काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे दुरावले आहेत. या दोन देशांमधील व्यापारही थांबला आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात गरजेच्या वस्तू पाकिस्तानात पाठवल्या जात होत्या, त्या आता थांबल्या आहेत. सोबतच पाकिस्तानमधून भारतात येणा-या वस्तूही बंद आहेत. ही आयात-निर्यात थांबल्यानं पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे. भारतावर याचा फारसा परिणाम होणार नसला तरी भारतातील घराघरामध्ये उपवासाच्या दरम्यान वापरण्यात येणा-या सैंधव मीठाचा पुरवठा मात्र कमी होणार आहे. कारण भारतात येणारे बहुतांशी सैंधव मीठ हे पाकिस्तानमधून येते. आता या सैंधव मीठाची आयातही बंद होणार असल्यामुळे उपवासाच्या पदार्थांत वापरण्यात येणा-या सैंधव मीठाची किंमत वाढणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांवरील हल्ल्याचा परिणाम व्यापारावरही झाला आहे. भारतातून भाज्यांपासून औषधांपर्यंत गरजेच्या वस्तू पाकिस्तानला जातात, त्या बंद झाल्या आहेत. (Pakistan)

पण पाकिस्तानमधून येणारे सैंधव मीठही आता बंद होणार आहे. जगभरात सैंधव मीठाची सर्वात मोठी खाण ही पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानची खेवरा मिठाची खाण ही केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर संपूर्ण जगाला सैंधव मीठाचा पुरवठा करते. ही खाण सुमारे 2000 वर्षे जुनी असून येथून निघणारे मीठ उच्च दर्जाचे मानले जाते. याच मीठाच्या जोरावर पाकिस्तान जगभरातून दरवर्षी करोडोंचे उत्पादन करतो. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातील खेवरा ही सैंधव मीठाची खाण पाकिस्तानचे प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे. या खेवरा मिठाच्या खाणीत असलेले जुने खडक हे रॉक सॉल्ट म्हणून ओळखले जातात. सेंध मीठ, लाहोरी मीठ, हिमालयीन मीठ किंवा गुलाबी मीठ म्हणून या मीठाला ओळखले जाते. एकप्रकारच्या खनिजापासून तयार झालेले हे मीठ आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पाकिस्तानच्या इस्लामाबादपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या या खाणी बघण्यासाठीही दरवर्षी हजारो पर्यटक या भागात जातात. (Latest News)
2000 हजार वर्ष जुन्या असलेल्या या खेवरा खाणीतून दरवर्षी सुमारे 4.5 लाख टन खडक मीठ काढले जाते. यातील सुमारे 2.5 लाख टन मीठ रासायनिक उद्योगांना विकले जाते. जगभरातील रासायनिक कंपन्या या सैंधव मीठासाठी पाकिस्तानवर अवलंबून आहेत. पाकिस्तानात हे सैंधव मीठ अवघ्या 2 ते 3 रुपयांना किलो, या दरानं मिळते. तर भारतात आल्यावर त्याची किंमत प्रती किलो, 50 ते 100 रुपये आहे. भारतात सैंधव मीठाचा वापर बहुतांशी उपवासाच्या पदार्थांमध्ये होतो. भारत इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानमधून सर्वात जास्त सैंधव मीठ खरेदी करतो. गेल्या 8 वर्षांत भारतात सुमारे 10 हजार टन सैंधव मीठ पाकिस्तानमधून आयात करण्यात आले आहे. या खाणी पाकिस्तानमध्ये कशा तयार झाल्या याची कथा थेट सिंध संस्कृतीच्या उगमापासून सांगितली जाते. (Pakistan)

सिंधू नदीच्या काठावर विकसित झालेल्या सिंधू संस्कृतीला विकसित केले त्यावर स्थायिक झालेल्या आर्यांनी. आर्य संस्कृतीमध्ये विधी, पूजा, उपवास यांचे खूप मोठे महत्त्व होते. ही मंडळी स्वयंपाकासाठी फक्त सिंधू नदीच्या काठावर आढळणारे स्वच्छ मीठ वापरत असत. हे मीठ थेट हिमालयाच्या हिमनद्यांमधून आल्याची माहिती आहे. हाच भाग आता पाकिस्तानमध्ये आहे. शेकडो वर्षापासून या सैंधव मीठाच्या खाणीतून मीठ काढले जात आहे. त्यामुळे या खाणीही आता नाहीशा होत आहेत. मात्र या मोकळ्या खाणी आता पर्यटकांना आकर्षित करत असून या खाणींमध्ये सध्या पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. (Latest News)
========
हे देखील वाचा : Maharashtra: असं मिळालं आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव
Malcha Mahal : बेगम विलायतचा आत्मा असलेल्या हॉन्टेड ‘मालचा महल’
========
सैंधव मीठ हे सोडियम क्लोराईडच्या क्रिस्टल स्टोनच्या स्वरूपात आढळणारे एक खनिज पदार्थ आहे. हे मीठ पांढ-या रंगाचे असते, शिवाय याचा रंग हलका निळा, गडद निळा, जांभळा, गुलाबी, नारिंगी, पिवळा किंवा तपकिरी रंगाचेही असते. सिंध प्रांतात मिळणारे मीठ म्हणजे सिंध मीठ असे त्याचे नामकरण झाले. नंतर काळाच्या ओघात या मीठाला सैंधव मीठ म्हणून ओळख मिळाली. हेच सैंधव मीठ पाकिस्तानमधून भारतात मोठ्या प्रमाणात येते. आता पाकिस्तानमधून येणारी सैंधव मीठाची आयात थांबली तर भारत, मलेशिया, इराण मधून सैंधव मीठ आणण्याची शक्यता आहे. या देशातही सैंधव मीठाच्या खाणी आहेत. (Pakistan)
सई बने
- America
- BJP
- Blue
- brown
- china
- congress
- cricket
- dark blue
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- Himalayan salt
- india
- information
- International news
- iran
- Jhelum
- Kashmir
- Lahori salt
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Malaysia
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- orange
- pahalgam
- Pakistan
- pink
- pink salt
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- purple
- Rock Salt
- saindhava salt
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- yellow
- राजकारण