BGT (बिजीटी) म्हणजेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची एशेस सिरीजच म्हणावी लागेल. दोन्ही टिम्सच्या खेळाडूंमध्ये तोच गेम, तेच अग्ग्रेशन, स्लेजिंग, तितकीच फॅन फॉलोईंग आणि बरच काही… १९९६ ला ही सिरीज सुरू झाली आणि आताचं हे १७वं एडिशन… यामध्ये इंडिया १० सिरीज जिंकली, ऑस्ट्रेलियाने पाच वेळा ट्रॉफी मारली तर एकदा सिरीज ड्रॉ झाली. तेव्हापासून आतापर्यंत पहाल तर, ही बिजीटी ट्रॉफी इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या फॅन्ससाठी एक क्रिकेट मास्टरपिसच राहिली आहे. एकही सिरीज सिनेमापेक्षा कमी नव्हती. Absolute Cinema !
त्यात कित्येक रायव्हलरीज आपल्याला पाहायला मिळाल्या. पण यंदाची सिरीज मात्र एकाच प्लेयरने गाजवली, तो म्हणजे आपला बुम बुम जसप्रीत बुमराह… (Jasprit Bumrah) आपल्या जबरदस्त बॉलिंगने कांगारूंच्या दांड्या उडवणारा बुमराह इंडियाचा हुकुमी एक्का ठरत आहे. त्याचं बॉलिंगचं एग्रेशन बॅटिंगमध्ये आणि कॅप्टनसीमध्येही पाहायला मिळालं. पण यामुळे भारताचा फुलटाइम कॅप्टन (Rohit Sharma) ची कॅप्टनसी जाते की काय, असच सर्वांना वाटू लागलंय. इतकंच काय तर शेवटच्या मॅचमध्ये थेट कॅप्टन शर्मालाच डच्चू मिळाला. त्यामुळे आता भारताच्या टेस्टची जबाबदारी पुढे कोण सांभाळतय, जाणून घेऊ.

सुरुवातीला आपण बुमराहच्या बिजीटीमधल्या एकंदरीत परफॉर्मन्सवर नजर टाकूया. बुमराह एकाच टेस्ट सिरीजमध्ये परदेशात इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर ठरला आहे. बुमराहने आतापर्यंत सिरीजमध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने बिशनसिंग बेदी यांचा १९७८ चा ३० विकेट्सचा रेकॉर्ड मोडून हा पराक्रम करून दाखवला आहे. SCG टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी बुमराहने उस्मान ख्वाजाला आपला बळी बनवलं होतं यानंतर दुसऱ्या दिवशी मार्नस लाबूशेनला तंबूत पाठवत त्याने हा रेकॉर्ड नोंदवला आहे. पहिलं सेशन किंवा दुसरं सेशन असो, पहिली इनिंग किंवा दुसरी इनिंग असो, बुमराहच्या पेस आणि यॉर्करची जादू सगळीकडेच पाहायला मिळाली. भारताचा स्टार बॉलर मोहम्मद शमीच्या नसल्यामुळे बुमराहला इतर वेगवान फास्ट बॉलर्सची हवी तशी साथ मिळाली नाही. परंतु त्याने एकट्याने कांगारूंना गुडघे टेकायला भाग पाडलं.
