Home गाजावाजा स्पेशल National Flag Code मध्ये बदल, जाणून घ्या संबंधित महत्वाच्या गोष्टी
गाजावाजा स्पेशल

National Flag Code मध्ये बदल, जाणून घ्या संबंधित महत्वाच्या गोष्टी

12
National Flag Code
National Flag Code

यंदाच्या वर्षी आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच सरकारने ‘हर घर तिरंगा’ असे अभियान सुरु केले आहे. याच उद्देशाने सरकारने देशाच्या झेंड्यासंदर्भातील संहितेत बदल केला आहे. त्यानुसार आता तिरंगा सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस ही फडकण्याची परवानगी असणार आहे. तसेच पॉलिस्टर आणि मशीनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले ध्वज ही फडकवण्याची परवानगी असणार आहे. मात्र तुम्हाला फ्लॅग कोड आणि हर घर तिरंगा मागील उद्देष नक्की काय आहे हे माहिती आहे का? तर याबद्दलच जाणून घेऊयात अधिक.(National Flag Code)

फ्लॅग ऑफ कोडमध्ये नक्की कोणता बदल केलाय?
भारताच्या राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, फडकवणे किंवा उपयोग हा भारतीय झेंडा संहिता, २००२ आणि राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम, १९७१ अंतर्गत येते. २० जुलै २०२२ रोजी एक आदेश जाहीर करत भारतीय झेंडा संहिता, २००२ मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानंतर आता भारतीय झेंडा संहिता, २००२ च्या भाग दोनचा पॅरी २.२ खंड (११) ला आता पुढीलप्रमाणे वाचला जाणार आहे- जेथे झेंडा खुल्यात प्रदर्शित केला जाऊ शकतो किंवा कोणत्याही नागरिकाच्या घरात फडकवला जाईल तो दिवस-रात्र कधीची फडकवण्याची परवानगी असणार आहे. यापूर्वी तिरंगा फक्त सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत फडकवण्याची परवानगी होती. तसेच यापूर्वी मशीन किंवा पॉलिस्टरने तयार करण्यात आलेले ध्वज फडकवण्यास परवानगी नव्हती.

हे देखील वाचा- भारतातील राष्ट्रपती भवन उभारण्यामागील इतिहास तुम्हाला माहितेय का?

National Flag Code
National Flag Code

काय आहे हर घर तिरंगा अभियान
या अभियानाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जनतेच्या भागीदारीने २० कोटींहून अधिक घरांच्या छतांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. यामध्ये शासकीय आणि खासगी संस्थांचा सुद्धा समावेश असणार आहेत. या अभियानासंदर्भात प्रशासनाकडून जोरदार तयार केली जात आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केली आहेय त्यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारच्या झेंड्यांच्या उत्पादनाची व्यवस्था केली आहे. ते डाकघरात सुद्धा उपलब्ध असणार आहेत आणि लोक तिरंग्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी करु शकता.(National Flag Code)

-पुढील गोष्टींची काळजी घ्या
-झेंड्याचा वापर व्यावसायिक उद्देशाने करु नये
-एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तुला सलामी देण्यासाठी झेंडा झुकावला जाणार नाही
-झेंडाच्या वापर वर्दी किंवा पोषाकच्या रुपात केला जाणार नाही. झेंड्याचा रुमाल, उश्या किंवा अन्य कपड्यांवर ही तो छापला जाऊ शकत नाही
-झेंड्याचा वापर कोणत्याही भवनात पडदा म्हणून वापरण्यास बंदी असेल
-कोणत्याही प्रकारची जाहिरात, अधिसूचना किंवा अभिलेख हा ध्वजावर लिहिला जाऊ नये
-झेंडा हा वाहन, रेल्वेगाडी, बोट किंवा छत हे झाकण्यासाठीच्या कामासाठी वापरु नये
-कोणताही दुसरा झेंडा हा भारतीय झेंड्याच्या सोबत समान उंचीवर फडकवू नये

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....