Home लाईफ स्टाईल पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय? अशी घ्या स्वत:ची काळजी
लाईफ स्टाईल

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय? अशी घ्या स्वत:ची काळजी

11
Monsoon Trek
Monsoon Trek

Monsoon trekking tips : पावसाळा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा उत्कट अनुभव घेण्याची उत्तम वेळ. हिरवीगार डोंगररांगा, गड-किल्ल्यांवरील धुक्याची चादर, वाहणारे झरे आणि गाजणारा सन्नाटा हे सर्व काही ट्रेकर्ससाठी एक जणू पर्वणीच असते. मात्र, पावसाळ्यातील ऋतूमध्ये ट्रेकिंग करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसामुळे रस्ते निसरडे होतात, धुक्यामुळे दृश्यता कमी होते आणि काहीवेळा अचानक हवामानही बिघडू शकते. म्हणूनच, सुरक्षित आणि आनंददायी ट्रेकसाठी खालील काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

योग्य फूटवेअर निवडा:
पावसाळ्यात जमिनीवर चिखल, गळकी पाने आणि निसरडे दगड असतात. त्यामुळे ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज वापरणे फार महत्त्वाचे आहे. जलरोधक बूट घेतल्यास पाणी आत जाऊन पाय ओले होण्याची शक्यता कमी होते. ओलेपणामुळे पायाला फोड येणे किंवा घसरण्याची शक्यता वाढते.

पावसासाठी योग्य कपडे निवडा:
पावसाळ्यात सिंथेटिक किंवा ड्राय-फिट कपडे वापरावेत. हे कपडे लवकर सुकतात आणि अंगाला चिकटत नाहीत. कापसाचे कपडे टाळावेत कारण ते ओले झाल्यास वजन वाढते आणि सर्दी होऊ शकते. याशिवाय, रेनकोट किंवा पोनचो बरोबर ठेवावा. हवा असल्यास एका हलक्याफुलक्या जॅकेटची जोड घ्या.

Monsoon Trek
Monsoon Trek

सॅक व सामान सुरक्षित ठेवा:
सर्व आवश्यक सामान वॉटरप्रूफ बॅग किंवा बॅग कव्हरमध्ये ठेवा. पावसामुळे मोबाइल, ओळखपत्र, खाद्यपदार्थ आणि कपडे खराब होऊ शकतात. झिप लॉक बॅग्ज किंवा प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू ठेवल्यास संरक्षण होईल.(Monsoon trekking tips)

गरजेचे औषध व प्राथमिक उपचार साहित्य: 
पावसाळ्यात चावणारे कीटक, पायाला इजा होणे किंवा सर्दी-ताप होणे सामान्य आहे. त्यामुळे पेन किलर, बॅंडेज, अँटीसेप्टिक, औषधे, ORS, आणि इतर वैयक्तिक औषधे बरोबर ठेवा.

हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवा: 
ट्रेकिंग दरम्यान शरीराला ऊर्जा लागते. त्यामुळे सुके मेवे, चॉकलेट, एनर्जी बार्स आणि पाणी हे जवळ असणे आवश्यक आहे. बाहेरून वाहणारे पाणी प्यायचे टाळा.जेणेकरुन आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत होईल.

============

हे ही वाचा : 

पायांना येणाऱ्या दुर्गंधीवर घरगुती उपाय, वाचा टिप्स

पावसाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते हेअर मास्क लावावेत?

===========

हवामानाची माहिती आधी घ्या:
ट्रेकला निघण्यापूर्वी हवामानाचा अंदाज पाहणे आवश्यक आहे. मुसळधार पावसाच्या किंवा ढगफुटीच्या इशाऱ्यांदरम्यान ट्रेक टाळावा. अशा हवामानात ट्रेकिंग धोकादायक ठरू शकते.

ग्रुपमध्ये ट्रेक करा
पावसाळ्यात ट्रेल्स स्पष्ट दिसत नाहीत. हरवण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अनुभवी गाईड बरोबर असावा आणि शक्यतो ग्रुपमध्ये ट्रेक करावा. मोबाईल नेटवर्क नसल्यास एकमेकांशी संपर्क ठेवणं महत्त्वाचं ठरतं.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....