Home प्रेस रिलीझ प्रसिद्ध अभिनेता समीर शर्माची आत्महत्या
प्रेस रिलीझमनोरंजनसामाजिक

प्रसिद्ध अभिनेता समीर शर्माची आत्महत्या

6

कलाविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता समीर शर्मानं मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ४४ वर्षीय समीर मुंबईतील मालाड पश्चिमस्थित अंहिसा मार्गावरील नेहा सीएचएस या बिल्डिंगमध्ये वास्तव्याला होता.. घरातील किचनच्या छताला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरनं यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या इमारतीत फ्लॅट भाड्यानं घेतला होता. रात्र ड्यटुीला असललेल्या सोसायटीच्या चौकीदारानं समीरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेहाची अवस्था पाहता समीरनं दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

समीरनं छोट्या पडद्यावरील कहानी घर घर की, क्योंकी की सास भी कभी बहू थी, ज्योती, ये रिश्ते हैं प्यार के या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्याच्या आत्मनहत्येचं कारण अजून कळू शकलं नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...