Home लाईफ स्टाईल घरात नवजात बाळ असेल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
लाईफ स्टाईल

घरात नवजात बाळ असेल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

8
New Born Care Tips
New Born Care Tips

घरात नवजात बाळ असेल तर उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण होते. त्याची खास काळजी सुद्धा घेतली जाते. परंतु तरीही काही वेळेस त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तुमच्या घरी सुद्धा नवजात बाळ असेल तर काही गोष्टींची जरुर काळजी घ्या. खरंतर लहान मुलं ही फार सेन्सेटिव असतात. तुमची लहानशी चुक सुद्धा मुलाला समस्येत टाकू शकते. त्यामुळे लहान मुलाची काळजी घेण्यासाठी काही सोप्प्या टीप्स आम्ही सांगणार आहोत.(New Born Care Tips)

-हँन्ड वॉश करा
नवजात बाळाला उचलून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. परंतु त्या बाळाला हात लावण्यापूर्वी आपले हात धुणे विसरु नका. ज्यामुळे मुलाला इंन्फेक्शन अथवा कमजोर इम्युनिटीच्या समस्येपासून दूर राहता येईल. तुम्ही हात धुवून त्याला उचलून घेतल्यानंतर मुलाला बॅक्टेरियल आजारांपासून सुरक्षित राहता येईल.

-सावधगिरीने उचला
काही लोकांना लहान मुलांना नक्की कसे उचलून घ्यायचे हे माहिती नसते. खासकरुन पहिल्यांदाच आई झालेल्या महिलेला बाळाला कसे उचलावे याची चिंता असते. त्यामुळे कधी कधी त्याची मान लचकू शकते. अशातच बाळाला उचलताना डोकं आणि मानेच्या भागाची खास काळजी घ्यावी. अशातच तुम्ही घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तींना त्याबद्दल विचारा.

-मुलांना जास्त हलवू नका
लहान मुलांना झोपण्यासाठी किंवा रडत असेल तर शांत करण्यासाठी जोरजोरात हलवू नका. त्यामुळे मुलाचा रक्तपुरवठा प्रभावित होऊ शकतो. तसेच मुलाला हळूवारपणे हलवत तुम्ही झोपवू शकता.(New Born Care Tips)

-अंघोळ घालताना काही गोष्टी लक्षात ठेवा
नवजात बालकाला आंघोळ घालणे फार कठीण असते. यावेळी मुलाला श्वास घेण्यासंबंधित समस्या उद्भवू शकते. त्याचसोबत आंघोळ घालताना तुम्ही मुलाचे डोळे, नाक, कान आणि तोंडात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला व्यवस्थितीत त्याला आंघोळ घालता येत नसेल तर त्याला सुती कापडाने पुसा. पण आंघोळच घालायची असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्या.

हे देखील वाचा- मुलांना लहानपणापासून बचत करण्याची सवय लावण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

-बाळासमोर मोठ्याने बोलणे टाळा
घरात जेव्हा सर्व व्यक्ती एकत्रित असतात तेव्हा सतत एकमेकांशी बोलणे सुरु असते. अशातच त्यावेळी जर बाळ झोपले असेल किंवा जागे जरी असेल तरीही एकमेकांशी मोठमोठ्याने बोलणे टाळा. तुमच्या मोठ्या आवाजात बोलण्याने बाळ दचकू शकते आणि ते रडूही शकते.

-बाळाच्या कपड्यांबद्दल घ्या काळजी
बाळाला नेहमीच सुती कापड वापरावे असे सांगितले जाते. जेणेकरुन त्यांना रॅशसारख्या समस्यांपासून दूर ठेवता येईल. त्याचसोबत बाळाचे डायपरही मऊ असावे आणि अधिक घट्ट नसावे. ते वेळोवेळी तपासून पाहत रहा.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....