Home लाईफ स्टाईल मुल्तानी मातीचा असा करा वापर, वाढेल सौंदर्य
लाईफ स्टाईल

मुल्तानी मातीचा असा करा वापर, वाढेल सौंदर्य

10
Homemade face powder
Homemade face powder

Multani Mitti Remedies : प्रत्येक महिलेला आपण अधिक सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण कालांतराने पुन्हा चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. अशातच तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. चेहऱ्यावरील डाग-पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी मुल्तानी मातीचा वापर करू शकता. यामध्ये काही गोष्टी मिक्स केल्यानंतर चेहऱ्याला त्याचा फेसपॅक लावल्यास नक्कीच चेहरा उजळ होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी पुढील वस्तूंचा करा वापर
-मुल्तानी माती
-मध
-पपई

असा तयार करा फेसपॅक
-सर्वप्रथम स्मॅश केलेल्या पपईत एक चमचा मुल्तानी माती मिक्स करा.
-आता एक चमचा मध मिक्स करा.
-फेस पॅक अधिक घट्ट झाल्यास यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा
-काही मिनिटे फेस पॅक चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर चेहरा धुवा
-काही दिवसात चेहरा उजळ होईल (Multani Mitti Remedies)

मुल्तानी माती आणि पपईच्या फेस पॅकचे फायदे
-एक्ने आणि पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी मुल्तानी माती वापरू शकता.
-चेहऱ्यावरील डेड स्किन आणि तेल कमी होईल.
-मुल्तानी माती त्वचेला आतमधून पोषण देते.
-पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असते. यामुळे त्वचेवरील डेड स्किन दूर करण्यासह टॅनिंगची समस्या दूर होते.
-पपईत अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे डाग-पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहू शकता.


आणखी वाचा :
फाउंडेशन लावल्यानंतरच चेहरा जाड दिसतो? जाणून घ्या परफेक्ट शेप देण्याची सोपी पद्धत
तेलकट त्वचेवरील मेकअप निघून जातो? लक्षात ठेवा या टिप्स

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....