Home गाजावाजा स्पेशल OK शब्द नेमका कुठून आला आणि प्रत्येक भाषांमध्ये का वापरला जातोय?
गाजावाजा स्पेशल

OK शब्द नेमका कुठून आला आणि प्रत्येक भाषांमध्ये का वापरला जातोय?

9
OK word origin
OK word origin

आपण सर्वजण बोलताना बहुतांश वेळा ओके हा शब्द वापरतो. तर ओके हा शब्द आता विविध भाषांमध्ये सुद्धा वापरला जात आहे. इंग्रजी भाषेत तर हॅलो शब्द बोलल्यानंतर ओके हा शब्द निघतोच निघतो. तर हिंदी असो किंवा अन्य कोणतीही भाषा असो त्यामध्ये सुद्धा ओके या शब्दाचा बोलण्यामध्ये अधिकाधिक वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ओके हा शब्द नक्की कुठून आला किंवा त्यो शब्द तयार होण्यामागील इतिहास काय आहे? तर याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.(OK word origin)

सर्वसाधारपणे प्रत्येक शब्द आणि वाक्याची एक कथा असते. त्याचा वापर कसा केला जातो, त्याची सुरुवात कशी झाली यामागे सुद्धा एक कथा असते. तसे ओके शब्दासंदर्भातील पार्श्वभूमी पाहिल्यास विचित्र कथा ऐकण्यास मिळात. काही लोकांचे असे मानणे आहे की, हा शब्द इंग्रजी नव्हे तर स्पॅनिश येथून आला आहे. परंतु खरंतर तो एक अमेरिकन इंग्रजी शब्द आहे. सध्या जगभरातील प्रत्येक भाषेत ओके या शब्दाचा वापर केला जात आहे. परंतु तो उच्चार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते.

OK word origin
OK word origin

ओके म्हणजेच यांकी असा होतो?
आजकाल लोक कोणत्याही विचाराशिवाय ओके या शब्दाचा अगदी सहज वापर करतात. दरम्यान, काही दशकांपूर्वी ही स्थिती नव्हती. दरम्यान, अॅकेडमिक लोक या शब्दाचा वापर बाजारासाठी वापरत होते. असे मानले जाते की, तो यांकी (YANKEE) शब्द आहे जो अधिक गंभीरता दाखवत नाही.

काय आहे याच्या सुरुवातीची कथा
या शब्दाच्या सुरुवातीबद्दल बोलायचे झाल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँन्ड्र्यु जॅक्सन यांनी All Correct च्या ऐवजी तो संक्षिप्त करत oll correct चा चुकीचा उच्चार किंवा ओके शब्दाचा वापर सुरु केला. दरम्यान, भारतात आणि पाकिस्तानात असे मानले जाते की, ओके हा शब्द जॉर्ज वॉशिंग्टन किंवा अब्राहम लिंकन यांनी आणला आहे. पण काही लोक कोणत्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या द्वारे हा शब्द आल्याची बाब मानणे हे चुकीचे मानतात.

हे देखील वाचा- तब्बल ९० वर्ष भारतावर राणी व्हिक्टोरियाने ठेवले होते आपले वर्चस्व

यापेक्षा उत्तम आणि विश्वासार्ह कथा एका राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची आहे. ज्याचा निवडणूक प्रचार 1800 च्या आसपास सुरू झाला. उमेदवाराचे वडिलोपार्जित गाव न्यूयॉर्क राज्यात होते आणि त्याचे नाव ओल्ड किंडरहूक होते. म्हणूनच त्याच्या समर्थकांनी त्याच नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांसह एक ओके ग्रुप तयार केला. या शब्दाचा खुप प्रचार ही करण्यात आला.(OK word origin)

एक कथा अशी सुद्धा
अमेरिकेतील रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात एक पोस्टल क्लर्कची कथा ओके शब्दासंदर्भातील आहे. ज्याचे नाव Obaidiah Kelly असे होते. प्रत्येक पार्सलच्या निशाणीसाठी तो आपल्या नावाच्या सुरुवातीची अक्षऱ OK असे लिहायचा. त्यामुळे लोक समजायचे की, ओकेचा अर्थ म्हणजे सर्वकाही ठिक आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....