Home प्रेस रिलीझ सोयरीक चित्रपटाच्या शानदार प्रिमियरला नामवंत कलाकारांची हजेरी.
प्रेस रिलीझ

सोयरीक चित्रपटाच्या शानदार प्रिमियरला नामवंत कलाकारांची हजेरी.

10
सोयरीक

चित्रपटाच्या घोषणेपासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘सोयरीक’ या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने या  चित्रपटाचे निर्माते आहेत.

महत्त्वाचा विषय आणि त्यातील मानसिक संघर्ष शेवटपर्यंत उत्तम पद्धतीने मांडला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितीत मान्यवरांनी यावेळी दिल्या. ही सोयरीक मनाला अंत:र्मुख करणारी आहे अशा शब्दात उपस्थितीत मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक  केले आहे.

Soyrik Movie Review: Soyrik is an offbeat film, compared to mainstream  Marathi films

‘सोयरीक’ किंवा ‘लग्न जुळवणे’ ही कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते. लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवनाविषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता खरंच आली आहे का? हे प्रभावीपणे दाखवून देणारा हा चित्रपट आहे.

====

हे देखील वाचा:  ‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम निमिषा सजयन (Nimisha Sajayan) करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण 

====

‘सोयरीक’ चित्रपटात शशांक शेंडे, किशोर कदम, छाया कदम, उमेश जगताप, राजश्री निकम, शंतनू गंगणे, विराट मडके, प्रियदर्शनी इंदलकर, विनम्र भाबल, निता शेंडे, योगेश निकम, अतुल कासवा, संजीवकुमार पाटील, अपर्णा क्षेमकल्याणी  आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...