Home राष्ट्रीय Raja Raghuvanshi: कोण आहे संजय वर्मा ज्याच्याशी सोनम २५ दिवसात २४० वेळा कॉलवर बोलली
राष्ट्रीयराष्ट्रीय

Raja Raghuvanshi: कोण आहे संजय वर्मा ज्याच्याशी सोनम २५ दिवसात २४० वेळा कॉलवर बोलली

13
Raja Raghuvanshi | Latest Marathi Headlines

सध्या संपूर्ण देशामध्ये राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी केस कमालीची गाजत आहे. इंदूर येथील राजा रघुवंशी यांची मेघालय येथे हत्या करण्यात आली होती. त्याच्या बायकोनेच ही हत्या केली असल्याचे तपासाअंती समोर आले. मात्र असे असले तरी या प्रकरणामध्ये दररोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड होत असून त्यामुळे पोलिसांना देखील आश्चर्य वाटत आहे. आता या हत्या प्रकरणात संजय वर्मा नावाच्या एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. (Raja raghuvanshi murder case)

संजय वर्मा हे नाव या प्रकरणात आल्याने या केसाला नवीन वळण मिळाले आहे. ही व्यक्ती या केसमध्ये अनेक अर्थाने महत्वाची मानली जात आहे, याचे कारण म्हणजे संजय वर्मा नावाच्या व्यक्तीने अवघ्या २५ दिवसांत सोनमला २४० फोन केले होते. ही माहिती समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मग हा संजय वर्मा नक्की आहे तरी कोण? का त्याने सोनमला एवढे फोन केले? लग्नानंतरही संजय वर्मा सोनमला फोन का करत होता? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. याबाबत पोलिसांकडून आता मोठा खुलासा झाला आहे. (Marathi News)

मे महिन्यात मेघालयाच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथे इंदूर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनमसह पाच आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात नवे नाव आल्याने खळबळ उडाली होती. संजय वर्मा नावाच्या व्यक्तीशी सोनम सतत बोलत असल्याची माहिती उघड झाली आहे. हे नाव आल्यानंतर पोलिसांनी संजय वर्मा कोण हा शोध घेतला. या संजय वर्माबाबतची आता मोठी माहिती समोर आली असून संजय वर्मा हा दुसरा तिसरा कोणी नसून सोनमचा प्रियकर राज कुशवाहच होता. तो आपली ओळख लपवून सतत सोनमच्या संपर्कात होता. (Todays Marathi HEadline)

Raja Raghuvanshi

मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने संजय वर्मा यांच्या नंबरवर कॉल केला, तो तिच्या फोनमध्ये ‘हॉटेल’ म्हणून सेव्ह होता. १ मार्च ते ८ एप्रिल या दिवसांमध्ये सोनमने तब्बल २३४ वेळा या नंबरवर कॉल केला आणि ती समोरच्या व्यक्तीशी बोलत होती. मात्र राजाच्या हत्येनंतर संजय वर्मा याचा फोन मात्र बंद लागत होता. पोलिसांनी सोनमच्या भावाकडे देखील संजय वर्माबद्दल चौकशी केली असता त्याने त्याला या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. (Top Marathi HEadline)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि संजय वर्मा नावाच्या व्यक्तीमध्ये दीर्घकाळ संभाषण होत असे. सोनमकडून सातत्याने केला जाणारा हा फोन क्रमांक संजय वर्मा नावाच्या व्यक्तीचा असल्याचे पोलिसांना समजले, परंतु तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे हा नंबर सोनंच प्रेमी स्वतः राज कुशवाहा वापरत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. (Marathi Latest News)

दरम्यान राजाला मारण्यासाठी शिलाँगला आलेल्या विशाल, आकाश आणि आनंद यांनी एक नवीन सिम देखील खरेदी केले होते, असेही आतापर्यंतच्या तपासात दिसून आलं. राजाची हत्या केल्यानंतर त्यांनी नंबर बंद केला आणि सिम फेकून दिले होते. या हत्येनंतर आता पोलीस प्रेमप्रकरणाव्यतिरिक्त इतर काही हत्येचे कारण आहे का याचाही शोध घेत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे राजाला मारण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न मारेकऱ्यांनी केले होते. त्यानंतर २३ मे रोजी त्यांना राजा रघुवंशीला मारण्यात यश आले. मारेकऱ्यांनी गुवाहाटी, नोंगरियाट आणि वेसाडोंग फॉल्सजवळ राजाच्या हत्येचे प्रयत्न केले होते. (Top Stories)

 

राजा रघुवंशी हत्या प्रकरण काय?
राजा रघुवंशी आणि सोनम यांचे ११ मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले होते. २० मे रोजी ते हनीमूनसाठी मेघालयला गेले. 23 मे रोजी सोहरा परिसरातून दोघंही अचानक बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. २ जून रोजी, मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथील रियात अरलियांग येथील वेई सावडोंग पार्किंग लॉटच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यातून सोनमचा पती राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र सोनम बेपत्ता होती. बेपत्ता झालेली सोनम अचानक ७ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये पोलिसांना शरण गेली. पोलिसांनी चौकशी करून सोनमसह चार जणांना राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे. सध्या शिलाँग पोलिसा राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून गुन्ह्यातील पुरावे आणि आणखी आरोपींचा शोध घेत आहे. (Social News)

Recent Posts

Related Articles

S. L. Bhyrappa
राष्ट्रीय

S. L. Bhyrappa : ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

साहित्यविश्वातून एक दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा...

Stray Dogs
राष्ट्रीयराष्ट्रीय

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे...

Independence Day | Todays Marathi News
राष्ट्रीयराष्ट्रीय

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५...

AirForce
राष्ट्रीयराष्ट्रीय

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली...