Home प्रेस रिलीझ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘खोटी’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज!
प्रेस रिलीझमनोरंजन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘खोटी’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज!

7
खोटी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र अनलॉक होत असताना आता मराठी चित्रपटांनाही सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. चित्रपटगृहात आता शंभर टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी मिळाली असल्याने अनेक मराठी चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

गुढीपाडव्याचे निमित्त साधून ओजस्वी मल्टीमीडियाच्या आगामी ‘खोटी ‘ या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत संपन्न झाला. यावेळी चित्रपटाचा पोस्टरही रिलीज करण्यात आला. शशिकांत तुपे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. मुहूर्ताच्यावेळी दिग्दर्शक शशिकांत तुपे यांच्यासह सिनेमाची तगडी स्टारकास्टही उपस्थित होती.

====

हे देखील वाचा: राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या चित्रपटात आता प्रिती मल्लापूरकर

====

यावेळी अभिनेते विजय पाटकर, विजय कदम, सुहृद वार्डेकर, जयवंत वाडकर, स्मिता रेठरेकर, अस्मिता पांडे आणि संगीतकार मिलींद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री विनायक मुंडे उपस्थित होते.

सिनेमाच्या कथानकाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र ‘खोटी’ या चित्रपटाचा पोस्टर फारच बोलका आहे. हा सिनेमा खेळाडू मुलगी आणि तिच्या कोचवर आधारित असल्याची कल्पना येते.

चित्रपटाला मिलिंद मोरे यांचं संगीत लाभलंय. ‘खोटी ‘ या चित्रपटाचे छायाचित्रण सुनिल वानखेडे यांनी केलंय. तर रंगराव घागरे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.

====

हे देखील वाचा: प्रत्येक मुलाने पाहावा असा ‘भारत माझा देश आहे’ या दिवशी होणार रिलीज

====

सिनेमा खेळाभोवती आधारित असला तरीही कथानकाची कल्पना येण्यासाठी तुम्हांला ट्रेलरची वाट पाहावी लागेल. सिनेमाचे शूटिंग येत्या काही दिवसांत सुरु होईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...