Home लाईफ स्टाईल Ramdas Marbade : पाणीपुरी विकणार्‍या रामदास मारबदेची उत्तुंग भरारी; इस्रोमध्ये तंत्रज्ञ पदावर निवड
लाईफ स्टाईल

Ramdas Marbade : पाणीपुरी विकणार्‍या रामदास मारबदेची उत्तुंग भरारी; इस्रोमध्ये तंत्रज्ञ पदावर निवड

11
Ramdas Marbade

‘इच्छा तिथे मार्ग आणि मेहनत, जिद्द तिथे यश’ खरे आपल्याला जर आपल्या परिस्थितीवर मात करायची असेल तर नक्कीच त्यासाठी पेटून उठत प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला फक्त परिस्थितीला दोष देण्यात काहीही अर्थ नसतो. करून दाखवण्याची आणि यश मिळवण्याची जिद्द ज्याच्यामध्ये असते तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. फक्त प्रयत्न, मेहनत आणि जिद्द या त्रिसूत्रीचा जोरावर जर तुम्ही मार्गस्थ राहिलात तर येणारा दिवस नक्कीच तुमचा असतो. आपण अनेकदा यशस्वी लोकांची त्यांच्या कष्टाची कहाणी ऐकत असतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवणारे अनेक लोकं या जगात आपल्याला पाहायला मिळतील. (Ramdas Marbade)

आजच्या फास्ट जगात आपल्याला सर्वच गोष्टी फास्ट, पटकन, मेहनतीशिवाय पाहिजे, थोडे प्रयत्न केले की लगेच यश पाहिजे. मात्र असे होत नाही. मेहनतीशिवाय यश निव्वळ अशक्य आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशी यशोगाथा सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला देखील तुमचे ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. ही प्रेरणादायी कथा आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील रामदास मारबते याची. (Marathi News)

रामदास महाराष्ट्रातील अतिशय छोट्या ठिकाणावरून येत त्याने पाणीपूर्वी विकत अभ्यास केला आणि थेट इसरोमध्ये नोकरी मिळवली आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी रामदास पाणीपुरीचा ठेला चालवीत होता. जरी तो पाणीपुरी विकत होता तरी त्याची इच्छाशक्ती खूपच प्रबळ होती. जीवनात काहीतरी करून दाखवण्याची त्याची जिद्द त्याला यशाच्या शिखरावर घेऊन गेली. जरी अर्थांजनासाठी तो पाणीपुरी विकत असला तरी त्याने थोडाही अभ्यासाकडे कानाडोळा केला नाही. रामदासाने कठोर परिश्रम आणि अभ्यास करून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) तंत्रज्ञ म्हणून स्थान मिळवले आहे. (Top Stories)

Ramdas Marbade

रामदासाच्या या यशामुळे संपूर्ण तिरोडा गावकऱ्यांची मन तर नक्कीच उंचावली सोबतच या गावाला रामदासमुळे ओळख देखील मिळाली आहे. रामदासचे बालपण अत्यंत साधं आणि संघर्षमय होते. वडील भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत शिपाई, आई गृहिणी, आणि घराची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. मात्र त्याने कधीच कठीण परिस्थितीबद्दल कोणतीही तक्रार केली नाही. उलट, हीच परिस्थिती त्याने त्याची ताकद बनवली आणि यशाच्या दिशेने जाण्यासाठी वाटचाल सुरु केली. (Marathi Latest News)

कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी रामदास दिवसा पाणीपुरी विकायचा आणि रात्री जागून अभ्यास करायचा. शिक्षणाबरोबरच त्याने ITI तिरोडा येथून पंप ऑपरेटर – कम – मेकॅनिकचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यासोबतच त्याने पंप तंत्रज्ञान, द्रव प्रवाह, दाब, कॅविटेशन, जलशुद्धीकरण आणि दुरुस्ती यासारख्या तांत्रिक गोष्टी शिकून घेतल्या. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवी प्राप्त केली. इस्रोसाठी त्याने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. २०१९ सालापासून त्याने इसरोमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, त्याचे लग्न झाले, मात्र त्याने त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत रामदास अभ्यास करतच होता. (Todays Marathi News)

============

हे देखील वाचा :  Jawaharlal Nehru : ब्रिटिशांनी पंडित नेहरूंवर लावलेल्या आरोपांबद्दल माहितेय का?

============

अशातच २०२३ साल उजाडले आणि रामदासाने ISRO च्या अप्रेंटिस ट्रेनी भरतीसाठी त्यांनी अर्ज केला. २०२४ मध्ये नागपूर येथे त्याने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर श्रीहरिकोटा येथे कौशल्य चाचणीत प्रवेश मिळवला. नानाविध टप्प्यांमधून पार पडणाऱ्या या अतिशय जटिल अशा निवड प्रक्रियेत त्यांने यश मिळवले. २९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांची निवड झाली आणि १९ मे २०२५ रोजी इसरो कडून रामदासाला नियुक्तीपत्र मिळाले. (Social News)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....