Home मनोरंजन निखिल म्हणतोय गायत्री ‘नको हा बहाणा’!
मनोरंजन

निखिल म्हणतोय गायत्री ‘नको हा बहाणा’!

9
‘नको हा बहाणा’

फेबुवारी महिना आला की, तरुण-तरुणी आणि प्रमीयुगुलांचे लक्ष असते ते ‘डेज’ कडे. ७ फेबुवारी ते १४ फेबुवारी या दिवसांना ‘व्हॅलेंटाईन विक’ किंवा प्रेमाचा आठवडा असं म्हटलं जातं. या महिन्यात एकमेकांना गिफ्ट देणे, डेटवर जाणे, समुद्रकिनारी बसून गप्पा मारणे अशा अनेक माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करतात.

या आठवड्याची सुरुवात ‘रोझ डे’ म्हणजेच गुलाब देऊन केली जाते. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊ शकतो, मग ती व्यक्ती कोणीही असू शकते. त्यासाठी प्रियकर किंवा प्रेयसीचा असायला पाहिजे असे नाही. परंतु आता तसे दिसून येत नाही, आता हे ‘डेज’ फक्त आपल्याला तरुण तरुणी आपल्या जोडीदारासोबत साजरा करताना दिसतात.

फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाचे वारे वाहायला  लागतात. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर येणारा हा ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे कितीतरी जणांसाठी अगदी महत्त्वाचा दिवस असतो. ‘व्हॅलेंडाईन डे’ हा एकच दिवस असतो पण जवळजवळ महिनाभर याचे सेलिब्रेशन मात्र चालू असते. 

You Can't Miss Gayatri Datar's Vivacious Appeal In This Latest Photoshoot

जगातील प्रत्येक बंधन हे प्रेमाने बांधलेले असते. जर प्रेम नसेल तर आयुष्यात आनंद येऊ शकणार नाही. तसेच प्रेमाबाबत आपल्या मनातील गोष्टी या समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी कोणताही मुहूर्त बघितला जात नाही. प्रेमाचा आदर करणे, प्रेमाची भावना समजणे हा एक सुंदर अनुभव आहे. एकमेकांबरोबर आयुष्य काढताना अनेक चढ-उतार तर येतातच. 

पण त्याग, विश्वास आणि प्रेमाने हे आयुष्य एकत्र अप्रतिमरित्या निघून जाते आणि त्याच प्रेमाची वारंवार आठवण करून देणारा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. जे प्रेम तुम्ही तुमच्या मनात सतत अनुभवता, ते प्रेम तुम्ही ज्या व्यक्तीवर करता त्यांना सांगणे म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ परंतु ते प्रेम शब्दात मांडणे नक्कीच सोप्पे नसते.

प्रेमाचा हा अनुभव जेव्हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यात येतो त्या दिवसाला ‘व्हॅलेंटाईन डे’ असे म्हटले जाते. हा दिवस ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आयुष्यात प्रेम म्हणजेच सर्व काही आहे आणि त्यासाठी वेळ काढणेही महत्त्वाचे आहे. सध्या या धकाधकीच्या जिवनात वेळेची कमतरता खूपच भासते आणि म्हणूनच प्रेमाचा हा एक दिवस प्रेमी युगुलांना एकत्र वेळ देण्यासाठी योग्य ठरतो. कारण वेळ निघून गेली, तर ती परत येणार नाही हेच हा दिवस सांगत असतो.

====

हे देखील वाचा: ‘हे’ आहे शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचं व्हॅलेन्टाईन डेस्टिनेशन

====

येत्या १४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ चे अजून एक खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे याच दिवशी ‘झी म्युझिक’ मराठी अल्बम घेऊन येत आहे. एक नवीन मराठी म्युझिक अल्बम ‘नको हा बहाणा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यामध्ये अभिनेता निखिल चौधरी आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची गोड जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल, 

या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून सोशल मिडीयावर या गाण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे. गायत्रीने निखिल आणि तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जिवनात एक क्षण असा यावा. तुझ्या ओठावर हसू आणि माझा जीव जावा.

====

हे देखील वाचा: सोयरीक चित्रपटाच्या शानदार प्रिमियरला नामवंत कलाकारांची हजेरी.

====

निमिषा चौधरी प्रस्तुत ‘नको हा बहाणा’ हे गाणं सौरभ चौघुले यांनी दिग्दर्शित केले आहे. हे गाणे देव अहिरराव यांनी गायले आहे. त्यांनीच या गाण्याला संगित दिले आहे. तर गीतकार संकेत जाधव यांनी हे गाणे लिहीले आहे.

गायत्री दातारने ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून इंडस्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर ती ‘बिग बॉस’ मराठीमध्ये देखील दिसली. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या या नव्या गाण्याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...