Home व्यक्ती विशेष Urmila Baa : आकर्षक हास्याने सगळ्यांसाठी प्रेरणा बनलेल्या उर्मिला बा यांचा प्रेरणादायी प्रवास
व्यक्ती विशेष

Urmila Baa : आकर्षक हास्याने सगळ्यांसाठी प्रेरणा बनलेल्या उर्मिला बा यांचा प्रेरणादायी प्रवास

15
Urmila Baa

आपल्याला कायमच असे वाटते की, जर आपल्याला आपले करियर घडवायचे असेल तर ते केवळ वयाच्या ३० किंवा ३५ पर्यंतच घडू शकते. त्यानंतर आपल्याकडून वेगळे असे काहीच होत नाही. आपला आत्मविश्वास, काम करायची ताकद, जिद्द कमी झाल्यासरळे वाटते. मात्र हे खरंच योग्य आहे का? पस्तिशी पार केलेले लोकं आयुष्यात त्यांचे करियर घडू शकत नाही का? (Urmila Baa)

या प्रश्नाचे उत्तर आहे, हो. नक्कीच करियर घडवण्यासाठी कधीच वयाची मर्यादा नसते. यासाठी केवळ आत्मविश्वास आणि जिद्द एवढेच पुरेसे असते. फक्त करून दाखवयाची ताकद असेल तर माणूस वयाच्या ६० मध्ये सुद्धा आपले करियर घडवू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. आपल्याला समाजात याचे अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. याचे एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सगळ्यांच्याच लाडक्या ‘बा’ अर्थात उर्मिला जमनादास आशर.(Social Media News)

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम मास्टरशेफ इंडियाच्या सातव्या पर्वामध्ये मुंबईच्या ७८ वर्षीय उर्मिला जमनादास आशर या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. उर्मिला उर्फ बा यांना मास्टर शेफ इंडियामध्ये सहभागी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर देखील त्या कमालीच्या लोकप्रिय झाल्या. सतत हसतमुख चेहरा असलेल्या उर्मिला बा यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. दुर्दैवाने हाच हसतमुख चेहरा आता कायमचा लुप्त झाला आहे. उर्मिला जन्मदास आशर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईमध्ये दुःखद निधन झाले. (Trending news)

Urmila Baa

सोशल मीडियावर त्यांच्या अकाऊंटवरून या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. ७ एप्रिल रोजी बा यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. मास्टरशेफ इंडिया या शोच्या माध्यमातून बा प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आणि जगप्रसिद्ध झाल्या. २०२० साली त्यांनी त्यांच्या नातवाच्या मदतीने ‘गुज्जू बेन दा नास्ता’ नावाचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरु केले. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती मास्टरशेफ इंडिया या शोमुळे. या शो ने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. मात्र बा यांनी कायमचा आपल्या कामाने अनेक लोकांना प्रेरणा दिली.(Top Stories)

=========

हे देखील वाचा : Breast cancer : जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आणि लक्षणं

==========

२०२० साली कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात असलेल्या उर्मिला जमनादास आशर उर्फ बा यांनी त्यांचा नातू असलेल्या हर्षच्या साथीने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरु केले. या चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी केवळ गुजराती पदार्थ करून दाखवत लोकांना विस्मरणात गेलेल्या, प्रसिद्ध असलेल्या नव्या, जुन्या अशा अनेक गुज्जू पदार्थांच्या रेसिपी लोकांना शिकवल्या. बा यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले. बा यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वयाच्या ७६ व्या सालात खूपच प्रसिद्धी मिळवली. मात्र त्यांच्यासाठी हा मार्ग अजिबातच सोपा नव्हता.(Latest Marathi News)

अनेक संकटांचा सामना करत त्या आयुष्यात पुढे चालत राहिल्या आणि त्यांनी यश मिळवले. सुरुवातीच्या काळात, बा या २०३ घरांमध्ये स्वयंपाक करायचे काम करायच्या. मात्र एक तो काळ होता आणि एक आजचा काळ आहे. ज्या बा २०३ घरांमध्ये काम करायच्या त्याच बा त्यांच्या कामामुळे, जिद्दीमुळे जगात प्रसिद्ध झाल्या. वय हे केवळ आकडा आहे, हे त्यांनी पदोपदी सिद्ध केले. (Marathi News)

उर्मिला बा यांनी आपल्या तीन मुलांना गमावले आणि या दुःखातून देखील त्या धैर्याने उभ्या राहिल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली. त्याच्या तीनही मुलांचे लहान वयातच निधन झाले. अडीच वर्षांच्या मुलीचं तिसऱ्या मजल्यावरून पडून निधनं झालं, तर दुसऱ्या मुलाचे कमी वयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तर दुसऱ्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला होता. एवढेच नाही तर त्यांच्या पतीचेही अचानक निधन झाले. आयुष्यातील चार महत्वाच्या लोकांना गमावल्यानंतर देखील हार न मानता त्यांनी पुढे जायचा निर्णय घेतला. केवळ आत्मविश्वासामुळे त्यांनी स्वत:च्या खास शैलीनं खाद्यक्षेत्रात मोठी भरारी घेतली. (Urmila baa Death)

Urmila Baa

=========

हे देखील वाचा : AC : आता एसी लावताना विजेच्या बिलाचे टेन्शन येते? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

==========

सोशल मीडियावर त्या सतत गाजत असताना मास्टरशेफ इंडिया शो त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. शोमध्ये असणारे जज विकास खन्ना, रणवीर ब्रार, गरिमा अरोरा यांनी बा यांना खूपच प्रोत्साहित केले. सोबतच त्यांच्या सोबतच्या स्पर्धकांनी देखील त्यांना कायम पाठिंबा दिला. या शोनंतर देखील त्या कायम विविध कार्यक्रमांना पाहिले जायचे. मात्र आता त्यांच्या निधनामुळे त्यांच्या सर्वच चाहत्यांना अतीव दुःख झाले आहे. कायम सगळ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या हसतमुख बा यांना मनपूर्वक आदरांजली.

Recent Posts

Related Articles

Akbar
व्यक्ती विशेष

Mughal Emperor: मुघल इतिहासातील सर्वाधिक विवाह करणारा सम्राट!

Mughal Emperor And Marriage : भारतीय इतिहासात मुघल साम्राज्य हे वैभव, सत्ता...

Premchand Roychand Jain
व्यक्ती विशेष

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजाराचा पाया रचणाऱ्या महान उद्योगपतींपैकी एक...

abdul samad khan
व्यक्ती विशेष

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान कोण होते? मुघलांशी काय होते कनेक्शन? घ्या जाणून

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान हे १८व्या शतकातील मुघल साम्राज्यातील एक...

Thailand | Top Marathi Headlines
व्यक्ती विशेष

Thailand : थायलँडमध्ये थाय मसाज देण्यासाठी डॉ. शिवगो यांनी असा लावला शोध, वाचा रंजक गोष्ट

Thailand : थायलँडमध्ये ‘थाय मसाज’ ही एक प्राचीन आणि प्रभावी उपचारपद्धत म्हणून...