यासोबतच तो कॅलेंडर इअरमध्ये म्हणजेच २०२४ या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय बॉलरसुद्धा ठरला आहे. त्याने वर्षभरात अवघ्या १४.९२ च्या एव्हरेजने ७१ विकेट्स काढल्या आहेत. चौथ्या टेस्टमध्ये TRAVIS HEAD च्या दांड्या गुल करून तो २०० विकेट्स घेणारा 12वा भारतीय बॉलर ठरला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारताचे तीनच बॉलर hatट्रिक घेऊ शकले आहेत, बूमराह त्यापैकीच एक आहे. याशिवाय आयसीसी टेस्ट rankingमध्ये सर्वात जास्त म्हणजेच ९०७ points मिळवणारा भारतीय तो ठरला आहे. हा रेकॉर्ड आतापर्यंत रवि अश्विनच्या नावावर होता. बीजीटीमध्ये बुमराह असा चमकला की तो आता भारतीय क्रिकेटचा ब्रांड झाला आहे. (Sports update)

आता बुमराहचे टेस्ट कॅप्टनसीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तो कपिल देव यांच्यानंतर टेस्टमध्ये कॅप्टन झालेला दुसराच बॉलर आहे. २०२२ साली त्याने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा कॅप्टनसी स्वीकारली. आतापर्यंत तो ४ matches मध्ये २ वेळा विजयी ठरला आहे, तर एकदा त्याच्या नेतृत्वात भारताचा पराभव झाला आहे. पण त्याच्या कॅप्टनसीमध्ये एक वेगळाच एग्रेशन पहायला मिळाला आहे, ज्यामुळे भविष्यात नेतृत्वाची मदार त्याच्या खांद्यावर नक्की येऊ शकते. पण यामुळे रोहित शर्माच्या कॅप्टनसीला धक्का लागू शकतो, अशाही बातम्या सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत. पर्थ टेस्ट हरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कोच गौतम गंभीरची (Gautam Gambhir) खेळाडूंसोबत काही गोष्टींवर वाद झाल्याची बातमी फिरत होती.
यामध्ये असं म्हटलं जात होत की, रोहित शर्माची कॅप्टनसी काढून ती इतर कोणाला तरी द्यावी. मात्र स्वत बुमराहने यावर पूर्णविराम देत म्हटलं की, आमच्या कॅप्टननं मॅच न खेळता नेतृत्त्वगुण दाखवून दिल आहे. आमच्याकडं कुणीही स्वार्थी नाही. टीमच्या सर्वोत्तम हिताचं जे काही असेल ते आम्ही करण्यास सज्ज आहोत. त्यामुळे वाद रोहित आणि बुमराहमध्ये मुळीच नाहीत, असं दिसून येतंय. पण रोहित शर्माच्या एकंदरीत रेकॉर्ड्सवरून बीसीसीआय (BCCI) आणि सिलेक्शन कमिटी आगामी कॅप्टनचा नक्कीच विचार करू शकतो. (Sport News)
=============
हे देखील वाचा : IPL मध्ये खेळाडूंच्या टी-शर्ट मागील क्रमांक कसे ठरवले जातात?
=============
यंदा भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जाण्याचं स्वप्न जवळपास धूसर आहे. साउथ आफ्रिका आधीच फायनलमध्ये जाऊन पोहोचली आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे फायनलमध्ये जाण्याचे strong चान्स आहेत. त्यामुळे बिजीटीमधून तरी भारत सावरू शकतो, पण आपलं मोडकळीस पडणार टेस्ट क्रिकेट (Test match) सांभाळण्यासाठी आतातरी भारतीय बोर्डाने काहीतरी पाउले उचलली पाहिजेत. आणि यासाठी कदाचित बीसीसीआय बुमराहचाच विचार करू शकते, अशा चर्चा आहेत. त्यामुळे कपिल देव यांच्यानंतर भारताला आता दुसरा फुल-टाईम बॉलर कॅप्टन मिळणार का ? हे महत्त्वाच ठरणार आहे.
- Ajinkya Rahane
- BCCI
- bgt 2024
- border gavaskar trophy
- bumrah on rohit sharma
- gautam gambhir
- ICC
- ind vs aus playing 11 5th test
- India vs Australia Test Series
- jasprit bumrah on rohit sharma
- jasprit bumrah on rohit sharma drop
- kl rahul
- Rohit Sharma
- rohit sharma cricket news hindi
- Rohit Sharma Drop
- rohit sharma dropped
- rohit sharma retirement
- sport news
- Sports News
- sports news hindi
- sportsnext
- sportsnext cricket news
- sportsnext india
- sportsnext sports channel
- Virat Kohli