Home आरोग्य खुप वेळ झोपून राहिल्याने मधुमेहासारखा गंभीर आजार होतो?
आरोग्य

खुप वेळ झोपून राहिल्याने मधुमेहासारखा गंभीर आजार होतो?

6
oversleeping side effects
oversleeping side effects

सर्वसामान्यपणे जेव्हा आपल्याला थकवा येतो तेव्हा डॉक्टर आपल्याला पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. ऐवढेच नव्हे तर शरिरातील कोणताही अवयव दुखत असेल तर रात्री झोपल्यानंतर शरिर त्या अवयवयाला आपोआप आराम देण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे वारंवार सांगितले जाते. अशातच तुम्हाला कधी वाटले आहे का खुप वेळ झोपून राहिल्याने काही आजार होऊ शकतात? यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण हे खंर आहे.(Oversleeping Side Effects)

वेबएमडीच्या मते, जर तुम्ही खुप वेळ झोपून राहिल्यास तुम्हाला वैद्यकीय समस्या येऊ शकतात. जसे की, मधुमेह, हृदयासंबंधित समस्या होऊ शकतात. संशोधनात असे समोर आले आहे की, जर तुम्ही खुप वेळ झोपलात तर यामुळे डिप्रेशन अथवा मानसिक आजाराचे शिकार होऊ शकता. तर जाणून घेऊयात खुप वेळ झोपल्याने काय नुकसान होऊ शकते.

-मधुमेह
संशोधनात असे समोर आले आहे की, जर तुम्ही गरजेपेक्षा अधिक झोपण्याचे काम करत असाल तर तुम्हाला मधुमेहाची समस्या उद्भवू शकते.

लठ्ठपणा
जर तुम्ही ९-१० झोपत असाल तर पुढील ६ वर्षात २१ टक्के लठ्ठपणाची समस्या तुम्हाला होण्याची शक्यता असते.

-डोके दुखी
जर तुम्ही विकेंड अथवा दररोज रात्री उशिराने झोपत असाल तर तुम्हाला डोके दुखीची समस्या येऊ शकते. ही समस्या मेंदूत सेरोटोनिन वाढल्याच्या कारणास्तव होते.

-पाठ दुखणे
खुर्चीवर बसून खुप वेळ काम करणारी लोक मर्यादेपेक्षा अधिक वेळ झोतात. अशातच त्यांना पाठ दुखीची समस्या, मान आणि खांदे दुखण्याची समस्या होऊ शकते.

-डिप्रेशन
ज्या प्रकारे झोप न येण्याच्या आजारामुळे डिप्रेशनला सुरुवात होते. त्या प्रकारे तुम्ही गरजेपेक्षा अधिक वेळ झोपलात तर यामुळे ही डिप्रेशन येऊ शकते. जगातील १५ टक्के लोक अधिक वेळ झोपल्याने डिप्रेशनच्या समस्येचा सामना करतात.

-हृदयासंबंधित आजार
एका संशोधनात असे समोर आले की, ९-११ तास झोपणाऱ्या महिलांमध्ये अन्य महिलांच्या तुलनेत ३६ टक्के अधिक कोरोनरी हार्ट डिजीजची समस्या उद्भवू शकते.(Oversleeping Side Effects)

हे देखील वाचा- खुप वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने होऊ शकतात ‘या’ समस्या

-मृत्यूची शक्यता
जी लोक रात्री ९-११ तास झोपतात त्यांनाचा डेथ रेट अधिक असतो. हा मानसिक आणि शारिरीक आजाराचे कारण ठरु शकतो व मृत्यूच्या दारात तुम्हाला उभे करु शकतो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...