१० वी चा निकाल लागला की लगेच लगबग सुरु होते ती, ११ वीच्या ऍडमिशनची. आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये आवडत्या फिल्डमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकांची नुसती लगबग चालू असेल. राज्यभरातून यावर्षी दहावीच्या परीक्षेत १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातून यावर्षी दहावीच्या परीक्षेत १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये साधारण २० लाख ९१ हजार ३९० जागा आहेत. ११ वी ऍडमिशन प्रोसिजर वाटते तेवढी सोपी नाही. ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन ऍडमिशन फॉर्म सबमिट करावा लागतो. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी २१ मे सकाळपासून अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. (Admission)
मात्र, प्रवेशाचे अधिकृत संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. हा सर्व गोंधळ पाहून शिक्षण मंडळाने ही प्रवेश प्रक्रिया ४ दिवस पुढे ढकलली आहे. आता अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाने ही प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत. ऑनलाइन नोंदणी आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत असून पहिली यादी १० जूनला जाहीर होईल. (Marathi News)

यावर्षी शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा वेळेआधीच घेतल्या आणि निकालही मे महिन्यातच १३ मे रोजी जाहीर केले. त्यानंतर १९ मे पासून विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली होती. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी १६ मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ही नोंदणी १७ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर १९ आणि २० मे रोजी सराव सत्रे झाल्यानंतर २१ मे पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ऐनवेळी वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाले आणि ही प्रक्रिया बंद पडली. (Latest Marathi News)
मात्र अखेर संचालक डॉ. महेश पालकर यांनी सोमवार, २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे. ही प्रक्रिया https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून होईल. पहिल्या यादीत प्राधान्यक्रम दिलेल्या महाविद्यालयांपैकी एखाद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचा असेल, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पोर्टलवर ‘प्रोसीड फॉर ऍडमिशन’ हे बटण क्लिक करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. (Top Marathi Headlines)
ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, ते पुढील फेरीसाठी थांबू शकतात. पण पहिला पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे नाव आले असेल, तर त्याला त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाच आहे. समजा विद्यार्थ्याने या महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही, तर तो चौथ्या फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असेल. त्याला शेवटी सर्वांसाठी खुल्या फेरीतूनच प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 8530955564 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. (Social Update and News)

राज्यभरातील अकरावीच्या एकूण जागा
एकूण प्रवेश क्षमत्ता: २०,९१,३९०
कला शाखा: ६,७२,७५४
वाणिज्य शाखा: ५,४८,३१६
विज्ञान शाखा: ८,७०,३२८
==========
हे देखील वाचा : Donald Trump : अमेरिकेला गोल्डन डोमचा आधार !
==========
सुधारित वेळापत्रक –
२६ मे – ऑनलाइन विद्यार्थी नोंदणी आणि महाविद्यालय पसंतीक्रम सकाळी ११ ते ३ जून सायं. ६ पर्यंत
५ जून – तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
६ ते ७ जून – हरकती, सुधारणा आणि आक्षेप दाखल करणे
८ जून – गुणवत्ता यादी निश्चित करणे
९ जून – अल्पसंख्याक, इन-हाउस, व्यवस्थापन कोटा जाहीर
१० जून – पहिली यादी जाहीर आणि प्राधान्यक्रम जाहीर
११ ते १८ जून – विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक शासन निर्णय जारी केला होता. 6 मे रोजी जारी केलेल्या या निर्णयानुसार इयत्ता अकरावीचे वर्ग 11 ऑगस्टपासून चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश फार उशिराने होतो. त्यामुळे 11 ऑगस्टपूर्वी अकरावीचे वर्ग चालू करण्याची मुभा यावेळी शिक्षण विभागाने दिली आहे.
- 10th
- 10th result
- ११ वी ऍडमिशन २०२५
- ११ वी ऍडमिशन प्रक्रिया
- ११ वी ऍडमिशन वेळापत्रक
- 11th addmission
- 11th admission 2025
- 11th admission latest update
- 11th admission process
- 11th admission process 2025
- 11th admission registration 2025
- 11th admission timetable
- 11th class admission 2025
- 11th std online admission Maharashtra
- akravi pravesh update
- akravichi pravesh prakriya
- collage admission
- education
- education department news Maharashtra
- fyjc admission new date
- fyjc admission schedule
- fyjc online process
- FYJC timetable
- gajawaja education update
- latest student news Maharashtra
- maharashtra 11th admission new date
- maharashtra education update
- Maharashtra FYJC admission
- online admission portal 11th
- school admission news Maharashtra
- state government
- दहावी
- दहावी निकाल
- राज्य सरकार