परग्रहींबाबत मानवाला कायम आकर्षण वाटत राहिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून परग्रहींच्या अस्तित्वाचा शोध चालू आहे. त्यातच अलिकडे अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनं काही परग्रहींनी अमेरिकन सैन्यावर केलेल्या हल्लाच्या बातम्याही पुढे आल्या आहेत. आता परग्रहींबाबत आणखी एक बातमी पुढे आली आहे. जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी परग्रही रहात असलेला चक्क ग्रहच शोधला असल्याचा दावा केला आहे. मुख्य म्हणजे, परग्रहींचे वस्तीस्थान मिळाल्याचा दावा करणारे शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. या भारतीय शास्त्रज्ञांना K2-18b या ग्रहावर जीवनाचे पुरावे सापडले आहेत. शास्त्रज्ञांना या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची 99.7 टक्के शक्यता वाटत आहे. या ग्रहाचे वातावरण पृथ्वीसारखेच असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या सर्व शोधामध्ये केंब्रिज विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ प्रोफेसर निक्कू मधुसूदन सहभागी आहेत. मधुसूदन यांनी हा परग्रहींच्या अस्तित्वाबाबत माहिती देणारा हा सर्वात आश्वासक शोध असल्याचे सांगितले आहे. (Planet K2-18b)

परग्रहींच्या अस्तित्वाबाबत रोज नवे दावे केले जातात. परग्रही बघितले आहेत, असे सांगणारेही अनेक भेटतात. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी परग्रही रहात असलेला ग्रहच शोधला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. अन्य कुठल्या ग्रहावर परग्रही रहात आहेत का, याबाबत अनेक शास्त्रज्ञ शोध घेत होते. गेल्या काही वर्षापासून अमेरिकेमध्ये कायम परग्रही आणि त्यांचे वाहन युएफओ बघितल्याचा दावा करण्यात आला आहे. हे परग्रही वारंवार पृथ्वीवरही येत असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा कोणालाही देता आला नाही. केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे कोडे सोडवल्याचा दावा केला आहे. या विद्यापीठातील शास्त्रज्ञांना अंतराळात जीवनाचे संकेत सापडले आहेत. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनच्या सहाय्यानं त्यांनी K2-18 b या परग्रहावर वातावरण असल्याचा शोध घेतला आहे. शिवाय हे वातावरण पृथ्वीमधील वातावरणाशी बरोबरीचे असून यात जीवसृष्टीचे अस्तित्व शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (International News)

यामुळे परग्रहींचा शोध घेणा-या संशोधकांमध्ये आनंदाचा वातावरण पसरले आहे. केंब्रिज विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ प्रोफेसर निक्कू मधुसूदन हे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांनी परग्रहींच्या अस्तित्वाचा दावा केल्यानं त्याला अनेकांना पाठिंबा दिला आहे. प्रोफेसर निक्कू मधुसूदन यांनी सांगितलेला K2-18b हा ग्रह पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्षे दूर आहे. तसेच तो पृथ्वीच्या आकारापेक्षा सुमारे अडीच पट मोठा आहे. केब्रिंजच्या शास्त्रज्ञांना या K2-18b ग्रहाच्या वातावरणात DMS नावाचा एक रेणू आढळला आहे. हे DMS रेणू पृथ्वीवरही असतात. पृथ्वीवरील महासागरांमध्ये राहणाऱ्या लहान शैवाळांमध्ये ते तयार होतात. हे DMS रेणू इतके लहान असतात की ते मनुष्याला डोळ्यांच्या सहाय्यानं दिसू शकत नाहीत. पण ते पाण्यावर एकगठ्ठा असले की त्यांचे रंगामुळे अस्तिव दिसून येते. शास्त्रज्ञांना ग्रहाच्या वातावरणात दोन रेणूंचे बोटांचे ठसे सापडले आहेत. (Planet K2-18b)
डायमिथाइल सल्फाइड आणि डायमिथाइल डायसल्फाइड, हे दोन्ही रेणू केवळ पृथ्वीवर जीवनाद्वारे तयार होतात. त्यामुळेच परग्रहींचे अस्तित्व हे K2-18b या ग्रहावर असल्याचा दावा आहे. ते आपल्या समोर असले तरी आपल्याला दिसत नाहीत, मात्र त्यांच्या अस्तित्वावर आपण प्रश्नचिन्हही निर्माण करु शकत नाही, असेही प्रोफेसर मधुसूदन यांनी सांगितले आहे. प्रोफेसर मधुसूदन यांनी या सर्व दाव्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधील माहितीच्या संदर्भाचा अभ्यास केला आहे. (International News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
Sweating Hands : सतत तळव्यांना घाम का येतो?
=======
ही महाकाय दुर्बिणी 2021 मध्ये लाँच करण्यात आली होती. K2-18b हा ग्रह पाण्याने भरलेला महासागर आणि दाट हायड्रोजनयुक्त वातावरण असलेला ग्रह असल्याचीही माहिती आहे. पृथ्वीपासून 9.5 ट्रिलियन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रहावर परग्रही खरोखरच रहात असतील तर आता या संशोधनात अधिक वाढ कऱण्याची गरज आहे. ही बातमी समोर येण्याच्या एक दिवस आधीच अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेच्या एका दाव्यानं खळबळ उडाली होती. परग्रहींच्या हल्ल्यात एकाचवेळी 23 सैनिकांचे दगडात रुपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर परग्रही मनुष्यासाठी मित्र आहेत की शत्रू हा प्रश्न विचारण्यात येत असतानाच आता परग्रहींचा प्रत्यक्ष मुक्काम जिथे असतो, तो ग्रह मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केल्यामुळे अधिक उत्सुकता वाढली आहे. (Planet K2-18b)
सई बने
- Alien
- America
- BJP
- china
- congress
- dimethyl disulfide
- Dimethyl sulfide
- DMS
- donald trump
- Earth
- eknath shinde
- Entertainment
- information
- International news
- James Webb Space Telescope
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Nikku Madhusudan
- Pakistan
- Planet
- Planet K2-18b
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- University of Cambridge
- राजकारण