Home मनोरंजन पूजा सावंतने शेअर केले लग्नातील Unseen फोटो
मनोरंजन

पूजा सावंतने शेअर केले लग्नातील Unseen फोटो

9
Pooja Sawant

Pooja Sawant

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. पूजाने आतापर्यंत तिच्या विविध भूमिकांमधून स्वतःला एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे.

Pooja Sawant

याचवर्षी फेब्रुवारीमध्ये पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत लग्न केले. त्याआधी तिने नोव्हेंबर २०२३ ला प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी तिने सिद्धेशसोबत लगीनगाठ बांधली.

Pooja Sawant

आज त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. हेच औचित्य साधत पूजाने सोशल मीडियावर तिच्या लग्नातील काही न पाहिलेले अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant

“सहा महिन्यांआधी आम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासातील प्रत्येक दिवस सुखाचा होता. तुम्ही सर्वांनी मला आणि सिडला दिलेले प्रेम, आशीर्वाद यासाठी आम्ही दोघे कायम तुमचे ऋणी राहू. आमच्यावर असेच प्रेम करत राहा.”

Pooja Sawant

असे कॅप्शन देत पूजाने हे सर्व फोटो शेअर केले आहेत. मुख्य म्हणजे तिने हे फोटो पोस्ट करताच लगेच ते व्हायरल झाले आहेत.

Pooja Sawant

या खास दिवशी सिद्धेशने देखील पूजाला खास सरप्राइज दिले आहे. या सरप्राइजचा एक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.

Pooja Sawant

“Happy Six Moths Boju” अशी चिठ्ठी लिहून त्याच्यासोबत सिद्धेशने दोन सुंदर अशी फुलं देखील ठेवली आहेत. पूजाचा नवरा तिला प्रेमाने बोजू अशी हाक मारतो.

Pooja Sawant

सध्या पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियामध्ये आहे. पूजा तिचा हा खास दिवस तिच्या नवऱ्याबरोबर साजरा करणार आहे.

Pooja Sawant

पूजाचा नवरा सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे ती सध्या काम आणि शूटिंगमधून वेळ मिळाला की, ऑस्ट्रेलियात जाते.

Pooja Sawant

सध्या पूजाने शेअर केलेल्या या खासफोटोंवर नेटकऱ्यांनी आणि इंडस्ट्रीमधल्या लोकांनी कमेंट्स करत त्यांच्यावर प्रेमाचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...