मिशा अग्रवाल एक एलएलबीचं शिक्षण घेतलेली आणि प्रोव्हिन्शियल सिव्हिल सर्व्हिसेस-ज्युडिशियलची तयारी करत असलेली विद्यार्थिनी. पण या सोबतच ती एक इन्फ्लुएंसर सुद्धा होती. खूप मेहनतीने तिने १०k ,५०k,१००k असं करत लाखों फॉलोवर्सचा टप्पा गाठला. पण तिच्या 25 व्या वाढदिवसाच्या अवघ्या दोन दिवस आधी तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. याने सगळ्यांनाच धक्का बसला. पण तिचं आत्महत्येच कारण आणखीच धक्कादायक आहे. इंस्टाग्रामवर कमी होत चाललेले फॉलोअर्स आणि त्यामुळे आलेलं डिप्रेशन! यामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणाबद्दल जाणून घेऊ. (Misha Agarwal)
26 एप्रिल रोजी मिशाच्या वाढदिवशी तिच्या फॅमिलीने एक पोस्ट करत, तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. तिच्या कुटुंबीयांनी Depression हे तिच्या मृत्यूचं कारण असल्याचंही पोस्टमध्ये सांगितलं आहे. आपले Followers हेच आपलं जग मानणारी मिशा कमी होत असलेल्या Followers मुळे Depression मध्ये गेली.

३० एप्रिलला मिशाच्या बहिणीने मिशाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मिशाच्या फोनचा वॉलपेपर दिसत आहे. ज्यामध्ये मिशाची इन्स्टा प्रोफाईल आणि आणि त्यात 10 लाख फॉलोअर्स दिसत आहेत. हा फोटो शेअर करतच मिशाच्या बहिणीनं एक लांबलचक पोस्ट लिहिली. त्यात असं म्हटलंय की, “माझ्या धाकट्या बहिणीनं इंस्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्सभोवतीच तिचं जग निर्माण केलं होतं, तिचं एकमेव लक्ष्य 10 लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचणं आणि फॅन्स मिळवणं होतं. ज्यावेळी तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले, त्यावेळी ती अस्वस्थ झाली आणि तिला खूप वाईट वाटू लागलं. आपण काहीच करू शकत नाही, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. एप्रिलपासूनच ती खूप दुःखी होती, ती अनेकदा मला मिठी मारून रडायची आणि म्हणायची, माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन? माझं करियर संपून जाईल. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केलेला, तिला मी वारंवार समजावून सांगितलं की, हे तिचं संपूर्ण जग नाही, हा फक्त एक साईड जॉब आहे आणि हा काही शेवट नाही. मी तिला तिच्या LLB पदवी आणि PCS-J तयारीची आठवण करून दिली,, तिला सांगितलं की, ती एक दिवस जज होईल आणि तिला तिच्या करिअरची काळजी करण्याची गरज नाही. मी तिला सल्ला दिला की, इन्स्टाग्रामकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहा आणि त्याला तुझ्यावर वर्चस्व गाजवू देऊ नको. मी तिला तिच्या आनंदावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं, तसंच चिंता आणि नैराश्य सोडून देण्यास सांगितलं.पण दुर्दैवानं, माझ्या धाकट्या बहिणीनं माझं ऐकलं नाही आणि ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्समध्ये इतकी हरवून गेली की, ती कायमची आपल्या जगाचा निरोप घेऊन गेली. ती इतकी निराश झाली की, तिनं स्वतःचा जीव घेतला, ज्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं.”(Misha Agarwal)
पुढे कॅप्शनमध्ये लिहलंय की ‘तिच्या फोनचा वॉलपेपरच खूप काही सांगून जातो. हेच तिच्या आयुष्याचं एकमेव टार्गेट होतं. इंस्टाग्राम हे खरं जग नाही आणि फॉलोअर्स हे खरं प्रेमही नाही, कृपया हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.’ यावर अनेकांनी वेगवेगळ्या कंमेंट केल्यात. अनेकांनी फक्त followers हे खरं कारण नसून आणखीनही काहीतरी कारण असणार असं म्हटलं आहे. त्यांनी वैयक्तिक किंवा भावनिक समस्यांचा उल्लेख केला, ती इतकी पॉसिटीव्ह कन्टेन्ट करत होती, तिचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता, असंही अनेकांचं मत आहे. कमी वयात ती खूप मॅच्युअर होती त्यामुळे ती असं कारण अशक्य असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.(Misha Agarwal)
=================
हे देखील वाचा : Sugarcane : रसवंतीगृहांची नावं ‘नवनाथ’ आणि ‘कानिफनाथ’च का असतात?
=================
या एका घटनेने सोशल मीडियाच्या चमकत्या दुनियेमागचा अंधार समोर आलाय. पण ही अशी एकच घटना नाहीये. याआधीही जगभरात सोशल मीडियाशी संबंधित अनेक आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. जून 2020 मध्ये 16 वर्षीय भारतीय टिकटॉक स्टार सिया कक्कर हिने ऑनलाइन छळ आणि सायबरबुलिंगमुळे आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूने भारतात सोशल मीडिया फेमच्या दबावावर आणि मानसिक आरोग्यावर चर्चा सुरू झाली. 22 वर्षीय जपानी प्रोफेशनल रेसलर आणि टेरेस हाऊस या रिअॅलिटी शोची स्टार हाना किमुरा हिने मे 2020 मध्ये आत्महत्या केली. शोमधील तिच्या वागण्यावरून चाहत्यांनीतिला तिला “मर जा” “गायब हो” अशा कंमेंट्स केल्या. या छळामुळे तिचं मानसिक आरोग्य खालावलं. तिच्या मृत्यूनंतर जपानने सायबरबुलिंगविरोधी कायदे कठोर केले.18 वर्षीय अमेरिकन टिकटॉक स्टार दाझारिया शॅफर हिने सोशल मीडियावरील negative कमेंट्स सहन न झाल्याने आत्महत्या केली होती. (Misha Agarwal)
या सर्व घटना सोशल मीडियाची काळी बाजू दाखवतात, जी अतिशय वाईट आहे. त्यामुळे as a content creator किंवा as a audience आपल्याला हे कळलं पाहिजे की सोशल मीडिया हे जग नाहीये. ते फक्त एक मनोरंजनाचं साधन आहे. त्याला तितपतच मर्यादित ठेवलं पाहिजे. नाहीतर मग हे असं काहीतरी होऊन बसतं.
- comparison culture on instagram
- depression behind filters
- depression in influencers
- digital validation crisis
- fake smiles online
- gajawaja misha agarwal
- gajawaja video
- how social media affects mental health
- impact of likes and followers
- influencer anxiety
- influencer breakdown
- influencer burnout
- influencer loneliness
- influencer mental health
- influencer suicide india
- instagram and mental illness
- instagram dark reality
- instagram fame depression
- instagram pressure on youth
- instagram toxicity
- life behind instagram posts
- mental health awareness
- misha agarwal case explained
- misha agarwal death case
- misha agarwal suicide
- online fame pressure
- online life pressure
- pressure of followers
- psychological effect of social media
- sad story influencer india
- social media addiction
- social media and depression
- social media dangers 2025
- social media suicide cases
- tragic story of influencer
- truth of social media fame
- young influencers suicide