Home राष्ट्रीय Airport : देशातील ‘ही’ विमानतळं बंद, विमान प्रवास करण्याच्या नियमांमध्ये बदल
राष्ट्रीयराष्ट्रीय

Airport : देशातील ‘ही’ विमानतळं बंद, विमान प्रवास करण्याच्या नियमांमध्ये बदल

14
Airport

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर‘ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेमुळे पाकिस्तान चांगलाच चवताळला आणि त्याने आपल्या बॉर्डरवर अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि यामुळे १६ भारतीय नागरिक आणि एक जवान शहीद झाले. याला भारताने सडेतोड उत्तर दिले आणि पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ले सुरु केले. पाकिस्तानने भारतावर डागल्या क्षेपणास्त्रांना देखील भारताने रोखले. यामुळं बुधवारी उत्तर आणि पश्चिम भारतातील विमान वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. (Airports)

या जटिल परिस्थितीमध्ये भारत जरी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत असला तरी भारताने देखील या युद्धामध्ये खबरदारीचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. विविध बाजुंनी भारत स्वतःला अधिक मजबूत करत देशवासियांचे रक्षण करण्यास उपाययोजना करत आहे. यातलाच एक खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने देशातील काही विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे तर २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. श्रीनगरसह किमान २६ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. (Marathi Top News)

 

Airport

भारत-पाकिस्तान तणावानंतर, ८ राज्यांमधील २९ विमानतळ १० मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत. ही राज्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आहेत. गुरुवारी दिल्ली विमानतळावरील ९० उड्डाणे रद्द करण्यात आली. पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, नागरी विमान वाहतूक विभागाने एक नवीन आदेश जारी केला आहे. आता प्रवाशांना विमानं प्रवास करताना दुहेरी सुरक्षा तपासणीतून जावे लागेल. याबाबत एअर इंडिया, अकासा, स्पाइसजेट आणि इंडिगो एअरलाइन्सनीही विमानतळावर ३ तास ​​आधी पोहोचण्यास सांगितले आहे. (Marathi Trending News)

ही विमानतळं राहणार बंद
बिकानेर, चंदीगड, धर्मशाळा, ग्वाल्हेर, जम्मू, जोधपूर, किशनगड, लेह, राजकोट, श्रीनगर,लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा, जामनगर , भुंतर, गंगाल, कुल्लू, लुधियाना, भटिंडा, हलवारा, हिसार, हिंडन, मुद्रा, पोरबंदर, कांगला, कशोद, भुज

Airport

दरम्यान दुसरीकडे विमान प्रवास करण्याच्या नियमात देखील काही बदल करण्यात आले आहे. एअर इंडियानं गुरुवारी रात्री एक निवेदन जारी करून प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना केली आहे. एअर इंडियानं एक्स या त्यांच्या सोशल अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोनं विमानतळावर वाढीव सुरक्षा उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देशभरातील विमान प्रवाशांना सुरळीत चेक-इन आणि बोर्डिंग सुनिश्चित करण्यासाठी किमान तीन तास आधी विमानतळांवर पोहोचणं आवश्यक आहे. चेक-इनची प्रक्रिया ही प्रस्थानाच्या ७५ मिनिटे आधी बंद होणार आहे. (Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा : Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल

War : पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद

=======

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांच्या मृत्यूचा बदला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानच्या घरात घुसून घेतला. पाकिस्तानच्या शरणात असलेल्या तब्बल ९ दहशतवादी तळांना भारतानं उध्वस्त करत मागील अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या एकदम वचपा काढला आहे. याच मिशनमुळे पाकिस्तान आता भारतावर हल्ला करत आहे. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या लाहोर, पेशावर, रावळपिंडी या शहरांपर्यंत आत जात पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. (Top Stories)

Recent Posts

Related Articles

S. L. Bhyrappa
राष्ट्रीय

S. L. Bhyrappa : ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

साहित्यविश्वातून एक दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा...

Stray Dogs
राष्ट्रीयराष्ट्रीय

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे...

Independence Day | Todays Marathi News
राष्ट्रीयराष्ट्रीय

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५...

AirForce
राष्ट्रीयराष्ट्रीय

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली...