Home लाईफ स्टाईल लव्ह बॉम्बिंग ते गॅसलाइटिंग, नात्यातील हे 6 संकेत मानले जातात रेड फ्लॅग
लाईफ स्टाईल

लव्ह बॉम्बिंग ते गॅसलाइटिंग, नात्यातील हे 6 संकेत मानले जातात रेड फ्लॅग

7
relationship tips
relationship tips

Relationship Tips : सध्या वेगाने बदलत्या काळात बहुतांशजण इमोनशनली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये जगत आहेत. पण त्यांना याची अनूभुती फार उशीराने येते. काहीवेळेस असा विचार केला जातो की, एखादा आपल्यावर खूप प्रेम करतोय पण दुसऱ्या बाजूला तो लव्ह बॉम्बिंग तर करत नसेल ना? ही स्थिती अशी आहे की, सुरुवातीला पार्टनरचे प्रेम आणि लक्ष आपल्याकडे केंद्रित करत त्याला फसवणे. यानंतर हळूहळू पार्टनरवर नियंत्रण मिळवणे. असे नाते दीर्घकाळापर्यंत मानसिक त्रास देतात आणि कळत नाही की, तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकले आहात. अशाच काही गोष्टींबद्दल पुढे जाणून घेऊया.

लव्ह बॉम्बिंग
नात्याची सुरुवात अचानक गरजेपेक्षा पार्टनरचे कौतुक करणे, सतत फोन आणि मेसेज, गिफ्ट्स पाठवणे आणि त्याला स्पेशल फील करून देणे. या गोष्टी लव्ह बॉम्बिंग असू शकतात. सर्वकाही ऐकणे फार चांगले वाटत असले तरीही उद्देश असा असतो की, पार्टनरला भावनिकरित्या फसवणे. हळूहळू व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवू लागतो.

गॅसलाइटिंग
ज्यावेळेस एखादा तुमच्या विचारावर प्रश्न उपस्थितीत करतो, तुमच्या भावना चुकीच्या असल्याचे म्हणतो किंवा तुम्ही नेहमीच चुकीचे असल्याचे ठरवत असेल तर ही स्थिती गॅसलाइटिंगची आहे. अशा पद्धतीची वागणूक हळूहळू स्वत:मधील आत्मविश्वास कमी करायला लावते आणि व्यक्तीला यामुळे भयंकर मानसिक त्रास होतो.

girlfriend
Relationship tips

कंट्रोल करणे
तुमचा पार्टनर तुम्ही काय घालावे, काय बोलावे किंवा कोणाला भेटावे हे ठरवत असेल तर अशा नात्यात न राहिलेले बरे. याचा अर्थ असा होतो की, पार्टनर तुम्हाला कंट्रोल करायला पाहत आहे. यामुळे तुमचे स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकते. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

साइलेंट ट्रिटमेंट
चूक समोरच्या व्यक्तीची असली तरीही तो तुमच्यासोबत काहीही न बोलता बोलणे बंद करतो. तुम्ही चुकीचे आहात हे दाखण्याचा यावेळी प्रयत्न केला जातो. ही पद्धत भावनिकरित्या तुम्हाला दु:खात पाडू शकते. (Relationship Tips)

=======================================================================================================

हेही वाचा : 

Neha Kakkar : भावंडांमधील Sibling Divorce म्हणजे काय?

Passport : भारतात चार रंगात मिळतो पासपोर्ट, जाणून प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचे वैशिष्ट्य

=======================================================================================================

पॉझिसिव्ह असणे म्हणजे प्रेम नव्हे
मी तुझ्याबद्दल पॉझिसिव्ह आहे, पण प्रेमही खूप करतो असे बोलणारे खरंतर, सत्यात असुरक्षित भावनेने नात्यात राहणारे असतात. याचा अर्थ तुम्हाला पार्टनर कंट्रोल करू पाहत असते. अशा नात्यापासून दूर रहा.

स्वत:च्या चुकीसाठी तुम्हाला दोष देणे
काही चूक झाल्यास त्याचा दोष तुम्हाला देणे अत्यंत चुकीचे आहे. हे टॉक्सिक आणि रेड फ्लॅग रिलेशनशिपचे संकेत आहेत. यामुळे व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली जाऊ शकते.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....