Home गाजावाजा स्पेशल Pushpa : पण तेलुगू पुष्पा चक्क ‘मराठी’ कसा काय झाला ?
गाजावाजा स्पेशल

Pushpa : पण तेलुगू पुष्पा चक्क ‘मराठी’ कसा काय झाला ?

11
Pushpa

आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा द रूलने अख्ख मार्केट खाल्लय. झुकेगा नहीं साला ते फायर नहीं वाईल्डफायर है में हे पुष्पाचे डायलॉग्स सगळ्यांच्या डोक्यात फिट बसलेलेच आहेत. पुष्पा २ (Pushpa 2) सध्या बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतोय हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण हा पुष्पा नेमका आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे आणि खासकरून तर मराठी प्रेक्षकांना पडला आहे. पुष्पाचं मूळ नाव पुष्पाराज मोल्लेटी म्हणजे तेलुगू मग हा पुष्पा मराठी कसा ? याचं कारण म्हणजे पुष्पाचे अर्धे अधिक डायलॉग्स मराठीमध्येच आहेत. एक गा रे सगळे ए गा ना ऐकलं नाही काय ? असे भरमसाट मराठी डायलॉग्स पुष्पाच्या तोंडी आहेत. याच्या मागचा  Main Factor म्हणजे आपला मराठमोळा श्रेयस तळपदे ! सगळ्यांनच माहीत आहे की पुष्पाला हिंदी डबचा आवाज श्रेयसने दिला आहे. पण हा आवाज आणि तेलुगू पुष्पाला मराठी Character दाखवण्या मागची स्टोरी काय आहे ? जाणून घेऊया. (Pushpa)

मुळात पुष्पा – द राईज या पहिल्या पार्टलाच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळीच श्रेयस तळपदेचा पुष्पाला दिलेला भारदस्त आवाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. पण कोविडचा काळ असल्यामुळे पुष्पा तितकी कमाई करू शकला नाही. पण त्याने एक Cult Status निर्माण केलं, ज्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहायला लागले. आणि दुसऱ्या भागात पुष्पा बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, वादळ, सगळं घेऊन आला. आजपर्यंतचे सगळे रेकॉर्डस त्याने मोडले. इतकंच काय मराठी पुष्पा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. जो Swag श्रेयसने पुष्पाच्या आवाजासाठी कायम ठेवला होता, तोच Swag आणि मसाला इथेही ठेवला, ज्यामुळे पुष्पा – द रुलचेही डायलॉग लोकांच्या डोक्यात बसले आहेत. (Entertainment News)

पण एक पाहायचं झालं तर पहिल्या पार्टमध्ये पुष्पाच्या तोंडी जितके मराठी डायलॉग्स नव्हते, त्यापेक्षा जास्त मराठी भाषा पुष्पाच्या दुसऱ्या पार्टमध्ये आहे. काय शिंदे काका, कसे आहात ? पासून श्रीवल्लीला सतत बायको बायको बोलणं यातच पुष्पाचा मराठी तडका उठून दिसतो, आणि यामागचा डबिंग सूत्रधार आहे आपला श्रेयस तळपदे जितकी चर्चा अल्लू अर्जुनची झाली तितकीच चर्चा श्रेयसच्या आवाजाची झाली. पुष्पाच्या पर्सनालिटीला सूट होईल असा आवाज श्रेयस अक्षरशः तोंडात कापसाचा बोळा कोंबून दिला आहे. मराठी टच या मुव्हीला कसा आला याबाबत एक किस्सा श्रेयसने मध्यंतरी सांगितला होता. (Pushpa)

पुष्पाच्या आधी श्रेयसने पहिल्यांदाच ‘द लायन किंग’ चित्रपटामध्ये टीमोन या Character ला आवाज दिला होता. त्यानंतर श्रेयसला थेट अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज या मुव्हीला आवाज देण्यासाठी विचारणा करण्यात आली. याच्या डबिंगसाठी त्याला हैदराबादला बोलावलं होत. आधी त्याने तेलुगु भाषेत पूर्ण मुव्ही पाहून घेतला. त्यानंतर डबिंग सुरु झालं. डबिंगच्या दरम्यानच तो अधून मधून मराठीत चर्चा करायचा. त्यामुळे डिरेक्टर सुकुमारने पुष्पाचे काही डायलॉग्स मराठीतच ठेवले तर ? असं सुचवलं आणि तेलुगु पुष्पाचा मराठी पुष्पा झाला. आणि इथूनच पुष्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टला मराठी टच मिळाला. (Entertainment News)

=======

हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !

शानदार नोएडा फिल्म सिटी

=======

आपण पाहिलं असेल की, पुष्पाच्याही आधी अनेक साउथच्या चित्रपटांमध्ये मराठी डायलॉग्सचा वापर होत आला आहे. त्यामुळे मराठी Audience खेचण्यासाठी हे मराठी संवाद वापरले असावेत, हे तर नक्कीच आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे पुष्पा जरी मराठी दाखवला असला, तरी त्यामुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळण कठीण होऊन बसलेलं, आणि याचा अनेक ठिकाणी विरोध देखील झाला. अजून एक गोष्ट म्हणजे दोन चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुनला आवाज देऊन श्रेयसने जगभर पोहोचवल, मात्र अजूनही दोघांची भेट देखील झाली नाही आणि बोलणसुद्धा झालं नाही. वैयक्तिक अल्लू अर्जुन (Allu Arjun) कडून श्रेयसला कसलीही प्रतिक्रिया मिळालेली नाही, असं खुद्द श्रेयसने सांगितलं आहे. केवळ एकदा माध्यमांसमोर अल्लू अर्जुनने Hindi डबिंगची प्रशंसा केली होती. श्रेयसने यासाठी मानधन किती घेतलंय, याचा खुलासा अजूनही झालेला नाही. आता पुष्पा ३ द Rampage या आगामी पार्टसाठी श्रेयस किती मार्केट खाणार, याचीच सर्व मराठी आणि हिंदी रसिकांना उत्सुकता आहे. (Pushpa)

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....