Home गाजावाजा स्पेशल Shriram : वालीला मारल्यानंतर त्याच्या पत्नीने दिला होता श्रीरामांना ‘हा’ श्राप
गाजावाजा स्पेशललाईफ स्टाईल

Shriram : वालीला मारल्यानंतर त्याच्या पत्नीने दिला होता श्रीरामांना ‘हा’ श्राप

12
Shriram

गुढीपाडवा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. सगळीकडे सध्या नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग चालू आहे. गुडीपाडव्याच्या हिंदू लोकांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. याच दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. याशिवाय या दिवसाला अनेक अर्थाने महत्व आहे. गुढी पाडव्याचा सण साजरा करण्यामागे मोठे महत्व आहे. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याच्या दिवसाला ओळखले जाते. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते.(Shriram)

गुढी पाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाला असलेल्या महत्वापैकी एक महत्व म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होतो. आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही प्रतीक आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का ज्या युद्धात विजय मिळवल्यामुळे गुढीपाडव्याचा दिवस ओळखला जातो त्याच युद्धात श्रीरामांना श्राप देण्यात आल्याची एक आख्ययिका प्रसिद्ध आहे.(Gudhipadwa 2025)

श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांनी १४ वर्षे वनवास भोगला. याच काळात रावणाने सीतेचे अपहरण केले, आणि रामायण घडले. सीता मातेच्या अपहरणानंतर जेव्हा राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत होते तेव्हा दक्षिणेत श्रीराम आणि हनुमान यांची भेट झाली. याच दरम्यान श्रीराम यांना बाली आणि सुग्रीवही भेटले. श्री राम आणि सुग्रीव दोघेही चांगले मित्र झाले. मात्र एक वेळ अशी आली जेव्हा बाली आणि सुग्रीव यांच्यात सत्तेवरून मोठे भांडण झाले. याच भांडणाचा शेवट श्रीरामांना श्राप मिळाल्याने झाला. (shriram and hanuman)

=======

हे देखील वाचा : Shalivahan Shake : जाणून घ्या शालिवाहन शके म्हणजे काय?

=======

Shriram
हनुमानामुळेच श्रीराम आणि सुग्रीव यांची ओळख झाली आणि ते चांगले मित्र झाले. सुग्रीवाचा मोठा भाऊ बाली होता. ज्याला वरदान होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती बालीमध्ये येईल. याच वरदानामुळे तो गर्विष्ठ झाला आणि सत्तेच्या मोहात येऊन त्याने त्याचा भावाला सुग्रीवाला राज्यातून बाहेर काढले. यादरम्यान सुग्रीव आणि बाली यांच्यात भांडण झाले.(Marathi Top Stories)

पुढे सुग्रीवाने श्रीरामाला ही घटना सांगितली. तेव्हा श्रीरामांनी सुग्रीवाला बालीसोबत युद्ध करून राज्य परत मिळवण्याचा सल्ला दिला. मात्र बालीला मिळालेल्या वरदानामुळे त्याच्याशी युद्ध करून त्यात जिंकणे अशक्य होते. तेव्हा श्रीराम यांनी या युद्धात सुग्रीवाला मदत करण्याचे वचन दिले. त्यानंतर रामाने बालीला सुग्रीवसोबत युद्ध करण्याचे आव्हान दिले. श्रीरामाच्या वचनानुसार सुग्रीव युद्ध करण्यास पोहोचला. तेथून बालीही युद्धासाठी आला. दोन भावांमध्ये गदायुद्ध सुरू झाले होते. यानंतर श्रीरामांनी लपून बालीवर बाण सोडला, त्यामुळे बालीचा मृत्यू झाला. बाली यांच्या मृत्यूची माहिती त्यांची पत्नी तारा मिळताच ती तिथे पोहोचली.(Latest Marathi News)

जेव्हा ताराने बालीला मृत पाहिले तेव्हा ती शोकाकुल झाली. क्रोधाने तिने श्रीरामाला श्राप दिला. “सीता शोधूनही तुम्हाला सापडणार नाही, आणि जरी सीता भेटली तरी तुम्ही पुन्हा तिला गमावाल.” त्यामुळे असे मानले जाते की ताराच्या याच श्रापामुळे श्रीराम लंका जिंकून सीता मातेसोबत अयोध्येला आले, मात्र त्यानंतर पुढे काही दिवसातच पुन्हा सीता मातेला वनवास मिळाला. याच वनवासामध्ये तिने लव आणि कुश या दोन मुलांना महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात जन्म दिला आणि आपले जीवन व्यतीत केले.(Marathi Trending News)

Shriram

गुढी पाडवा साजरा करण्यामागचे महत्व

शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.(Social News)

=======

हे देखील वाचा : Mata Mahishasur Mardine : वाराणसीची माता स्वप्नेश्वरी !

=======

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो अशी मान्यता आहे. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. (Top Trending News)

गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाहि तर तो विजयध्वज देखिल आहे. जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते.

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...