प्रयागराजच्या महाकुंभनं अवघ्या जगाला भुरळ घातली आहे. महाकुंभ सुरु झाल्यापासून अगदी दोन दिवसातच अडीच करोड भाविकांनी अमृत स्नान केल्याची नोंद झाली. या महाकुंभमध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील नागरिक मोठ्या संख्येनं आले आहेत. या सर्व भाविकांना सुविधा देण्यासाठी महाकुंभ जिल्हाच तयार करण्यात आला आहे. येथील प्रशासन सर्व प्रकारच्या सुविधा आणि सुरक्षा भाविकांना देण्यासाठी तत्पर आहे. भाविकांसाठी लाखांच्या वर तंबू उभारण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी अहोरात्र भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. या सर्वाची निगा ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत आहे. यासाठी प्रयागराज आणि आसपासच्या अनेक नागरिकांना रोजगार देण्यात आला आहे. जवळपास सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून या लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून महाकुंभमधील भाविकांची वाढती गर्दी पाहता, फेब्रुवारी महिन्यानंतरंही एवढ्याच मोठ्या प्रमाणात भाविक येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नागरिकांना पुढचे काही महिने रोजगार आणि आर्थिक फायदा मिळणार आहे. (Prayagraj)

महाकुंभ सुरु झाल्यापासून एका चहा विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा चहावाला दिवसाला किती रुपये फक्त चहा विक्रीतून मिळू शकतात, याचे गणित सांगत आहे. 45 दिवसाच्या या महाकुंभात लाखभराची कमाई करता येणार असल्याचे या विक्रेत्यानं सांगितले आहे. पण फक्त चहा विक्रेतेच नाही तर अन्यही अनेक माध्यमातून हा महाकुंभ या भागातील नागरिकांना रोजगाराची मोठी संधी घेऊन आला आहे. महाकुंभ 2025 च्या तयारीसाठी उत्तरप्रदेशच्या सर्वच राज्यातील कुशल, अकुशल कारगीर मोठ्या संख्येनं प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. जवळपास सहा महिन्यापासून प्रयागराजमध्ये हे कामगार मोठ्या संख्येनं प्रयागराजमध्ये आले आहेत. याशिवाय बिहार, उत्तराखंड, हरियाणा या राज्यातूनही कामगार मोठ्या संख्येनं प्रयागराजमध्ये आले आहेत. (Social News)
प्रयागराजचा महाकुंभमेळा सुमारे 4000 हेक्टर क्षेत्रात भरला आहे. हा मेळा 25 क्षेत्रांमध्ये विभागला गेला आहे. महाकुंभमध्ये संगम नदिकाठीच करोडो भाविकांची गर्दी होते. या संगम घाटावर एकाच ठिकाणी भाविक एकत्र येऊ नयेत म्हणून अनेक घाट तयार करण्यात आले आहेत. सुमारे 41 घाट तयार करण्यात आले. त्यातील 10 घाट कायमस्वरूपी आहेत तर उर्वरित 31 तात्पुरते आहेत. हे सर्व काम गेल्या काही महिन्यापासून चालू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध झाला. प्रयागराजमध्ये रेल्वे स्थानक उभारण्यापासून ते महाकुंभसाठी पार्किंगव्यवस्थाही मोठी करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक कुशल कामगारांना काम मिळाले असून काही कामगार आपल्या कुटुंबासह या महाकुंभ नगरीमध्ये रहाण्यासाठीच आले आहेत. (Prayagraj)

महाकुंभ परिसरात एकूण 20 तात्पुरती रुग्णालये उभारण्यात आली आहेत. यामध्ये होमिओपॅथी आणि आयुर्वेद रुग्णालयांचाही समावेश आहे. या रुग्णालयातही काम करण्यासाठी मोठ्या संख्येनं कर्मचारी कामाला आहेत. रुग्णालयासारखी सुविधा महाकुंभमध्ये 24 तास प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयात तीन पाळ्यांमध्ये कामगार काम करत आहेत. तसेच स्वच्छता कर्मचा-यांचेही झाले आहे. महाकुंभमध्ये 24 तासांसाठी या स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली. महाकुंभसाठी प्रयागराजचा ‘त्रिवेणी संगम’चा काठ हा काही काळासाठी तात्पुरत्या शहरात बदलण्यात आला आहे. गेल्या वर्षापासून या शहराची रचना असावी यासाठी मान्यवर आर्केटेक्ट काम करीत आहेत. या मंडळींनी शहराची जी रचना कागदावर उमटवलेली होती, तिच कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अशा कुशल कामगारांचीच मदत घ्यावी लागते. प्रयागराजमध्ये कल्पवासासाठी येणा-यांचीही मोठी संख्या असते. या कल्पवासींना गवताच्या झोपडीत रहावे लागते. (Social News)
=====================
हे देखील वाचा : Maha Kumbh : महाकुंभ पाहून भारावले परदेशी भाविक !
Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !
=====================
या गवताच्या झोपड्या उभारण्याचे काम प्रयागराजमधील केवट समुदायाच्या लोकांना मिळाले आहे. ही सर्व मंडळी या गवताच्या झोपड्या बनवण्यात तरबेज समजली जातात. या महाकुंभसाठी ही मंडळी गेल्या काही महिन्यापासून वेगवेगळ्या आखाड्याच्या या गवताच्या झोपड्या बनवण्यात गर्क आहेत. यातून त्यांना वेतनाची सुविध उपलब्ध झाली आहे. गंगा आणि यमुना आणि गुप्त रुपात वाहणा-या नद्यांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी तात्पुरते पुल तयार आहेत. याकामातही याच कामगारांचा समावेश आहे. महाकुंभमध्ये दररोज करोडो भाविकांसाठी जेवण तयार होत आहे. यामागची तयारी करण्यातही अनेक कामगार गुंतले आहे. महाकुंभमध्ये गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या हाताला काम मिळाले आहे. महाकुंभसाठी करण्यात आलेली तयारी पुढचेही काही महिने राहिल अशी अपेक्षा या मंडळींना आहे. त्यातुन त्यांचाही आर्थिक फायदा होणार आहे. (Prayagraj)
सई बने
- America
- BJP
- china
- congress
- eknath shinde
- Entertainment
- india
- information
- International news
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण