Home गाजावाजा स्पेशल पार्टनर जर वारंवार ‘या’ चुका करत असेल तर दुर्लक्ष करू नका
गाजावाजा स्पेशल

पार्टनर जर वारंवार ‘या’ चुका करत असेल तर दुर्लक्ष करू नका

11
Relationship Tips
Relationship Tips

प्रत्येकजण आयुष्यात चुका करतं, ही एक सामान्य बाब आहे. माणूस चुकांमधून शिकतो असे आपण म्हणतो. परंतु रिलेशनशिपमध्ये जेव्हा पार्टनरकडून एखादी चुक होते तेव्हा त्यावर वाद घालण्याऐवजी चुक माफ करून पुढे गेले पाहिजे. तरच नाते दीर्घकाळ टिकू शकते. मात्र जर तुमचा पार्टनर काही चुका सतत करत असेल तर याबद्दल जरूर विचार करा. (Mistakes in relationship)

चुका सतत झाल्यास मनात संशयाची भावना निर्माण होते. अशातच नात्यात वारंवार वाद होऊ लागतात. त्याचसोबत रिलेशनशिपचा ताण अधिक वाढला जातोच, पण असे नाते दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे तुमचा पार्टनर जर सतत पुढील काही चुका करत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका.

-वारंवार खोटं बोलणे
नाते हे विश्वासाच्या धाग्यावर अवलंबून असते. मात्र जर तुमचा पार्टनर वारंवार तुमच्याशी खोटं बोलत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. नात्यात वाद वाढले जातात आणि या स्थितीतून बाहेर पडणे कठीण होऊन जातो. अशातच पार्टनरला खरं बोलण्यास सांग. पण एकच चुक तो सतत करत असेल तर त्याच्यापासून दूर झालेलेच बरे.

-तुमच्या फोन कॉल्स-मेसेजकडे दुर्लक्ष करणे
तुम्ही कधी नोटिस केलयं का, तुमचा पार्टनर कधीकधी तुमचे फोन किंवा मेसेज आले तरीही त्याकडे पाहत नाही. दुर्लक्ष करतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल तर या बद्दल विचार करा. समजून जा पार्टनर तुम्हाला अधिक महत्त्व देऊ पाहत नाही. असे एकतर्फी प्रेमाचे नाते दीर्घकाळ टिकवून ठेवणे मुश्किल होते.

-सतत भांडण करणे
नात्यात वाद-भांडण होणे सामान्य आहे. मात्र तुमचा पार्टनर अगदी लहान-लहान गोष्टीवरुन सुद्धा तुमच्याशी भांडत असेल तर तुम्ही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात हे समजून घ्या. अशा पार्टनर सोबत आयुष्य घालवण्याचा विचार करण्यापू्र्वी तुम्ही सुरक्षित आहात का हे पहा. (Mistakes in relationship)

-फसवत असेल तर
जर पार्टनर तुम्हाला काही कारणं देऊन तुम्हाला भेटणे टाळतोय तर वेळीच सावध व्हा. तो तुम्हाला फसवू सुद्धा शकतो. अशातच पार्टनर नक्की असे का करतोय आणि त्याला रिलेशनशिप दीर्घकाळ टिकवायचे आहे की नाही हे आधीच स्पष्ट करा.

हेही वाचा- माहेरच्या व्यक्तींशी नवऱ्याचे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

-एक्स पार्टनरबद्दल सतत बोलत राहणे
जर तुमचा पार्टनर सतत एक्स बद्दलच्या गोष्टी तुमच्यासोबत करत असेल तर याकडे लक्ष द्या. असे ही होऊ शकते की, त्याला एक्स पार्टनरसोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये यायचे असेल. यामुळेच तो तुमच्याशी कधीकधी खोटेपणाने सुद्धा वागेल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....