Home मनोरंजन Mirzapur Season 3 मध्ये होणार पंचायतमधील या स्टारची एण्ट्री, अली फजलने केला खुलासा
मनोरंजन

Mirzapur Season 3 मध्ये होणार पंचायतमधील या स्टारची एण्ट्री, अली फजलने केला खुलासा

10
Mirzapur Season 3
Mirzapur Season 3

Mirzapur Season 3 :  मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. प्रत्येकजण रिलीज डेट जवळ येण्याची वाट पाहत आहे. मिर्झापूरचे याआधीच्या दोन सीझनने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. अशातच तिसऱ्या सीझनमध्ये काय होणार हे पाहण्यास प्रेक्षक आतुर आहेत. काही दिवसांपूर्वी सीरिजचा एक टीझर लाँच केला होता. त्यानंतर आता मिर्झापूरमध्ये पंचायत-3 मधील स्टार एण्ट्री करणार असल्याची पुष्टी चक्क गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजलने केली आहे.

पंचायतच्या स्टारची एण्ट्री
मिर्झापूरचा तिसरा सीझन येत्या 5 जुलैला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सीरिजमध्ये नव्या कलकारांसंदर्भात काही अपडेट्सही समोर येत आहेत. आता पंचायतच्या तिसऱ्या सीझनमधील कलाकारांबद्दल अपडेट आले आहे. पंचायतमधील कलाकार जितेंद्र कुमार उर्फ सचिव जी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहेत.

कोणती भूमिका साकारणार?
जितेंद्र कुमार मिर्झापूरमध्ये कागदोपत्री कारवाईसाठी मिर्झापूरमध्ये येणार आहे. कारण त्याला कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) च्या मृत्यूबद्दल पुरावे जमा करायचे आहेत. (Mirzapur Season 3)

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

विजय वर्माच्या भूमिकेत बदल
विजय वर्माने नुकत्याच मिर्झापूरमधील आपल्या भूमिकेबद्दल काही गोष्टी उलगडल्या आहेत. विजय वर्माने म्हटले की, मिर्झापुरच्या दुसऱ्या सिझनमध्ये जुळ्या भावाची भूमिका साकारली होती. एका अभिनेत्याच्या रुपात पाहायचे झाल्यास दोन भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. यामुळे वेगळ्या गोष्टी पाहणे आणि एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी वेगळा दृष्टीकोनही मिळाला. पण तिसऱ्या सीझनमध्ये सर्वाधिक मोठे आव्हान असे की, दोघांनाही एकाच भूमिकेत साकारायचे आहे. या सीझनमध्ये हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे.


आणखी वाचा :
अभिनेत्री हिना खानला झाला कॅन्सर, पोस्ट शेअर करत दिली माहिती
जाणून घ्या एव्हरग्रीन जोडी असणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...