Home गाजावाजा स्पेशल भारतातील ‘या’ रहस्यमी ठिकाणाहून वर्षभर निघत राहते उकळते पाणी
गाजावाजा स्पेशल

भारतातील ‘या’ रहस्यमी ठिकाणाहून वर्षभर निघत राहते उकळते पाणी

8
Mysterious place
Mysterious place

भारतातील अशी काही ठिकाणे आहेत जेथे काही ना काही अद्भूत आणि दुर्मिळ गोष्टी पहायला मिळतात. अशाच काही नद्या आहेत. ज्याबद्दल विविध मान्यता आहेत. आज आपण अशा एका ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जेथे १२ महिने तेथील पाणी गरम असते. ही रहस्यमयी जागा छत्तीसगढ येथील बलरामपुर जिल्ह्यात आहे. ही एक अशी जागा आहे जेथे जमीनीतून १२ महिने गरम पाणी निघत राहते. असे म्हटले जाते की,हे पाणी ऐवढे गरम असते की त्यात सहज तांदूळ शिजला जाईल. येथील गरम पाणी पाहण्यासाठी खुप गर्दी होते. (Mysterious place)

हे ठिकाण बलरामपूर जिल्ह्यापासून जवळजवळ १२ कमी दूर तातापानी नावाने ओळखली जाते. नैसर्गिक रुपात निघणारे गरम पाणी देशभरात प्रसिद्ध आहे. तातापानी नाव ठेवण्यामागे याचे एक वेगळेच महत्त्व आहे. ताता याचा अर्थ असा होतो की गरम आणि पाण्याचा अर्थ होतो जल. येथे नेहमीच गरम पाणी निघत असल्याने त्याचे नाव तातापानी असे ठेवले आहे.

तातापानी - विकिपीडिया

अशी आहे मान्यता
या अद्भूत ठिकाणाबद्दल असे मानले जाते की, भगवान श्री रामांनी एकदा खेळता खेळता सीतेच्या दिशेला एक दगड फेकला होता. जे सीतेच्या हातात असलेल्या गरम तेलाच्या भांड्याला लागला. त्यामुळे थोडेसे तेल जमिनीवर पडले. तेथे तेलाचे थेंब पडल्याने तेथून गरम पाणी बाहेर येऊ लागले. या ठिकाणाबद्दल असे ही म्हटले जाते की, येथील गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्किन संदर्भातील समस्या दूर होतात. (Mysterious place)

चारशे वर्ष जुन्या शंकराच्या मुर्तीचे महत्त्व
हे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी आणि याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी देशभरातून लोक येतात. या ठिकाणाजवळ एक शिव मंदिर आहे. जेथे चारशे वर्ष जुनी शंकराची मुर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. मकर संक्रातीनिमित या मंदिरात फार गर्दी होते. ऐवढेच नव्हे तर मोठ्या जत्रेचे आयोजन यावेळी केले जाते.


हेही वाचा- सोन्यापेक्षा सापाचे विष महागडे, 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल हैराण

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....