Home मनोरंजन 5 अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री
मनोरंजन

5 अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री

10
Rekha love life
Rekha love life

आयुष्यात प्रेम आणि एखाद्याची साथ ही फार महत्त्वाची असते. प्रेमाचे नाते टीकवणे फार कठीण असते. कितीही प्रयत्न केला तरीही त्यात वाद होऊ लागले तर असे नाते मोडले जाते. कधीकधी प्रेमाचे नाते न टिकण्यामागे नशीबाला दोष दिला जातो आणि एकट्याने आयुष्य जगावे लागते. अभिनेत्री रेखा हिचे आयुष्य पाहिले तर तिच्या आयुष्यात ही असेच काहीसे झाले आहे. अभिनेत्रीला आयुष्यात प्रेम झाले. लग्न सुद्धा केले, पण आज ती एकट्यात आयुष्य जगतेय. (Rekha love life)

हिंदी सिनेमात रेखाचे चाहते अनेक होते. काही कलाकारांसोबत ही रेखाचे नाव जोडले गेले आणि काही नात्यात ती गंभीर सुद्धा होती. जीतेंद्र ते संजय दत्त सोबतच्या रिलेशनशिपच्या तिच्याबद्दलच्या चर्चा झाल्या. मात्र तिला घर मोडणारी असा टॅग ही काहींनी लावला होता.

करियरच्या सुरुवातीला रेखाचे नाव जीतेंद्र यांच्यासोबत जोडले गेले होते. तेव्हा जीतेंद्र यांचे लग्न शोभा कपूर यांच्यासोबत झाले होते. रेखामुळे त्यांना आपले विवाहाचे नाते मोडायचे नव्हते.मात्र काही काळात दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर दोघांच्या डेटिंग बद्दलच्या बातम्या येणे बंद झाले.

या व्यतिरिक्त रेखाचे नाव अभिनेता किरण कुमार सोबत ही लावले गेले. रिपोर्ट्सनुसार सिनेमाच्या शुटिंग दरम्यान त्यांच्यामध्ये रिलेशनशिप सुरु झाले होते. मात्र सिनेमाचे शूटिंग जसे पूर्ण झाले तसे यांच्यामधील प्रेम ही कमी झाले. दोघांचे नाते जेवढे लवकर जोडले गेले तेवढेच लगेच मोडले ही गेले.

Rekha love life
Rekha love life

तर रेखाचे नाव सर्वाधिक जोडले गेले ते म्हणजे विनोद मेहरा. काही लोक असा दावा करतात की, रेखा आणि विनोद मेहरा यांनी गुपचुप लग्न सुद्धा केले होते. मात्र जेव्हा ती विनोद यांच्या घरी गेली तेव्हा अभिनेत्याच्या आईने तिला घरातून हकलावले होते. यानंतर दोघे वेगळे झाले. दोन महिन्यापर्यंत विनोद मेहरा यांची वाट पाहिली. पण विनोद यांना आपल्या आईला या नात्यासाठी राजी करण्यात यश आले नाही तेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Rekha love life)

त्याचसोबत रेखाच्या प्रेमाचे आजची किस्से बोलले जातात, त्यापैकी अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा किस्सा आवर्जुन सांगितला जातो. सिनेमा गंगा की सौगंधच्या सेटवर यांच्या प्रेमाचा खुलासा झाला होता आणि त्यांचे नाते फार काळ लपले गेले नाही. मात्र त्यावेळी अमिताभ बच्चन हे विवाहबंधनात आधीच अडकले गेले होते. त्यांना दोन मुलं सुद्धा होती. अशातच स्थितीत ते परिवाराला बाजूला ठेवू शकत नव्हते. त्यामुळे यांच्या दोघांचे नाते मोडले गेले.

हेही वाचा- ट्रेनमध्ये विकल्या पेपरमेंटच्या गोळ्या, तर कधी केली ड्रायव्हरची नोकरी… पहा मेहमूदच्या आयुष्याची ट्राजीडी

रेखाचे नाव ८० च्या दशकात अभिनेता संजय दत्त सोबत ही जोडले गेले होते. दोघांनी जमीन आसमान नावाच्या एका सिनेमात एकत्रित काम केले होते आणि त्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. नाते जोडण्याआधीच मोडले गेले. अशा गोष्टी आयुष्यात घडत असतानाच १९९० मध्ये रेखाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र एखाद्या अभिनेत्यासोबत नव्हे तर आपला डाय हार्ट फॅन आणि व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न करण्याचा विचार केला होता. मुकेश यांचे सुद्धा रेखावर फार प्रेम होते. ते वारंवार दिल्लीतून मुंबईत रेखाला भेटण्यासाठी सेटवर यायचे. अखेर रेखाने त्यांना लग्नासाठी होकार दिला होता. पण या दोघांचे प्रेम दीर्घकाळ टिकले नाही. लग्नाला एक वर्ष सुद्धा झाले नाही आणि मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली होती.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...