Home गाजावाजा स्पेशल धार्मिक स्थळांच्या ठिकाणी डोक्यावर ओढणी किंवा पदर का घेतात? जाणून घ्या कारण
गाजावाजा स्पेशल

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी डोक्यावर ओढणी किंवा पदर का घेतात? जाणून घ्या कारण

10
Religious Secrets
Religious Secrets

सर्व धर्मांमध्ये पूजा-पाठ संबंधित काही ना काही नियम असतात आणि त्यांचे पालन करणे फार महत्वाचे असल्याचे सांगितले जाते. यापैकीच एक म्हणजे आपले डोकं झाकणे. स्री आणि पुरुष मंडळी जेव्हा एखाद्या पूजेसाठी बसतात किंवा दर्शनासाठी जातात तेव्हा ते आपले डोके झाकतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी महिला आपल्या डोक्यावर ओढणी किंवा पदर का घेत असाव्यात? तर काही लोक देवाच्या प्रति सन्मानची भावना ठेवतात. मात्र धार्मिक मान्यता आणि परंपरेशी काही वैज्ञानिक कारण ही जोडलेली आहेत. तर जाणून घेऊयात याच बद्दल अधिक. (Religious Secrets)

‘या’ कारणास्तव धार्मिक मंदिरांमध्ये डोक झाकले जाते
मंदिर, गुरुद्वारा किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या येथे प्रवेश करताना आपले डोकं झाकणे जरुरी अशा कारणासाठी असते की, धार्मिक स्थळ हे सर्वाधिक पवित्र मानले जाते. देवाच्या प्रति सन्मानाची भावना ठेवत तसे केले जाते. त्याचसोबत डोक्यावर काही नसेल तर केस पूजेच्या सामग्री मध्ये पडू शकतात. यामुळे पुजेच्या वस्तू अशुद्ध होतात आणि देव त्याचा स्विकार करत नाही. अशातच पुजेचे फळ तुम्हाला मिळत नाही.

Religious Secrets
Religious Secrets

शास्रांनुसार पूजा करतेवेळी व्यक्तीचे मन दुसरीकडे भटकू नये म्हणून सुद्धा डोक झाकणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत केसांमध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करु शकते. नकारात्मक उर्जेपासून बचाव करण्यासाठी सुद्धा डोक झाकणं गरजेचे आहे. ही परंपरा खुप वर्षापासून चालत आली आहे.(Religious Secrets)

हे देखील वाचा- ओखलेश्वर हनुमान मंदिरामध्ये घडला चमत्कार.. हनुमानाच्या मूर्तीने केली पापण्यांची उघडझाप

पूजेच्या वेळी डोक झाकण्यामागील वैज्ञानिक कारण
विज्ञानानुसार आकाशीय विद्युत तरंग हे खुल्या डोक्यावर प्रवेश करुन सर्वाधिक प्रभावित करतात. त्यामुळे व्यक्तीला राग, डोक दुखणे, डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. त्याचसोबत केसांमध्ये चुंबकीय शक्ती असते. अशातच रोगाचा फैलाव करणारे किटाणू सहज त्याच्या संपर्कात येतात. डोक झाकल्याने या किटाणूंपासून बचाव होते. अशातच व्यक्ती जर धार्मिक ठिकाणी असेल तर तेव्हा अधिकाधिक भक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी येतातच. पण तेव्ह या समस्यांपासून बचाव करण्यासाठी डोक झाकणे फार महत्वाचे आहे.

तर आपण जेव्हा देवाला नमस्कार करतो तेव्हा आपल्या मनात देवापुढे आपण केलेल्या चुका मान्य करण्याची ताकद हवीच. त्याचसोबत भावी आयुष्यासाठी त्याचे आशीर्वाद ही सोबत रहावे यासाठी प्रार्थना करावी. क्षमेच्या भावनेमुळे व्यक्तीमधील अहंकार दूर होतो आणि नात्यात प्रेमाची भावना नेहमीच राहते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....