सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा सुरु आहे. मोहम्मद बिन सलमान व्हिजन 2030 वर काम करत आहेत. त्या अंतर्गत त्यांना सौदी अरेबियाला आधुनिक आणि उदारमतवादी देश करायचे आहे. यासाठी देशाला धर्मांधतेपासून मुक्त करण्याचे उद्दीष्ट प्रिन्स मोहम्मद यांनी ठेवले आहे. सौदी अरेबियामधील शालेय पुस्तकांमध्ये बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्या अनुषंगानं प्रिन्स मोहम्मद यांनी सौदी अरेबियातील धार्मिक कट्टरता कमी करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले आहे. यामुळे सौदी अरेबिया, इस्लामिक शरिया कायद्यांना बदलणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. आम्ही सौदी अरेबियातून इस्लामिक अतिरेकीपणा संपवू, असे वक्तव्य सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एका मुलाखती दरम्यान केल्यामुळे सौदीमध्ये इस्लामिक कायदा बदलणार का, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. सौदी अरेबियाची सत्ता हाती घेतल्यावर प्रिन्स मोहम्मद यांनी जे बदल करण्यास सुरुवात केली, त्याला तेथील कट्टरवाद्यांनी विरोध केला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करीत प्रिन्स मोहम्मद यांनी देशापुढे व्हिजन 2030 ठेवले आहे. (Mohammed Bin Salman)

यासाठी त्यांनी सौदीमधील महिलांना स्वातंत्र्य देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. आता सौदीमधील महिला स्वतंत्रपणे गाडी चालवू शकतात. तसेच बदलत्या सौदीचे प्रतिक म्हणून प्रसारित झालेल्या जाहिरातीमध्ये सौदीमधील मुलींना फुटबॉल खेळतांना दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीवरही कट्टरवाद्यांनी टिका केली होती. मात्र जगासोबत चालणे गरजेचे असल्याचे सांगत प्रिन्स मोहम्मद यांनी या जाहिरातीची आणि त्यामागील विचाराची पाठराखण केली. आता याच प्रिन्स मोहम्मद यांच्या आणखी एका वक्तव्यावर कट्टरवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक प्रिन्स मोहम्मद हे सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करत आहेत. त्यासाठी त्यांनी सौदीमध्ये परदेशी पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी नियोम हा प्रकल्प उभारण्यास सुरावात केली आहे. यात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकही अपेक्षित आहे. यासाठी त्यांनी व्हिजन 2030 ची आखणी केली आहे. (International News)
यामध्ये पर्यटन, मनोरंजन आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परदेशी कंपन्यांना त्यांनी आमंत्रण दिले आहे. असे करतांना आलेल्या परदेशी नागरिकांना कायद्यात सूट देणे गरजेचे असल्याचे मत प्रिन्स मोहम्मद यांचे आहे. हे बदल नव्या पिढीला समजणे गरजेचे असल्याचे सांगून प्रिन्स मोहम्मद यांनी सौदी अरेबियाच्या शालेय पुस्तकांमध्ये अनेक बदल करुन घेतले आहेत. त्यातून सौदी अरेबियाची कट्टरपंथी इस्लामिक देश ही प्रतिमा दूर करून उदारमतवादी आणि आधुनिक देश, अशी करण्याचे उद्दीष्ट प्रिन्स मोहम्मद यांचे आहे. याबाबत त्यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आल्यावर “कुराण नेहमीच अर्थ लावण्यासाठी खुले आहे.” असे वक्तव्य प्रिन्स मोहम्मद यांनी केले आहे. प्रिन्सच्या या विधानामुळे कट्टरवाद्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. कारण इस्लामिक विद्वानांच्या मते, कुराणात जे काही सांगितले आहे तेच अंतिम सत्य आहे आणि कोणालाही त्याचा स्वतःच्या पद्धतीने अर्थ लावण्याची परवानगी नाही. ही नाराजी असतांना प्रिन्स मोहम्मद यांनी सौदी अरेबियातील मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत नियम बनवल्यामुळे अधिक नाराजी निर्माण झाली आहे. (Mohammed Bin Salman)
===============
हे देखील वाचा : America : अमेरिकेत पुन्हा आगीचे तांडव !
America : अमेरिकेत पुन्हा आगीचे तांडव !
===============
या सर्वांकडू दुर्लक्ष करीत प्रिन्स आपल्या योजनांवर ठाम आहेत. त्यांच्या मते, लोकांनी त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या समजुतीनुसार हदीसचे विश्लेषण केले आहे. या सर्वांचा फायदा दहशतवादी, अतिरेकी आणि कट्टरपंथी घेत आहेत. यातून इस्लाम बाबत पाश्चात्य देशांचे मत वाईट होत आहे. त्यामुळे कुराणचा नेमका अर्थ काय याचे दस्तऐवजीकरण केले पाहिजे, असे मत प्रिन्स मोहम्मद यांनी व्यक्त केले आहे. प्रिन्स मोहम्मद यांच्या या वक्तव्यावर कट्टरपंथीयांनी नाराजी व्यक्त केली असली तरी सौदी अरेबियातील सुधारकांनी त्याचे स्वागत केले आहे. अतिरेकीपणाला आळा घालण्यासाठी आणि उदारमतवादाकडे वाटचाल करण्यासाठी अशा विचारांची गरज आहे, शिवाय आधुनिक प्रशासनाशी सुसंगत राहण्यासाठी प्रिन्स मोहम्मद यांनी हे धाडसी पाऊल टाकले आहे. यातून सौदी अरेबिया जगात विशिष्ट स्थान बनवू शकेल या शब्दात सुधारणावादी विचारवंतांनी प्रिन्स मोहम्मद यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. (International News)
सई बने
- America
- BJP
- china
- congress
- eknath shinde
- Entertainment
- extremists
- india
- information
- International news
- Islamic
- Islamic Sharia
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Oil
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Prince Mohammed bin Salman
- radicals
- Saudi Arabia
- Social News
- Social Updates
- Technology
- Terrorists
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Tourism
- Uddhav Thackery
- राजकारण