Home व्यक्ती विशेष मॉडेल, एअर हॉस्टेस ते वीरंगणा – नीरजा भनोत
व्यक्ती विशेष

मॉडेल, एअर हॉस्टेस ते वीरंगणा – नीरजा भनोत

7
Neerja Bhanot | K Facts

नीरजा भनोतचा जन्म चंदीगढमध्ये झाला. आई रमा भनोत आणि वडिल हरीश भनोत यांची मुलगी नीरजा. हरीश भनोत हे मुंबईमध्ये पत्रकार होते. नीरजाचे शिक्षण चंदीगडमधील ‘सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूल’, मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि सेंट झेविअर्स महाविद्यालय येथून झाले. नीरजाने क्रॅक जॅक बिस्कट, गोदरेज बेस्टो, अमूल सारख्या जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम केले आहे.

मार्च १९८५ मध्ये नीरजाचे लग्न झाले. पतीसोबत ती गल्फमध्ये स्थायिक झाली. पण हुंडा मागणीच्या दबावामुळे ती दोन महिन्यातच माहेरी मुंबईला परतली. नंतर तिने पॅन ॲम कंपनीत एअर हॉस्टेस पदाससाठी अर्ज केला. निवड झाल्यानंतर ती काही काळ मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली. आणि पॅन ॲममध्ये कंपनीत रुजू झाली.

अखेर तो ‘काळा दिवस’ अखेर उजाडला. म्हणजेच आजचा दिवस ५ सप्टेंबर १९८६.

पाकिस्तानमधील कराची विमानतळावर मुंबई ते अमेरिका जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइन्सच्या विमानाला ४ अतिरेक्यांनी वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्रायलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धडकावयाचे होते.

नीरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचवले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात अंधार पसरला. या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या.

ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो एक अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच नीरजाला वीरमरण आले.

‘अशोक चक्र’ ही वीरता पदवी- नीरजा भनोत

अवघ्या २१ व्या वर्षी ‘अशोक चक्र’ ही वीरता पदवी मिळणारी नीरजा भनोत पहिली भारतीय महिला आहे. पाकिस्तानने ‘तमगा-ए-इन्सानियत’ हा सर्वोच्च पुरस्कार दिला. अमेरिकेने ‘जस्टिस फॉर व्हिक्टम ऑफ क्राईम ॲवार्ड’ हा वीरता पुरस्कार देऊन नीरजाला सन्मानित केले.

नीरजाचं प्रेम हे फक्त भारत देशापुरतं मर्यादित नव्हतं. समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव तीला होती. म्हणूनच यातून घडला तीचा प्रेरणादायी आणि थक्क करणारा प्रवास.

‘वीरंगणा नीरजा भनोत’च्या कर्तृत्वाला ‘कलाकृती मिडीया’चा मानाज मुजरा!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Akbar
व्यक्ती विशेष

Mughal Emperor: मुघल इतिहासातील सर्वाधिक विवाह करणारा सम्राट!

Mughal Emperor And Marriage : भारतीय इतिहासात मुघल साम्राज्य हे वैभव, सत्ता...

Premchand Roychand Jain
व्यक्ती विशेष

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजाराचा पाया रचणाऱ्या महान उद्योगपतींपैकी एक...

abdul samad khan
व्यक्ती विशेष

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान कोण होते? मुघलांशी काय होते कनेक्शन? घ्या जाणून

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान हे १८व्या शतकातील मुघल साम्राज्यातील एक...

Thailand | Top Marathi Headlines
व्यक्ती विशेष

Thailand : थायलँडमध्ये थाय मसाज देण्यासाठी डॉ. शिवगो यांनी असा लावला शोध, वाचा रंजक गोष्ट

Thailand : थायलँडमध्ये ‘थाय मसाज’ ही एक प्राचीन आणि प्रभावी उपचारपद्धत म्हणून...