Home आंतरराष्ट्रीय Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्ला यांची गगनभरारी, मिशन Axiom-4 साठी अंतराळात रवाना
आंतरराष्ट्रीय

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्ला यांची गगनभरारी, मिशन Axiom-4 साठी अंतराळात रवाना

8
Shubhanshu Shukla

आज भारतासाठी आणि संपूर्ण भारतीयांसाठी खूपच अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज अवकाशात रवाना झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या या प्रवासाची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती. मात्र विविध कारणांमुळे सहा वेळा हे मिशन पुढे ढकलण्यात आले. मात्र आज २५ जून रोजी इतिहास घडला आणि शुभांशु यांनी अवकाशात झेप घेतली. (Shubhanshu Shukla)

आज अखेर मोठया प्रतिक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांचे अन्य अंतराळवीर आज एक्सिओम-4 मिशनसाठी रवाना झाले. ते आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर जाणार आहेत. दुपारी १२.०१ मिनिटांनी मिशन लॉन्च झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकात जात आहेत. अवकाशात पोहोचल्यानंतर शुभांशू म्हणाले – व्हॉट ए राईड. प्रक्षेपण यशस्वी झाल्यावर शुभांशूचे पालक आशा शुक्ला आणि शंभू दयाळ शुक्ला भावूक झाले. (Marathi News)

बुधवारच्या संभाव्य उड्डाणासाठी हवामान ९० टक्के अनुकूल असल्याचे स्पेसएक्सने जाहीर केले होते. भारतीय वेळेनुसार दुपारी १२:०० वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून हे मिशन लाँच करण्यात आले. सर्व अंतराळवीर स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान सुमारे २८.५ तासांनंतर २६ जून रोजी दुपारी ४:३० वाजता आयएसएसशी जोडले जाईल. (Todays Marathi Headline)

Shubhanshu Shukla

शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता. एक्सिओम-4 हे स्पेसएक्सचे ५३ वे ड्रॅगन मिशन आहे आणि १५ वी मानवी अंतराळ मोहिम आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन (यूएसए), मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की (पोलंड) आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) हे देखील शुभांशु यांच्यासोबत अंतराळात गेले आहेत. ही मोहीम आधी ८ जून रोजी सुरू होणार होती पण खराब हवामानामुळे ती १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आज अखेर २५ जूनला शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात प्रस्थान केले. (Marathi Top News)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभांशु शुक्लाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत शुभांशु यांच्यासाठी खास संदेश दिला आहे. त्यानी लिहिले. “आम्ही भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना घेऊन गेलेल्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत करतो. भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या सोबत १.४ अब्ज भारतीयांच्या शुभेच्छा, आशा आणि आकांक्षा आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशाच्या हार्दिक शुभेच्छा!” (Marathi Latest News)

उड्डाण केल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळयानातून पहिला संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी सांगितले, “नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो, What a ride… ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत आणि ही एक अद्भुत राइड होती. सध्या आम्ही पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे, हा तिरंगा मला सांगत आहे की, मी एकटा नाही. ही माझ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासाची सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. सर्व देशवासीयांनी माझ्या या प्रवासाचा भाग व्हा. तुमची छाती अभिमानाने अजून फुगली पहिजे. तुम्हीही असाच उत्साह दाखवला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून भारताचा हा मानवी अंतराळ प्रवास करूया. धन्यवाद, जय हिंद, जय भारत.” (social Updates)

==========

हे देखील वाचा :  Moonsoon Tips : पावसाळ्यात डोकेदुखी ठरणाऱ्या माशांसाठी रामबाण उपाय

===========

तत्पूर्वी अ‍ॅक्स-४ मोहिमेचा मुख्य उद्देश अवकाशात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे आहे. हे अभियान खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील आहे आणि अ‍ॅक्सियम स्पेस नियोजनाचा एक भाग आहे. शुभांशू अवकाशात १४ दिवस राहतील आणि भारतीय शैक्षणिक संस्थांनी डिझाइन केलेले ७ प्रयोग करतील. यातील बहुतेक प्रयोग जैविक अभ्यासाचे असतील, जसे की अंतराळातील मानवी आरोग्यावर आणि जीवांवर होणारे परिणाम पाहणे. याशिवाय, ते नासासोबत आणखी ५ प्रयोग करतील, जे दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी डेटा गोळा करतील. (Top Stories)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...