Home गाजावाजा स्पेशल प्रियंकाची हॉलिवूड एक्सप्रेस सुसाट…
गाजावाजा स्पेशल

प्रियंकाची हॉलिवूड एक्सप्रेस सुसाट…

10
Priyanka Chopra
Priyanka's Chopra bags new Hollywood project marathi info

आपली देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या हॉलिवूडमध्ये सुसाट स्पिडवर आहे.  प्रियंकाने प्रसिद्ध गायक निक जोनस याच्याबरोबर लग्न केल्यापासून जवळपास बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. पण हिच प्रियंका अभिनयापासून दूर झालेली नाही. आता एका मुलीची आई झालेली प्रियंका हॉलिवूडमध्ये गाजत आहेत. तिची सिटाडेल नावाची स्पाय थ्रिलर वेबसिरीज प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यात प्रियंकान दिलेल्या स्टंटसीनची चर्चा चालू आहे. काही दिवसापूर्वी निता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनामध्ये प्रियंका आणि निक या जोडीनं जास्त लक्ष खेचून घेतलं.  त्यानंतर तिनं मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत सिटाडेलच्या प्रमोशनची पार्टी केली. त्याच दरम्यान प्रियंकानं आणखी एक मोठा हॉलिवूड प्रोजेक्ट आपल्या नावावर केल्याची बातमी आली आहे. ‘हेड्स ऑफ स्टेट’ या चित्रपटात प्रियंका जॉन सीना आणि इद्रिस एल्बा या दोन हॉलिवूड स्टार सोबत दिसणार आहे. प्रियंकाची ही झेप मोठी असून लवकरच तिचा एक हॉलिवूडपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. एकूण या देसी गर्लला हॉलिवूड जास्त भावल्याचं स्पष्ट होतंय.  

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ओटीटी पदार्पणासाठी सज्ज आहे. प्रियंकाची अनेक दिवस चर्चेत असलेली स्पाय थ्रिलर वेबसिरीज ‘सिटाडेल’ लवकरच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. सध्या प्रियंका या वेबसिरीजचे जोरदार प्रमोशन करत आहे. त्याच दरम्यान ॲमेझॉन स्टुडिओकडून प्रियंकाला एका चित्रपटासाठी साईन केल्याची बातमी आली आहे. स्वतः प्रियंकानं (Priyanka Chopra) ही बातमी आपल्या सोशल मिडियामार्फत चाहत्यांना दिली आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटात प्रियंका अभिनेता जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम करणार आहे. 

गेल्या काही महिन्यापासून प्रियंका (Priyanka Chopra) चर्चेत आली आहे. भारतात येण्यापूर्वी तिनं बॉलिवूडवर सूचक विधान करत बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टिका केली होती. त्यानंतर प्रियंका आपली मुलगी मालती आणि नवरा निकसह भारतात आली. निता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात प्रियंकाचा लूक खास ठरला. यानंतर प्रियंकानं तिच्या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी पार्टी ठेवली होती. रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेबसिरीजचा प्रीमियर नुकताच झाला. यात प्रियंका आणि तिचा को-स्टार रिचर्ड मॅडेन हा सुदधा उपस्थित होता. त्यासह या सिरिजच्या भारतातील आवृत्तीमधील अभिनेता वरुण धवनही या पार्टीत उपस्थित होता. दिग्गज अभिनेत्री रेखा, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, नेहा धुपियासह अनेक अभिनेते यावेळी उपस्थित होते. प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) सिटाडेल 28 एप्रिलला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. सिटाडेलच्या या पार्टीदरम्यानही प्रियंकानं बॉलिवूडवर टिका केली होती. त्यामुळे प्रियंका (Priyanka Chopra) आता बॉलिवूडमध्ये पुन्हा इच्छूक नसल्याची चर्चा होत असतांनाच तिच्या नावावर आणखी एक हॉलिवूडपट जमा होणार याची बातमी आली. प्रियंकाने तिच्या सोशल मिडीयावर यासंदर्भात माहिती दिली आहे.  प्रियंकानं ‘ऑन टू द नेक्स्ट’ असे कॅप्शन देत आपल्या नवीन हॉलिवूडपटाची माहिती दिली आहे.  प्रियांकाच्या या ‘हेड ऑफ स्टेट’ चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात सुरू होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शक इल्या नशुल्लर आहेत. हा चित्रपट हॅरिसन क्वेरीच्या कथेवर आधारित आहे.  ‘सिटाडेल’ व्यतिरिक्त, प्रियांका, तिचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘लव्ह अगेन’ च्या रिलीजसाठी देखील तयारी करत आहे. यात प्रियंकासोबत सॅम ह्यूघन आणि सेलीन डीओन हे सह-कलाकार आहेत. प्रियंकाचा (Priyanka Chopra) हा ‘लव्ह अगेन’ मे महिन्यात रिलीज होणार आहे. याबरोबरच प्रियंकाकडे आता अँथनी मॅकीसोबत ‘एंडिंग थिंग्ज’ नावाचा चित्रपट आणि अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत ‘जी ले जरा’ हा बॉलिवूडपट आहे.   

=====

हे देखील वाचा : प्रियंका आणि तिची अतरंगी फॅशन…

=====

दरम्यान 28 एप्रिल रोजी ॲमेझॉन प्राईमवर येणा-या प्रियंकाच्या सिटाडेलची खूप चर्चा आहे. सिटाडेलचे वैशिष्य म्हणजे या मालिकेचे पहिले दोन भाग 40 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. सिटाडेलची कथा एजंट्स मेसन केन  आणि नादिया सिंग यांच्याभोवती आहे. जागतिक गुप्तचर संस्था सिटाडेलच्या पतनानंतर हे दोघंही पळून गेलेल आहेत. पण मेसन त्याची पूर्वीची साथीदार असलेल्या नादियाचा शोध घेतो आणि एका मिशनला सुरुवात करतो. या मिशमनध्ये अनेक गुपिते असतात. या मालिकेच्या भारतीय आवृत्तीमध्ये सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन दिसणार आहेत.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....