Home गाजावाजा स्पेशल नव्या रिलेशनशिपमध्ये ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
गाजावाजा स्पेशल

नव्या रिलेशनशिपमध्ये ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

12
Relationship Advice
Relationship Advice

नव्या नात्यात एकमेकांबद्दल अधिक जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. एकमेकांची आवड, पसंद, मित्रपरिवार अशा सर्वच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. मात्र नाते दीर्घकाळ टिकून रहावे यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा नाते मोडण्याची वेळ येईल. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्ही नेहमीच विचार केला पाहिजे हे पाहूयात. (Relationship advice)

-एकत्रित वेळ घालवणे
रोडटूग्रोकाउंसिलिंगच्या मते, तुम्ही जेवढा वेळ एकत्रित घालवाल तेवढेच तुम्ही एकमेकांना उत्तम समजून घेऊ शकता. मात्र हे गरजेचे नाही की, तुम्ही एकत्रित फिरायला पाहिजे. तुम्ही एकत्रित वॉकला जाऊ शकता किंवा पुस्तक वाचण्याची आवड असेल तर तसे करु शकता. एकत्रित कुकिंग करणे अशा काही गोष्टी केल्याने तुम्हाला एकमेकांना व्यवस्थितीत समजून घेता येईल.

-गरजा विचारा
तुम्ही पार्टनरला त्याच्या गरजा वेळोवेळी विचारा. जेणेकरुन तुम्ही त्याला उत्तम समजून घेता येईल. त्याचसोबत भावनात्मक रुपात तु्म्ही जोडले रहाल. ऐवढेच नव्हे तर पार्टनरच्या वाईट काळात तुम्ही त्याची साथ दिली तर तो नेहमीच तुमचा आदर करेल.

Relationship Advice
Relationship Advice

-तुमच्यातील भीती, राग यावर बोला
नात्यात अत्यंत गरजेचे आहे की, तुम्ही तुमच्यातील भीती, राग आणि इमोशन्स पार्टनर सोबत शेअर केले पाहिजेत. तुम्ही त्यांना हे सुद्धा सांगू शकता की, तुम्हाला कोणत्या गोष्टींची भीती वाटते. (Relationship advice)

-राग व्यक्त करा पण माफी मागा
जर तु्म्ही अधिक रागीट आहात तर तुम्ही स्वत:ला शांत होण्यासाठी वेळ घ्या. एखाद्या गंभीर मुद्द्यावर जर पार्टनरशी बोलायचे असेल तर तेव्हा त्याच्यावर राग व्यक्त करु नका.त्याचसोबत रागात जर पार्टनरला काही बोललात तर माफी ही मागा.

-कॉम्लिमेंट गरजेची
प्रयत्न करा की, तुम्ही तुमच्या पार्टनरला दररोज एक कॉम्लिमेंट तरी द्या. यामुळे निगेटिव्ह सेल्फ इमेज मोडली जाईल आणि पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल सकारात्मक विचार येतील.

-स्वत:बद्दल खरं सांगा
ज्या व्यक्तीला तुम्ही डेट करत आहात त्याच्यासोबत प्रामाणिक राहिले पाहिजे. कारण असे न केल्यास तुमच्या नात्यात वाद होऊ शकतात. आपल्याबद्दल खोटं सांगणे हे तुमच्या नात्यात दीर्घकाळ चालणार नाही. आपल्या आवडी, पसंद याबद्दल ही पार्टनरला इमानदारीने सांगा.

हेही वाचा- Flirting मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

-आपल्या भुतकाळाला विसरण्याचा प्रयत्न करा
आपल्या सर्वांनाच भुतकाळातील काही गोष्टींचा त्रास वर्तमानकाळात होत राहतो.अशातच तुम्ही नव्या रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी एखाद्या पार्टनरला डेट करत होता तर त्याबद्दल ही सांगा. तसेच नव्या रिलेशनशिपमध्ये एक्स पार्टनर बद्दल ही सतत बोलणे टाळा. आपला भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करा.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....