Home गाजावाजा स्पेशल माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या भेटीचा हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का?
गाजावाजा स्पेशलमनोरंजन

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या भेटीचा हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का?

10
Madhuri Dixit | K Facts

माधुरी दिक्षित व श्रीराम नेने यांच्या लग्नाला आता अनेक वर्षे उलटून गेली आहेत. लाखो दिलो की धडकन किंवा मग धक् धक् गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत काय?

१९८८ मध्ये ‘तेजाब’ या सिनेमातून माधुरीला वेगळी ओळख मिळाली आणि त्यानंतर बॉलिवूडला मोहिनी घालण्यासाठी ती सज्ज झाली. सिनेमांत करिअर करायचं की नाही यासाठी तिने आपल्या पणजीची परवानगी घेतली होती आणि ती एक उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना असल्यामुळे अभिनयासाठीही घरातून लगेचच परवानगी मिळाली आणि तिचा सिनेमातील प्रवास सुरू झाला.

अशी झाली डॉ. श्रीराम नेनें सोबत ओळख

माधुरीला (Madhuri Dixit) तिच्या भावाने एक दिवस तातडीने अमेरिकेला बोलावले. भावाने याआधी आपल्याकडे कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट न केल्यामुळे माधुरीने त्याचं हे आमंत्रण लगेचच स्वीकारलं. सिनेमातील तारखा सांभाळून ती अमेरिकेला गेली. तिथे तिच्या भावाने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला डॉ. श्रीराम नेनेही उपस्थित होते. पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी माधुरीच्या भावाने आज पार्टीतील कोणत्या व्यक्तीला बोलावू अशी विचारणा केल्यावर तिने डॉ. नेनेंचे (Shriram Nene) नाव घेतले आणि मग अशा पद्धतीने त्यांची ओळख झाली. जवळपास ३ महिन्यांच्या डेटींगनंतर माधुरी दीक्षित आणि डॉ श्रीराम नेने यांनी लग्नाचा विचार केला.

Madhuri Dixit And Sriram Nene Make A Perfect Couple
Madhuri Dixit And Sriram Nene Make A Perfect Couple

एका इंटरव्ह्यूदरम्यान माधुरीला याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही करियरच्या उच्च शिखरावर असताना आणि बॉलीवूडमधील अग्रगण्य अभिनेत्री असताना मध्येच तुम्ही लग्नाचा विचार कसा केलात? यावर माधुरीने अत्यंत प्रामाणिक उत्तर दिले, “मी लग्नाला तयार झाले, कारण मी त्यांच्या (डॉ. नेने) प्रेमात पडले होते. पुढे तिने हे देखील सांगितले की, मिस्टर नेनेंचा प्रामाणिकपणा तिला सर्वात जास्त भावतो.

मुलाखतीदरम्यान पुढे माधुरीने स्पष्ट केले, “माझ्या आणि श्रीरामच्या स्वभावात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अगदी तंतोतंत सारख्या आहेत, तर काही गोष्टी एकमेकांच्या विरूद्ध आहेत. तरीही आम्ही कधीच एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी आम्ही एकमेकांना जसं आहे तसंच स्वीकारलं. श्रीराम जसे आहेत तसेच ते मला फार आवडतात.”

एका अहवालानुसार माधुरीची कमाई श्रीराम यांच्यापेक्षा २०० कोटींनी जास्त आहे. आपले वैयक्तिक आयुष्य सांभाळत आपल्या करीअरमध्येदेखील तिने यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. आजही सोशल मीडियावरील तिचे स्टायलिश फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे खरंच कठीण होते. माधुरी दीक्षितच्या मोहक अदांमुळे चाहते आजही घायाळ होतात. अशा या मराठमोळ्या ‘युनिव्हर्सल क्रश’ला वाढदिवसाच्या पुनःश्च शुभेच्छा!

शब्दांकन – शामल भंडारे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...