Home लाईफ स्टाईल Office Rangoli Designs : ऑफिसमध्ये काढण्यासाठी सोप्या रांगोळी डिझाइन्स, येईल सणाचा लूक
लाईफ स्टाईल

Office Rangoli Designs : ऑफिसमध्ये काढण्यासाठी सोप्या रांगोळी डिझाइन्स, येईल सणाचा लूक

9
Office Rangoli Art
Office Rangoli Art

Office Rangoli Designs :दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि रंगांनी सजलेले घर तसेच ऑफिस! प्रत्येक ठिकाणी या काळात उत्साहाचं वातावरण असतं. अनेक ठिकाणी ऑफिसमध्येही दिवाळी निमित्ताने रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते. पण कामाच्या धावपळीत सुंदर रांगोळी बनवण्यासाठी वेळ काढणं कठीण जातं. म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत काही सोपे आणि आकर्षक ऑफिस रांगोळी डिझाईन्स जे तुम्ही काही मिनिटांत तयार करू शकता आणि सर्वांचं लक्ष वेधून घेऊ शकता! (Office Rangoli Designs)

Office Rangoli Art
Office Rangoli Art

 मिनिमलिस्ट रांगोळी डिझाईन : ऑफिसमधील जागा मर्यादित असते, त्यामुळे मोठ्या रांगोळीपेक्षा छोटी आणि नीटनेटकी रांगोळी अधिक आकर्षक दिसते. या साठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या, तांदूळ किंवा रंगीत वाळू  वापरू शकता. साधा गोलाकार बेस घेऊन त्यात पिवळा, गुलाबी आणि निळा असे तेजस्वी रंग वापरा. मध्यभागी दिवा किंवा गणपतीचा छोटा आकृती  काढा. अशा प्रकारची मिनिमल रंगोली केवळ सुंदरच नाही, तर ती काही मिनिटांत पूर्णही होते.

Office Rangoli Art
Office Rangoli Art

कॉर्पोरेट टच असलेली डिझाईन : ऑफिसमध्ये कामाच्या वातावरणाला साजेशी रांगोळी हवी असेल तर कॉर्पोरेट थीम वापरू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या कंपनीच्या लोगोवर आधारित रंगोली किंवा टीमवर्क, यश आणि प्रगती दर्शवणारे चिन्ह रंगांनी दाखवा. यात तुम्ही निळा, पांढरा आणि सुवर्ण असे सुसंस्कृत रंग वापरू शकता. अशी रांगोळी केवळ डेकोरेटिव्हच नाही, तर ऑफिसच्या ब्रँड इमेजलाही पूरक ठरते. (Office Rangoli Designs)

Office Rangoli Art
Office Rangoli Art

फुलांच्या पाकळ्यांनी नैसर्गिक रांगोळी : ज्यांना रंगांनी हात खराब करायचे नाहीत त्यांच्यासाठी फुलांची रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. झेंडू, गुलाब, मोगरा, आणि शेवंतीच्या पाकळ्यांचा वापर करून सुंदर डिझाईन तयार करा. यामुळे रांगोळी नैसर्गिक सुगंध पसरतो आणि ऑफिसमधील वातावरण अधिक आनंदी होतं. फुलांच्या रांगोळी दिवे किंवा मेणबत्त्या ठेवून लुक आणखी आकर्षक करता येतो.

Office Rangoli Art
Office Rangoli Art

मॉडर्न आणि क्विक डिझाईन्स : आजकाल सोशल मीडियावर फ्रीहँड रांगोळी आणि डॉट पॅटर्न डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहेत. या डिझाईन्ससाठी फार मोठा वेळ लागत नाही. तुम्ही साधे गोल, वर्तुळ, पानं किंवा हार्ट शेप आकाराचे डिझाईन तयार करू शकता. पांढऱ्या चॉकने आधी डिझाईन आखा आणि नंतर रंग भरा. आधुनिक लुकसाठी ग्लिटर पावडर किंवा मोत्यांच्या कणांनी बॉर्डर सजवा. (Office Rangoli Designs)

===================

हे देखील वाचा :

Rama Ekadashi 2025 : १७ ऑक्टोबरला साजरी होणारी पवित्र एकादशी! जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त, कथा आणि उपाय                                    

Diwali 2025: लक्ष्मीपूजन जाणून घ्या योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त, देवी लक्ष्मीला कसे कराल प्रसन्न!                                    

Diwali 2025: दिवाळीचे ५ दिवस प्रत्येक दिवस सांगतो शुभत्व, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा अर्थ!                                    

=====================

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....