Home गाजावाजा स्पेशल ‘या’ परिवारातील सर्व सदस्यांची एक समानच नावे, ऐकून व्हाल हैराण
गाजावाजा स्पेशल

‘या’ परिवारातील सर्व सदस्यांची एक समानच नावे, ऐकून व्हाल हैराण

9
Same names in family
Same names in family

प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही तरी नाव असते आणि मृत्यूवेळी सुद्धा तेच नाव राहते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्यांच्या नावावरुन केली जाते. जसे आधार कार्ड असो किंवा पासपोर्ट, नावाशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्ही असे ही पाहिले असेल की, आता मुलांची युनिक नावं ठेवली जातात.काही लोक आपल्या मुलांच्या नावापुढे आपले नाव ही जोडतात. तर काहीजण आपल्या मुलाचे नाव हे युनिक जरी असले तरी ते अर्थपूर्ण असावे याचा ही विचार करतात. शॉर्ट अॅन्ड स्विट अशा नावांचा सध्या ट्रेंन्ड सुरु आहे. पण सध्या अशा एका परिवाराची चर्चा जगभरात होत आहे ज्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे एकच नाव आहे. हे खरंतर हैराण करणारी गोष्ट आहे. पण हे खरं आहे. यामागील कारण सुद्धा अगदी विचित्र आहे. (Same names in family)

द सनच्या वृत्तानुसार, अलेक्झांड्रिया नावाच्या महिलेने अलीकडेच टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे , ज्यामध्ये तिने तिचे, तिच्या प्रियकराचे आणि तिच्या तीन मुलांचे नाव काय आहे हे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी हेही सांगितले आहे की, कोणत्या विचाराने त्यांनी संपूर्ण कुटुंबाचे एकच नाव ठेवले आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

Same names in family
Same names in family

अलेक्झांड्रियाच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न झालेले नाही, परंतु ती तीन मुलांची आई आहे आणि चौथ्या मुलाला जन्म देणार आहे. तिचा प्रियकरही तिच्यासोबत राहतो. ती सांगते की जेव्हा ती तिच्या प्रियकराला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिला संभाषणात कळले की त्यांच्या दोन्ही नावांचे मधले नाव एकच आहे. सुरुवातीला दोघांना वाटलं की हा थट्टा असेल, पण त्यानंतर एकमेकांचा ड्रायव्हिंग लायसन्स पाहून ते चक्रावून गेले. खरं तर, त्याचं मधलं नाव एकच होतं आणि ते म्हणजे लॉरेन. (Same names in family)

हे देखील वाचा- Benadryl Challenge मुळे युएसमधील १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

अलेक्झांड्रियाने पुढे सांगितले की तिने आणि तिच्या प्रियकराने गमतीने ठरवले होते की ते त्यांच्या भावी मुलांसाठी तेच नाव ठेवतील आणि ते नाव लॉरेन आहे. अलेक्झांड्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओही शेअर केला असून त्यामध्ये तिने यामध्ये याचे कारण ही सांगितले आहे. या व्यतिरिक्त अलेक्झांड्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या प्रेग्नेंसीचा प्रवास कसा होता त्याबद्दलचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केले आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....