Home मनोरंजन वाढदिवस स्पेशल: नागा चैतन्यसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री समंथा ‘या’ टॉपच्या अभिनेत्याला करत होती डेट 
मनोरंजन

वाढदिवस स्पेशल: नागा चैतन्यसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री समंथा ‘या’ टॉपच्या अभिनेत्याला करत होती डेट 

7
samantha ruth prabhu
samantha ruth prabhu

सध्या साऊथ सिनेमे आणि साऊथ कलाकार या दोघांनाही सोनेरी दिवस आल्याचे चित्र आहे. कारण या चित्रपटांनी मिळवलेले तुफान यश आणि बक्कळ पैसा सर्वश्रुत आहे. यासोबतच चित्रपटांनी कलाकारांना देखील पॅन इंडिया ओळख मिळवून दिली. पूर्वी फक्त दक्षिणेतच प्रसिद्ध आणि लोकप्रिय होणारे हे सिनेमे आणि कलाकार आज संपूर्ण भारतात पर्यायाने संपूर्ण जगात ओळखले जातात. साऊथ चित्रपटांमधील एक मोठे नाव असलेली अभिनेत्री म्हणजे समंथा (samantha ruth prabhu). समंथा मधल्या काही काळापासून तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच गाजत आहे. मात्र तिने अगदी शून्यातून तिचे विश्व उभारले आणि हे आभाळाएवढे यश संपादन केले. आज (२८ एप्रिल) रोजी समंथा तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल. 

तामिळ इंडस्ट्रीसोबतच समंथाने संपूर्ण दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज समंथा (samantha ruth prabhu) एक टॉपची अभिनेत्री म्हणून जरी नावारूपास आली असली तरी तिच्यासाठी हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी तिची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. पार्ट टाईम नोकरी करत ती तिच्या घराला हातभार लावत होती. त्यातच तिला कोणीतरी मॉडलिंगचा सल्ला दिला आणि तिने मॉडलिंगमध्ये नशीब अजमावायचे ठरवले. मॉडेलिंग करत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक एमआर रवी वरमन यांची समंथावर नजर पडली आणि त्यांनी तिला पहिल्यांदा चित्रपटांमध्ये संधी दिली. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे समंथाने कधीच मागे वळून पहिले नाही. 

अभिनय क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना समंथाच्या (samantha ruth prabhu) वैयक्तिक आयुष्यात देखील वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. अशीच एक तिच्या आयुष्यातील सर्वात गाजलेली घटना म्हणजे समंथा आणि ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ यांचे रिलेशन. नागा चैतन्य आणि समंथा यांचे लग्न आणि त्यांचा घटस्फोट याबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र नागा चैतन्याच्या आधी देखील समंथाच्या आयुष्यात प्रेमाचा बहर आला होता. हो बऱ्याच लोकांना याबद्दल कल्पना नसेल मात्र एक काळ होता जेव्हा समंथा आणि सिद्धार्थ यांचे रिलेशन खूपच गाजले. जवळपास अडीच वर्ष हे दोघं नात्यात होते आणि त्यानंतर २०१५ साली त्यांनी ब्रेकअप केले. 

samantha ruth prabhu and siddharth

सिद्धार्थ आणि समंथा (samantha ruth prabhu) यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जायचे. विविध कार्यक्रमांना त्यांनी सोबत हजेरी लावली. ते पाहून त्यांच्या रिलेशनच्या बातम्या मीडियामध्ये येण्यास सुरुवात झाली आणि काही काळाने समंथा आणि सिद्धार्थ देखील सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त एकत्र दिसू लागले, एकमेकांबद्दल बोलू लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार तर दोघे लिव्ह इनमध्ये देखील राहत होते. मात्र काही काळाने त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. 

समंथाला सिद्धार्थसोबत लग्न करून सेटल व्हायचे होते. मात्र सिद्धार्थचे स्वप्न खूपच वेगळे होते. याशिवाय इतर मुलींसोबत देखील त्याच्या जवळकीच्या बातम्या समंथाला आवडत नव्हत्या. म्हणूनच त्या दोघांनी ब्रेकअप केले. काही रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ श्रुती हसनला डेट करू लागल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आला होता.

samantha ruth prabhu and siddharth

पुढे समंथाने अभिनेता नागा चैतन्यला डेट करायला सुरुवात केली. काही काळ त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ साली लग्न केले. अतिशय भव्य आणि राजेशाही थाटात त्यांच्या विवाह संपन्न झाला. मात्र दुर्दैवाने त्यांच्या या नात्यात देखील काही काळाने कटुता आली आणि २०२१ साली समंथाने ती नागापासून वेगळी होत असल्याचे जाहीर केले आणि दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण अजूनही समोर आले नसले तरी समंथा (samantha ruth prabhu) आणि नागा यांनी वैयक्तिक कारण सांगत घटस्फोट घेतला. 

=====

हे देखील वाचा – तुझ्या मातृभाषेत तयार होणाऱ्या चित्रपटांना हिंदीमध्ये डब करून का प्रदर्शित करतो?, अजयचा किच्चा सुदीपला सवाल

=====

समंथाने साऊथसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे. २०२१ आलेल्या ‘फॅमिली मॅन २’मध्ये तिने तिची भूमिका इतक्या ताकदीने निभावली की सर्वत्र फक्त तिच्याच भूमिकांची चर्चा होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमातील तिच्या ‘ऊ अंटावा’ या गाण्याने तर अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या समंथा तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असून आगामी काळात ती अनेक नवनवीन आणि मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...