Home गाजावाजा स्पेशल नकाशा लेखक व भूगोलतज्ज्ञ – सेबॅस्टियन काबो (१४७४-१५५७)
गाजावाजा स्पेशलसामाजिक

नकाशा लेखक व भूगोलतज्ज्ञ – सेबॅस्टियन काबो (१४७४-१५५७)

8

नकाशा लेखक व भूगोलतज्ज्ञ – सेबॅस्टियन काबो (१४७४-१५५७)

प्रबोधन काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांची आखणी करणारा प्रमुख दर्यावर्दी, अत्यंत रोमांचक दीर्घायुष्य लाभलेला धाडसी खलाशी, नावाजलेला नकाशालेखक व भूगोलतज्ज्ञ म्हणून सेबॅस्टियन काबो प्रसिद्ध आहे.

सेबस्टियन काबो याचा जन्म व्हेनिस अथवा ब्रिस्टॉल इथे झाला असावा. तो आपले वडील – जॉन काबो यांच्या दोन्ही मोहिमांमध्ये सामील झाला होता. सेबॅस्टियन नकाशा बनवण्याच्या तंत्रात चांगलाच वाकबगार होता. इ. स. १५१२ साली त्याने इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याच्यासाठी गॅस्कोनी व ग्युइने यांचे नकाशे काढले होते. याच वर्षी तो स्पेनचा राजा पाचवा फर्डिनांड याच्या दरबारात रुजू झाला. फर्डिनांडच्या मृत्यूनंतर तो इंग्लंडला परत आला. १५१९ साली त्याची पायलट – मेजर या पदावर नेमणूक झाली. पाचव्या चार्लस् राजासाठी १५२६ साली त्याने स्वतः ब्राझीलची मोहीम हाती घेतली. ही मोहीम चार वर्ष चालू होती. त्याने दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर सर्वेक्षण केलं व उत्तम नकाशे तयार केले.

तो मॅगेलान सामुद्रधुनीपर्यंत गेला खरा; पण ती ओलांडून पलीकडे पॅसिफिक महासागरात शिरला नाही. या मोहिमेमध्ये भेटलेल्या लोकांकडून तेथील अपार संपत्तीचं वर्णन ऐकून तो ला प्लाटा या नदीच्या मुखातून आत शिरला. त्याने पैशांचा गैरवापर केला आणि नवीन भागात वसाहती स्थापन केल्या नाहीत, असे आरोप ठेवून त्याला १५३० साली तुरुंगात टाकण्यात आलं व १५३१ साली आफ्रिकेला हाकलून देण्यात आलं. पुढे तीन वर्षांनी तो स्पेनला आला व लवकरच इंग्लंडला परतला. सहाव्या एडवर्ड राजाने सेबेस्टियनला बोलावून त्याची ‘इन्स्पेक्टर ऑफ नेव्ही’ या उच्चपदावर नेमणूक केली.

सेबॅस्टियन एक अनुभवी दर्यावर्दी व भूगोलतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला. १५४४ साली त्याने जगाचा त्या काळातील एक उत्कृष्ट नकाशा तयार केला. पुढे ऐंशीच्या घरात गेलेला सेबॅस्टियन नवनवीन धाडसांना प्रोत्साहन देत असे. १५५१ मध्ये त्याने धाडसी दर्यावर्दी लोकांची एक कंपनीदेखील स्थापन केली होती. इंग्लंड व रशियादरम्यान व्यापारी देवाणघेवाण सुरू करण्याचं श्रेय सेबॅस्टियन काबोने सुरू केलेल्या या कंपनीकडेच जातं.

क फॅक्टस टीम

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....