Home मनोरंजन सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार हे 3 मोठे सिनेमे
मनोरंजन

सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार हे 3 मोठे सिनेमे

10
Movies Release on September
Movies Release on September

Movies Release in September : वर्ष 2024 मध्ये गेल्या काही महिन्यांआधी इंडस्ट्रीमध्ये दिग्गज कलाकारांचे काही सिनेमे प्रदर्शित झाले. या सिनेमांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. अशातच येत्या सप्टेंबर महिन्यात तीन टॉप सिनेमे समोर येणार आहेत. दरम्यान, सिनेमातील स्टार कास्ट ते कथेमध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर कोणते सिनेमे प्रदर्शित होणार याबद्दल अधिक….

द बकिंघम मर्डर
करिना कपूरचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘द बकिंघम मर्डर’ सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात ऐश टंडन, रणवीर बरार, कीथ एलन आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

इमरजेंसी
वर्ष 1975 मध्ये भारतात लावण्यात आलेल्या इमरजेंचीच्या काळावर आधारित असणारा कंगना राणौतचा आगामी सिनेमा ‘इमरजेंसी’ रिलीज होणार आहे. सिनेमा प्रेक्षकांना 6 सप्टेंबरपासून सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन कंगना राणौतने केले आहे. कंगनाव्यतिरिक्त सिनेमात श्रेयस तळपडे, अनुपम खेर, मिलिंद सोमण आणि महिला चौधरी झळकणार आहे.

देवरा पार्ट-1
ज्युनियर एनटीआर स्टारर ‘देवरा पार्ट-1’ सिनेमा येत्या 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमात ज्युनियर एनटीआरसह हिंदी सिनेमातील अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान झळकणार आहे. (Movies Release in September)

हे देखील सिनेमे होणार रिलीज
या तीन सिनेमांव्यतिरिक्त बॉक्स ऑफिसवर ‘हॅप्पी टीचर्स डे’, ‘द इमोर्टल’, ‘अश्वत्थामा’, ’26 ब्लॅक नोव्हेंबर’, ‘हवा सिंह’, ‘इति’ असे सिनेमे रिलीज होणार आहेत. याशिवाय राजकुमार रावचा सिनेमा ‘सेकंड इनिंग’, रितेश देशमुखचा ‘विस्फोट’, प्रभासचा ‘स्पिरिट’ आणि अनुष्का शर्माचा ‘चकदा एक्सप्रेस’ प्रदर्शित होणार आहे.


आणखी वाचा :
अभिनयाआधी एकेकाळी कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा कपूर
‘मी जिवंत आहे’ श्रेयस तळपदेने केली संतापजनक पोस्ट

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...