Home मनोरंजन प्रियंका चोपडाने सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली? गदर-2 च्या दिग्दर्शकांनी सांगितले सत्य
मनोरंजन

प्रियंका चोपडाने सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली? गदर-2 च्या दिग्दर्शकांनी सांगितले सत्य

12
Priyanka Chopra Surgery
Priyanka Chopra Surgery

दिग्दर्शक अनिल शर्मा सध्या आपला नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा गदर-२ चे सक्सेस एन्जॉय करत आहेत. त्यांच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५२० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. याच दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी प्रियंका चोपडाच्या सर्जरी बद्दल सांगितले. त्यांनी प्रियंकाने ही सर्जरी  नक्की का केली याबद्दल सांगितले. (Priyanka Chopra Surgery)

2003 मध्ये प्रियंका चोपडाने अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला सिनेमा द हीरो: द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय मध्ये काम केले होते. त्यावेळी अभिनेत्रीने नाकाचे ऑपरेशन केले होते. त्यासाठी तिचा चेहरा बदलला होता. अनिल शर्मांच्या मते, त्यावेळी प्रियंकाला काही प्रोजेक्ट्समधून बाहेर केले होते.

Priyanka Chopra Opens Up About Getting a Botched Nose Surgery

अनिल शर्मांनी काय म्हटले?
अनिल शर्मांनी म्हटले की, त्यावेळी प्रियंकाचा एक फोटो पाहिला होता जेव्हा तिला पाहिल्यावर ओळखणे कठीण झाले होते. त्यांनी म्हटले की, ऑपरेशननंतर प्रियंकाचा चेहरा बदलला गेला होता. तिला काही प्रोजेक्ट्समधून बाहेर करण्यात आले होते. तिला साइनिंग अमाउंट परत करण्यास सांगितले होते. त्यावेळी प्रियंका अनिल शर्मांकडे रडत आली होती. ते पाहून ते हैराण झाले होते. त्यावेळी अनिल शर्मांनी प्रियंकांसोबत उभे रहायचे ठरवले होते.

प्रियंकाला ऑपरेशननंतर खुप काही सहन करावे लागले होते
पुढे अनिल यांनी प्रियंका बद्दल असे म्हटले होते की, ऑपरेशननंतर तिला खुप काही सहन करावे लागले होते. मी तिच्यासोबत एक सिनेमा साइन सुद्धा केला होता. तेव्हा स्वत: माझ्या पत्नीने जाऊन चेक दिला होता. गदर प्रदर्शित झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपात अनिल गेले होते. दोन महिन्यानंतर परतले तेव्हा प्रियंकाने आपल्या नाकाचे ऑपरेशन केले होते. तेथे मला वृत्तपत्रातून कळले होते की, प्रियंकाने ज्युलिया रॉबर्ट्स प्रकारे दिसण्यासाठी ऑपरेशन केले होते. मी हे ऐकून हैराण झालो होतो. कारण ती आधीच सुंदर दिसत होती. (Priyanka Chopra Surgery)

प्रियंकाने का केली होती सर्जरी?
मुलाखतीत अनिल शर्मांनी असे सांगितले की, प्रियंकाने नक्की का सर्जरी केली होती. जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी आधी प्रियंकाला ऑपरेशन करण्यामागील खरं कारण विचारले होते. त्यावर अभिनेत्रीने असे म्हटले होते की, तिला साइनसची समस्या होती त्यामुळे तिने सर्जरी केली होती.


हेही वाचा- जेव्हा हॉलिवूड सिंगर शकीराचा झाला होता घटस्फोट…

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...