Home आंतरराष्ट्रीय Patongtarn Shinawatra : फोन चॅटमुळे थायलंडच्या पंतप्रधान निलंबित !
आंतरराष्ट्रीय

Patongtarn Shinawatra : फोन चॅटमुळे थायलंडच्या पंतप्रधान निलंबित !

9
Patongtarn Shinawatra

इस्रायल-इराण युद्ध चालू झाल्यावर इकडे आशियातील दोन देशांमध्येही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमधील सीमेवर असलेल्या एका भगवान शंकराच्या मंदिरावरुन वाद सुरु आहे. या मंदिरावर हे दोन्ही देश आपला दावा करीत आहेत, आणि त्यासाठी युद्ध कऱण्यासही तयार आहेत. या सर्वात थायलंडच्या पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि कंबोडियाचे माजी पंतप्रधान यांच्यामध्ये फोनवरुन चॅटींग झाले. हे चॅट लीक झाले आणि थायलंडमध्ये मोठा गदारोळ झाला. कारण थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडियाच्या माजी पंतप्रधानांचा, कंबोडियाचे सिनेट प्रमुख हुन सेन यांचा काका असा उल्लेख केला होता. शत्रू देशाच्या नेत्याला काका म्हणून संबोधल्यामुळे थायलंडमध्ये मोठा गदारोळ उठला.  (Patongtarn Shinawatra)

हजारो नागरिक रस्तावर उतरले आणि त्यांनी शिनावात्रा यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी करण्यात आली आणि आता थायलंडच्या संवैधानिक न्यायालयानं शिनावात्रा यांना 15 दिवसांसाठी निलंबित केले आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांच्यावर नैतिकतेचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप एका याचिकेद्वारे ठेवण्यात आला. याची सुनावणी करताना संवैधानिक न्यायालयाने हा आदेश दिला असून यात आता थायलंडच्या राजाने नवीन मंत्रिमंडळ सदस्यांच्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढच्या पंधरा दिवसात शिनावात्रा यांना पुन्हा आपल्या पदावर दावा करता येईल का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. थायलंडमधील एका संवैधानिक न्यायालयाने पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून निलंबित केले आहे. (International News)

त्यांच्यावर फोन कॉल दरम्यान स्वतःच्या देशातील लोकांविरुद्ध चुकीच्या टिप्पण्या केल्याचा आरोप आहे. पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि कंबोडियाचे माजी पंतप्रधान यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ लीक झाल्यापासून थायलंडमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तेव्हापासून तिथे पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने सुरू आहेत. त्यानंतर या सर्व प्रकरणाची आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपाखाली राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी आयोगाच्या कार्यालयाकडून चौकशी कऱण्यात आली. फोन चॅट लिक झाल्यापासून शिनावात्रा या दुहेरी संकटात सापडल्या आहेत. देशभरात त्यांच्याविरोधात आंदोलन चालू आहे. शिवाय त्यांच्या सरकारला पाठिंबा देणा-या भूमजैथाई या प्रमुख पक्षानं थायलंडच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे या सर्वात थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. थायलंडमध्ये सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी तेथील सर्वाधिकार हे राजाच्या हातात आहेत. (Patongtarn Shinawatra)

शिवाय जनतेचाही राजावर विश्वास आहे. त्याच राजांनी पंतप्रधान शिनावात्रा यांच्या नवीन मंत्रिमंडळाला मान्यता दिली आहे. माजी उपपंतप्रधान आणि भूमजैथाई पक्षाचे नेते अनुतिन चारविराकुल यांना नवीन मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले आहे. सोबतच शिनावात्रा यांच्या अन्य समर्थकांचीही हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे शिनावात्रा यांच्या पंतप्रधानपदाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच शिनावात्रा यांच्यासाठी पुढचे 15 दिवस कठीण ठरणार आहेत. न्यायालयाने तपास यंत्रणेला 15 दिवसांच्या आत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालानंतरच शिनावात्रा यांच्यावर अन्य कारवाई काय करायची याबाबत विचार कऱण्यात येणार आहे. या सर्वांमागे थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमधील सीमावाद आहे. थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वाद अलिकडेच वाढला आहे. त्यामागे या दोन देशांच्या सीमेवर असलेले भगवान शंकराचे मंदिर आहे. (International News)

या मंदिरावर कुठल्या देशाचा हक्क आहे, यासाठी थायलंड आणि कंबोडियामध्ये बराच जुना वाद आहे. मात्र या वादात आता पंतप्रधान शिनावात्रा यांनी केलेल्या फोन चॅटची भर पडली आणि थायलंडमध्ये एकच संतापाची लाट उसळली. आपली चूक लक्षात आल्यावर शिनावात्रा यांनी लगेच माफी मागितली. पण तोपर्यंत प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. मे 2025 मध्ये थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमा संघर्षानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला. या सीमा तणावादरम्यान, पंतप्रधान पतोंगटार्न यांनी कंबोडियाचे नेते आणि माजी पंतप्रधान हुन सेन यांना फोन केला. त्यात त्यांचा काका असा उल्लेख केला. याशिवाय एका वरिष्ठ थाई लष्करी कमांडरला त्यांचा विरोधक म्हणूनही संबोधले होते. त्यांच्या विधानामुळे थायलंडच्या संसदेत आणि रस्तावरही मोठा गदारोळ झाला. (Patongtarn Shinawatra)

=============

हे ही वाचा : 

Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत

Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर

=============

पंतप्रधान शिनावात्रा या माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत. 2006 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर थाक्सिन यांना स्वतः सत्तेवरून काढून टाकण्यात आले. तेव्हापासून शिनावात्रा यांचे कुटुंब थायलंडच्या राजकारणात सतत वादात अडकले आहे. पंतप्रधान शिनावात्रा यांच्या सरकारला सुरुवातीपासूनच लष्कराचा विरोध होता. थायलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या शिनावात्रा कुटुंबातील त्या तिसऱ्या सदस्य आहेत. 38 वर्षाच्या पँटोंगटार्न या थायलंडच्या पंतप्रधान बनणाऱ्या सर्वात तरुण नेत्या आहेत. थायलंडमध्ये फक्त दोन महिला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचल्या आहेत. पतोंगटार्नच्या आधी, त्याची काकू पंतप्रधान होती. त्यामुळे, त्या त्यांच्या मावशीनंतर थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. आता या फोन चॅट प्रकरणामुळेही त्यांच्यावरही या पदावरुन पायउतार होण्याचे संकट ओढावले आहे. (International News)

सई बने

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...