भगवान श्रीरामांचे नाव ऐकले तरी समस्त भारतीय वंदन करतात. या प्रभू श्रीरामांच्या 14 वर्षाचा वनवास आणि त्या काळात त्यांचा जिथे मुक्काम झाला होता, अशा ठिकाणी आता रामस्तंभ उभारण्यात येणार आहेत. श्री राम संस्कृत संशोधन संस्था ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली आहे. जिथे जिथे भगवान श्री रामांचे पाऊल पडले आहे, अशा ठिकाणी हे रामस्तंभ उभारण्यात येणार आहेत. एकूण 5000 किमी मध्ये अशी 292 स्थाने असल्याची माहिती आहे. श्री राम स्तंभावर चार भाषांमध्ये माहिती लिहिण्यात येणार आहे. त्यामधून प्रभू श्रीरामांनी संबंधित स्थानावर किती काळ वास्तव्य केले होते, आणि त्या स्थानाचे महत्त्व याची माहिती भाविकांना देण्यात येणार आहे. युवा पिढीला प्रभू श्री रामांच्या जीवनाबद्दल अधिक माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम श्री राम संस्कृत संशोधन संस्था ट्रस्टकडून राबवण्यात येत आहे. (Ramasthamba)

प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. या भगवान श्रीरामांच्या वनवास काळातील पराक्रमाची माहिती तरुण पिढीला देण्यासाठी एक अभिवन उपक्रम करण्यात येणार आहे. श्री राम संस्कृत संशोधन संस्था ट्रस्टकडून श्री राम वनगमन मार्गावर श्री राम स्तंभ स्थापित केले जाणार आहेत. हे स्तंभ सुमारे 15 फूट उंच असणार आहे. या स्तंभाभोवती प्रभू श्रीरामांचा पराक्रम सांगणा-या चित्रांची सजावट करण्यात येणार आहे. यातून प्रभू श्रीरामांनी गाजवलेला परक्रम भावी पिढीला सांगण्यात येणार आहे. अयोध्या ते नेपाळ आणि श्रीलंका या सुमारे 5000 किलोमीटर मार्गावर हे श्री राम पराक्रम स्तंभ उभारण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)
भगवान श्री रामांच्या वन प्रवासाच्या मार्गावर अनेक वर्षांपासून संशोधन करणारे डॉ. राम अवतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात येणार आहे. यासोबत अशोक सिंघल फाउंडेशन देखील श्री राम स्तंभाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या श्री राम स्तंभांवर प्रभू श्रीरामांचे चरित्र चार भाषांमधून लिहिण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणाचा ऐतिहासिक संदर्भ, भगवान श्री रामांशी असलेले संबंधित स्थानाचे नाते, त्या ठिकाणाची खासियत आणि संदर्भाशी संबंधित चित्रे यांचा समावेश असणार आहे. यासाठी भगवान रामाच्या वनमार्गावर संशोधन करणारे डॉ. रामावतार यांच्या पुढाकारातून भगवान रामांच्या खुणा आढळणाऱ्या 292 ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे. हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि स्थानिक अशा चार भाषांमध्ये या स्तंभावर जो मजकूर लिहिला जाणार आहे, आता त्याच्यावर काम चालू आहे. पुढच्या 2 महिन्यात या श्री राम स्तंभांची स्थापना सुरु होणार आहे. (Ramasthamba)

श्री राम वनवास मार्ग, ज्याला राम वनगमन मार्ग म्हणूनही ओळखले जाते. याच मार्गावरुन भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासात प्रवास केला होता. हा मार्ग अयोध्येपासून सुरू होते आणि श्रीलंकेपर्यंत जातो. हा मार्ग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमधून जातो. अयोध्या हे प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असून तिथूनच त्यांचा वनवास प्रवास सुरु होतो. त्यानंतर भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासातील 12 वर्षे चित्रकूटमध्ये घालवली. भगवान रामांनी वनवासाची काही वर्षे पंचवटी येथेही व्यतीत केल्याची माहिती आहे. हा भाग दंडकारण्य वनाचा एक भाग आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी श्री राम स्तंभ अधिक संख्येनं उभारण्यात येणार आहेत. या जागा नक्की केल्या असून यासाठी काही स्थानिकांनाही पुढाकार घेतल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?
=======
भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवास प्रवासादरम्यान अयोध्याहून तामसा नदी ओलांडली, नंतर गोमती नदी ओलांडली, श्रृंगवेरपूर, प्रयागराज आणि वाल्मिकी आश्रम ओलांडून चित्रकूटला पोहोचले. यानंतर तो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या घनदाट जंगलात गेला, जिथे त्यांनी त्यांच्या वनवासाची काही वर्षे घालवली. हा सर्व नदी मार्गही अभ्यासला जात आहे. यातील ब-याच ठिकाणी आता मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. श्रा राम स्तंभ उभारण्यासाठी आवश्यक अशी जागा मिळवणे हे मोठे कसब आहे. मात्र श्री रामांच्या प्रती असलेल्या भक्तीपोटी अनेक स्थानिकांनी आपली जागा स्वतःहून दिल्याचीही माहिती आहे. पुढच्या दोन महिन्यात या कामाला सुरुवात होणार असून यासाठी 292 जागांवरील स्थानिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही श्री राम संस्कृत संशोधन संस्था ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. (Ramasthamba)
सई बने
- America
- Ayodhya
- BJP
- Chhattisgarh
- china
- Chitrakoot
- congress
- cricket
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- Gomti River
- information
- International news
- Karnataka
- Lakshmana
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- madhya pradesh
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- Nepal
- News
- Odisha
- Pakistan
- Panchavati
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Prayagraj
- Ram
- Ramasthamba
- sita
- Social News
- Social Updates
- Sri Lanka
- Sringaverpur
- Tamil Nadu
- tamsa river
- Telangana
- Temple
- todays marathi headlines
- Top Stories
- Uddhav Thackery
- Uttar Pradesh
- Valmiki Ashram
- vanavasa
- राजकारण