Home मनोरंजन प्रियंका चोपडाने सांगितले बॉलिवूडला अलविदा करण्यामागील कारण
मनोरंजन

प्रियंका चोपडाने सांगितले बॉलिवूडला अलविदा करण्यामागील कारण

9
Priyanka Chopra on Bollywood
Priyanka Chopra on Bollywood

बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास बहुतांश कलाकारांनी केला आहे. मात्र ग्लोबल स्टार झालेली भारताची ‘देसी गर्ल’ म्हणजेच प्रियंका चोपडाने खुप वर्षानंतर आपले ते दु:ख समोर मांडले ज्याबद्दल आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हते. प्रियंकाच्या चाहत्यांना नेहमीच जाणून घ्यायचे होते की, तिने बॉलिवूडमधून एक्झिट का केली? बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्र्यांपैकी ती एक होती तरीही तिने असे का केले असेल? याच सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रियंकाने दिली आहेत. तिची उत्तरे ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत. (Priyanka Chopra on Bollywood)

प्रियंकाने ‘फॅशन’, ‘सात खून माफ’, ‘कमीने’, ‘बर्फी’, ‘अंदाज’, ‘एतराज’ सारखे हिट सिनेमे दिल्यानंतर अचानक तिने बॉलिवूडला रामराम करत हॉलिवूडचा मार्ग पडकला होता. सुरुवातील तिचे असे करणे सर्वांना आश्चर्यचकीत करण्यासारखेच होते. पण याचेच उत्तर आता तिने १० वर्षानंतर दिले आहे.

देसी गर्ल सध्याच्या दिवसात आपली सीरिज सिटाडेलमुळे चर्चेत आहे. नुकत्याच तिने डेक्स शेफर्डसोबत पॉडकास्ट शो आर्मचेअर एक्सपर्टमध्ये आपल्या त्या निर्णयाचा उल्लेख केला ज्यामुळे प्रत्येकजण हैराण झाले. तिने बॉलिवूडला रामराम करत हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. प्रियंकाने असे म्हटले की, बॉलिवूड अशा कारणास्तव सोडले की मला माझ्या मनासारखे काम मिळत नव्हते आणि त्यामुळे खुश नव्हती.

याच बातचीत दरम्यान तिने कबुल केले की, पहिल्यांदा बॉलिवूड ते हॉलिवूड बद्दल बोलणार आहे. कारण यावेळी तिला थोडी सुरक्षितता वाटत होती, तिने असे म्हटले की, देसी हिट्स अंजली आचार्यने तिने तिला एकदा एक म्युजिक व्हिडिओ पाहिला आणि फोन केला. त्यावेळी प्रियंका चोपडा सात खून माफची शूटिंग करत होती. अंजलीने प्रियंकाला विचारले की, तिला अमेरिकेत तिचे म्युझिकमध्ये करियर करायचे आहे का?

प्रियंकाने असे म्हटले की, तो अशा काळ होता जेव्हा मी बॉलिवूडमधून एक्झिट घेण्याच्या तयारीत होती आणि या इंडस्ट्रीमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत होती. यामागील कारण तिने असे सांगितले की, तेव्हा मला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एका बाजूला केले जात होतो. लोक मला कास्ट करत नव्हते. मला लोकांच्या काही तक्रारी होत्या. मला तसा गेम खेळता येत नाही. मी त्या प्रकारच्या पॉलिटिक्सला कंटाळली होती आणि मला एका ब्रेकची गरज होती. अशातच या म्युजिमुळे मला जगातील दुसऱ्या हिस्स्यात जाण्याची संधी दिली.(Priyanka Chopra on Bollywood)

तिने पुढे असे म्हटले की, मला त्या सिनेमांचे काहीच वाटायचे नाही जे मला करायचे नव्हते. मात्र मला काही क्लब आणि लोकांच्या गटाला आकर्षित करण्याची आवश्यकता होती आणि यासाठी मेहनत सुद्धा करावी लागणार होती. तेव्ही मी खुप वेळ काम केले. मला असे वाटत नाही की, मला हे करायचे आहे. कारण जेव्हा म्युजिकची ऑफर आली तेव्हा मी असे म्हटले की, जे काही करायचे आहे ते करा मी अमेरिकेला जातेय.

हे देखील वाचा- ‘या’ अभिनेत्रीची होणार बॉलिवूड चित्रपटात एन्ट्री!

प्रियंका चोपडाने अमेरिकेत कामाची सुरुवात म्युजिक सोबत केली. २०१२ मध्ये तिने आपले पहिले इंग्रजी गाणे ‘इन माय सिटी’ लॉन्च केले. त्या गाण्यात तिच्यासोबत आंतरराष्ट्रीय सिंगर पिटबुल सुद्धा होता. मात्र त्यानंतर म्युजिक मध्ये तिचे नाणं खणखणीत वाजले नाही. त्यानंतर प्रियंकाला अमेरिकेत राहून अभिनय करावा असा सल्ला दिला गेला. प्रियंकाने आपला प्रयत्न सुरु ठेवला आणि कधीच मागे वळून पाहिले नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...