसायिक निर्णय घेतले जातील. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी त्यांचा तपशील नजरे खालून घालणे अतिशय आवश्यक आहे. योग्य रीतीने घेतलेले निर्णय आपला भाग्योदय करणारे राहतील. उत्तरार्धात अनपेक्षित धनप्राप्ती होईल. 

शुभ दिनांक – 11

मीन- आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसायात मनाजोग्या घटना घडतील. नवीन व्यावसायिक प्रकल्प राबवले जातील.  वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मित्र परिवारात कोणतेही आर्थिक व्यवहार टाळावेत. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. संततीस स्पर्धा परीक्षेतून यश लाभेल. राशीतील गुरु आपल्याला अनेक संधी उपलब्ध करून देईल. आपल्या हातून धार्मिक विषयांवर लेखन केले जाईल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. 

शुभ दिनांक – 6, 7.

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Navpancham Yoga
राशीभविष्यलाईफ स्टाईल

Navpancham Yoga : नवपंचम राजयोगाच्या निमित्ताने ‘या’ राशींना मिळणार मोठा लाभ

अतिशय जुन्या काळापासून भारतामध्ये ज्योतिषशास्त्र (Astrology) प्रचलित आहे. आकाशात असणारे ग्रह, तारे...

Weekly Horoscope
राशीभविष्य

‘या’ राशींना राजकारणात मिळेल अनपेक्षितपणे संधी

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....

Weekly Horoscope
राशीभविष्य

जुलै महिन्याचा पहिला आठवडा ‘या’ राशीसाठी असेल खास

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....

Weekly Horoscope
राशीभविष्य

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....