Mango Leaf Benefits : उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू झाले आहेत. एका बाजूला उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होत असताना दुसऱ्या बाजूला आंबे खाण्याची मजा लुटली जात आहे. रसाळ आंबे खाणे प्रत्येकालाच आवडते. पण आंब्यासह त्याच्या पानांचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. खरंतर, आंब्याच्या पानांचा वापर जुन्या काळापासून वैद्यकिय उपचारासाठी केला जात आहे. जाणून घेऊया आंब्याचे पानांचे काही आरोग्यदायी फायदे सविस्तर…
आंब्यांच्या पानांचे फायदे
-आंब्याच्या पानानंमध्ये आयुर्वेदिक गुण असतात. जसे की, पॉलीफेनोल्स आणि टर्पेनॉइड्स. यामध्ये अशी काही पोषण तत्त्व असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय संक्रमण आजारांपासून दूर राहू शकता.
-आंब्याच्या पानांचा अर्क शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. याशिवाय मधुमेह, मेटबॉलिक सिंड्रोमसारख्या स्थितींपासूनही लांब राहू शकता.

-अंब्याच्या पानांचे सेवन केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदतमिळते. यामध्ये अँटीऑक्सीडेंट असल्याने इन्सुलिनचे उत्पादन करू शकतात. यामळे कार्बोहाइड्रेटचे अवशोषण होणे मंदावले जाते.
-आंब्याच्या पानानंचे सेवन केल्यास पचनक्रिया उत्तम रहाते. याशिवाय आंब्याची पाने पोटासाठी डिटॉक्स सारखं काम करतात. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. अल्सरसारख्या समस्या आंब्यांच्या पानांपासून दूर राहू शकतात.
=======================================================================================================
हेही वाचा :
घरच्या घरी बनवा आवळ्याचा फेस टोनर, त्वचेला येईल ग्लो
उन्हाळ्यात दररोज दही खाताय? करू नका या चुका, बिघडेल आरोग्य
=======================================================================================================
-याशिवाय अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असल्याने त्वचेला फ्री रेडिकल्समुळे होणारे नुकसान होत नाही. आंब्यांच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने कोलेजन बूस्ट होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते. एवढेच नव्हे आंब्याची पाने हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. अशातच ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Mango Leaf Benefits)
असे करा सेवन
– आंब्यांच्या पानांची चहा पिया
– आंब्याच्या पानांचे पाणी प्या
– आंब्यांच्या पानांची पावडर तयार करुन वापरु शकता