Home प्रेस रिलीझ ‘रूप नगर के चीते’ लवकरच झळकमार रुपरे पडद्यावर
प्रेस रिलीझ

‘रूप नगर के चीते’ लवकरच झळकमार रुपरे पडद्यावर

7
Roop Nagar Ke Cheetey

कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे … ‘रूप नगर के चीते’! (Roop Nagar Ke Cheetey)

दचकू नका..! नाव जरी हिंदी असलं तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ आपल्या भेटीला येतील, त्यापूर्वी या चित्रपटाचं एक धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. चिखलात माखलेले, कशाचीही पर्वा न करता, आपल्याच मस्तीत असलेले दोन जिगरी दोस्त आपल्याला त्यात दिसताहेत. ते कोण आहेत? त्याची ओळख लवकरच होणार आहे.

एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली बॉलीवूड मधील संगीतकार मनन शाह यांनी ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी हा चित्रपट साकारला आहे.

====

हे देखील वाचा: ‘वाय’ या ‘मल्टि-स्टारर’ थरारपटाचे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला

====

सध्याच्या जगात मैत्रीची व्याख्या जरी तीच असली तरी तीचं स्वरुप बदलताना दिसतंय. या चित्रपटातूनही मैत्रीमधला वेगळा विचार आपल्या समोर येणार आहे. दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत. चित्रपटातील कलाकार आणि इतर तपशीलांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...