Home लाईफ स्टाईल Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
लाईफ स्टाईल

Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’

10
Nagpanchami

अतिशय पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात तर सणांची नुसती रेलचेल असते. सण नसले तरी या महिन्यातला प्रत्येक दिवस सणासारखाच साजरा केला जातो. उद्या दीप अमावस्या झाल्यानंतर लगेच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. याच श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणून नागपंचमीची ओळख आहे. (Nagpanchami information)

श्रावण सुरु झाल्यानंतर लगेच पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नावावरूनच आपल्याला लक्षात आले असेल की, हा दिवस नागांची, सापांसाठी समर्पित आहे. नागपंचमीला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्व आहे. श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाहीत म्हणून नाग पंचमीच्या दिवशी नाग देवाची पूजा केली जाते. (Marathi NEws)

यंदा नागपंचमीचा सण २९ जुलै २०२५ रोजी मंगळवारी साजरा केला जाईल. नागपंचमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ०५:४१ ते ०८:२३ पर्यंत असेल. तिथीनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीला महिला नागाची, वारुळाची मनोभावे पूजा करतात. त्यांना दूध अर्पण करतात. नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप जुनी आहे. यादिवशी नागाच्या कथा ऐकल्या जातात. नागाला भाऊ समजून या दिवशी नागाची महिला मोठ्या आनंदाने पूजा करतात. नाग पंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात अशी मान्यता आहे. नागाला भगवान शिवाचे गण देखील मानले जाते. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. (Todays Marathi HEadline)

Nagpanchami

श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन शुचिर्भूत व्हावे आणि स्वच्छ, धुतलेले कपडे परिधान करावे. त्यानंतर नागाची पूजा करण्यासाठी बसावे. एका पाटावर किंवा चौरंगावर नागदेवतेचे चित्र काढावे (रांगोळीने देखील नाग देवता काढलेली चालते) किंवा मातीपासून बनवलेल्या नागाची मुर्ती घरी आणावी. त्यानंतर त्याची पूजा करावी. प्रथम नाग देवतेला हळद, कुंकू वाहावे त्यानंतर तांदूळ आणि फुले इत्यादी गोष्टी अर्पण कराव्या. त्यानंतर दूध, तूप, साखर वापरुन त्याचा नैवेद्य नागोबाला लावावा. पूजा करुन झाल्यानंतर नागपंचमीची कथा ऐकावी किंवा वाचावी आणि आरती करुन पूजेची समाप्ती करावी. या दिवशी महिला आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. अनेक ठिकाणी नागपंचमीला नागांची राणी मनसा देवीची पूजा देखील विधिवत केली जाते. अनेक ठिकाणी ग्रामिण भागात नागाच्या वारूळाची देखील पूजा केली जाते. (Top Marathi Headline)

यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. त्यांना बेलपत्र अर्पण करावे. नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख या नागांच्या आठ रूपांची पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी मनोभावे नागाची पूजा केल्यास जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तो निघून जातो अशी मान्यता आहे. शिवाय या नागपंचमीच्या दिवशी नववधू माहेरी येतात. झाडांना झोके बांधले जातात आणि बायका झोके घेण्याचा आनंद घेतात. (Top Trending NEws)

नाग पंचमी पूजा मंत्र
सर्वे नागा : प्रियंता मी ये केचित पृथ्वीतले ।
ये च हेलमारिचिष्ठ येयन्त्रे दिवि संस्थितः ।
ये नाडीषु महानगा ये सरस्वतीगामिन ।
ये च वापितदगेषु तेषु सर्वेषु वै नमः ।

नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत. ज्यात सत्येश्वरी देवीची कथा देखील आहे. सत्येश्वरीला एक भाऊ होता. सत्येश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरचा अकस्मित मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. तिने अन्नत्याग केला होता. त्याचवेळी तिला सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या. (Latest Marathi News)

=========

हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?

 Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

=========

नागपंचमीच्या दिवशी काय करावे
नागपंचमीच्या दिवशीही उपवास करावा. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु केतू भारी आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी. नागदेवतेला दूध, मिठाई आणि फुलं अर्पण करावीत. लक्षात ठेवा की, नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये, यासाठी तांब्याचं भांडं वापरावं. दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत. (Top Stories)

नागपंचमीच्या दिवशी काय करू नये
नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे. जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका. शेतात नांगरणी, जमीन खोदणं अशी कामं करू नका. याशिवाय सुई धागा वापरणे देखील यादिवशी अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी वृक्षतोड करू नका. या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर, गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....