राजस्थान राज्यामधील दौसा जिल्ह्यात असलेले मेहंदीपूर बालाजी मंदिर एक रहस्यमय ठिकाण आहे. या मंदिराला प्रेतराज सरकार मंदिर असेही म्हटले जाते. कारण या ठिकाणी चक्क भूतांचा दरबार भरतो, अशी माहिती आहे. येथे भगवान हुनमानांची बालाजींच्या रुपात पूजा केली जाते. या मंदिरात आल्यास वाईट शक्तींपासून मुक्तता मिळते, अशी भक्तांची धारणा आहे. या मंदिरात भगवान बालाजीसमोर कुठल्याही वाईट शक्तीचा निभाव लागू शकत नाही, त्यामुळे भारतभरातून अनेक भाविक या मंदिरात वाईट शक्तींचा विनाश करण्यासाठी येतात. या मंदिराबाबत आणखीही एक वैशिष्ट आहे, एरवी कुठल्याही मंदिरात गेल्यावर तेथील प्रसाद आवर्जून आणून त्याचे वाटप करण्यात येते. मात्र मेहंदीपूर बालाजी मंदिरातील प्रसादच काय पण तेथील फुले किंवा अन्य कुठलीही वस्तू घरी आणू नये, असे भाविकांना सांगण्यात येते. कारण या वस्तूंमध्ये वाईट शक्तींचा प्रभाव असतो. त्यामुळे या मंदिरातून प्रसाद घरी आणल्यास वाईट शक्ती पुन्हा घरात प्रवेश करतात, असे सांगितले जाते. (Rajasthan)

या मंदिराबाबत अनेक गुढ कथा आहेत. त्यात भगवान बालाजींच्या डाव्या छातील एक छिद्र असल्याचे सांगितले जाते. तसेच या छिद्रातून जे पाणी येते, त्याला बालाजींचा घाम असेही म्हणतात. या मंदिरातील भगवान हनुमानजींची मूर्ती स्वयंभू आहे. त्यामुळेच भारतभरातील हनुमानांचे भक्त एकदातरी या मंदिराला भेट देतात. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर बालाजी मंदिर हे एक धार्मिक स्थळ नाही तर एक रहस्यमय ठिकाण म्हणूनही परिचित आहे. या मंदिरात आल्यावर नकारात्मक शक्तींपासून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे. (Social News)
भारतातील ठराविक मंदिरांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कडक नियम पाळले जातात, त्यापैकी एक हे मेहंदीपूर बालाजी मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी किमान आठवडाभर तरी लसूण, कांदा, मांसाहारी पदार्थ व्यर्ज करावे लागतात. तसेच अल्कोहोलचे सेवनही टाळावे लागते. या मंदिरात नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते, त्यामुळे जे भाविक येथे येतात, ते परत निघतांना मंदिराकडे वळून बघत नाहीत. असे केल्यास या नकारात्मक शक्ती पुन्हा आपल्या शरीराचा ताबा घेतात, असे सांगितले जाते. या मंदिरात भूतांचा दरबार भरतो. ही घटना पाहण्यासाठी अनेक श्रद्धाळू मंदिरात गर्दी करतात. येथे भगवान हनुमानजींसोबत, भैरवनाथ आणि प्रेतराज सरकार यांचीही पूजा केली जाते. यामुळेच जीवनातील अडथळे दूर सारले जातात, अशी धारणा आहे. इतर मंदिरात जसे वातावरण असते, त्यापेक्षा वेगळे वातावरण या मेहंदीपूरा बालाजी मंदिरात असते. येथील वातावऱण अतिशय गंभीर आणि गुढ असल्याची जाणीव भक्तांना होते. (Rajasthan)

या सर्वांमुळेच येथील प्रसाद, तिर्थ आणि फुलेही घरी नेऊ नयेत असे सांगण्यात येते. मेहंदीपूर बालाजी मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या मंदिरात ज्या तीन देवतांची पूजा केली जाते, त्या 1000 वर्ष जुन्या असल्याचे सांगितले जाते. त्यातही भगवान हनुमानाची मूर्ती ही अरावली टेकड्यांमध्ये स्वतःहून प्रकट झाल्याचे येथील पुजारी सांगतात. आज जिथे हे मंदिर आहे, तो भाग हजारो वर्षापूर्वी घनदाट अशा वृक्षांनी व्यापलेला होता. याच जंगलात भगवान बालाजींच्या रुपात हनुमान प्रकट झाले. आज जे महंत या मंदिरात पूजा करतात, त्यांच्याच पूर्वजांना ही स्वयंभू अशी भगवान बालाजींची मुर्ती दिसली. त्यांनी या ठिकाणी पूजा सुरु केली. कालांतरानं येथे भगवान बालाजींचे भव्य असे मंदिर उभारण्यात आले. (Social News)
==========
हे देखील वाचा : Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेला निलेश चव्हाण आहे तरी कोण?
Madhya Pradesh : साप चावला आणि ४७ माणसं २७९ वेळा मेली..
==========
एरवी मंदिरांमध्ये पहाटेपासून पूजा अर्चा सुरु होते. मात्र मेहंदीपूर वालाजी मंदिरातील पूजेचे नियमही वेगळे आहेत. येथे दररोज रात्री 2 वाजता, दुष्ट आत्म्यांना आणि भूतांना दूर ठेवण्यासाठी कीर्तन केले जाते. या कीर्तनात हजारो भाविक सहभागी होतात. या मंदिरात कोणात्याही व्यक्तिला नमस्कार करु नका, असाही सल्ला दिला जातो. शिवाय मंदिराच्या पुजा-याव्यतिरिक्त अन्य कोणी प्रसाद देत असेल, तर तो घेऊ नका, असेही सांगितले जाते. मेहंदीपूर बालाजी मंदिर एवढे गुढ असले तरी येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. भगवान हनुमानांचे अस्तित्व या मंदिरात जाणवत असल्याचे भाविक सांगतात. त्यामुळे या गुढ आणि रहस्यमय़ी मंदिरात कायम भाविक मोठ्या संख्येनं येतात. (Rajasthan)
सई बने
- America
- Bhairavnath
- BJP
- china
- congress
- cricket
- demons
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- evil spirits
- God
- Hanumanji
- health care
- health tips
- india
- information
- International news
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Mandir
- Marathi News
- Mehndipur Balaji Temple
- Mumbai
- Mysterious place
- Narendra Modi
- News
- Pakistan
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Pretraj Sarkar Temple.
- Rajasthan
- Social News
- Social Updates
- Temple
- temple information
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण