ओडिशामधील पुरी नगरी, भगवान जगन्नाथांच्या जयघोषांनी निनादून गेली आहे. भगवान जगन्नाथांची जगप्रसिद्ध रथयात्रा 27 जूनपासून सुरु होत आहे. भगवान जगन्नाथ त्यांच्या नंदीघोष रथावर स्वार होतील आणि ही रथयात्रा सुरु होईल. त्यांच्यासोबत भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा हे सुद्धा त्यांच्या रथावर स्वार होणार आहेत. 27 जून ते 8 जुलै पर्यंत हा रथयात्रेचा उत्सव पुरी येथे होणार आहे. या उत्सवासाठी जगभरातील भगवान जगन्नाथांचे भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहेत. 2024 च्या पुरी रथयात्रेत 20 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. यावर्षी या भाविकांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं विशेष व्यवस्था केली आहे.
पुरीमध्ये जगन्नाथ 27 जूनपासून रथयात्रा सुरू होत आहे. (Jagannath Temple)

भगवान जगन्नाथ त्यांच्या नंदीघोष रथावर केव्हा स्वार होणार याची लाखो भाविक प्रतीक्षा करीत आहेत. भगवान जगन्नाथ या नंदीघोष रथावर स्वार झाले की, हे लाखो भाविक रथाचे दोर ओढण्यासाठी पुढे सरसावणार आहेत. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुस-या दिवसापासून सुरु झालेला हा उत्सव पुढचे 12 दिवस साजरा होणार आहे. भगवान जगन्नाथ यांच्यासह त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा हे सुद्धा आपल्या रथावर स्वार होणार आहेत. भगवान जगन्नाथ यांचा नंदीघोष रथ, बंधू बलभद्र यांचा तलध्वज रथ आणि बहिण सुभद्रेचा दर्पदाल रथ लाखो भाविकांच्या उपस्थितीत त्यांच्या मावशीच्या घरी दाखल होईल. भगवान जगन्नाथांच्या मावशीच्या घरी, म्हणजेच गुंडीच्या मंदिरात गेल्यावर काही काळ ही रथयात्रा विराम घेईल. भगवान तिथे आपल्या भाऊ बहिणीसह पाच दिवस मुक्काम करतील. जगन्नाथ रथयात्रेतील हे धार्मिक विधी हजारो वर्षापासून केले जात आहेत. त्यासाठी शुभ मुहूर्त काढण्यात येतात. हे संपूर्ण विधी आणि कार्यक्रमांचे वेळापत्रक अनेक महिने आधी ठरवले जाते. (Social News)
दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीया तिथीला जगन्नाथ रथयात्रा सुरू होते. यावर्षी आषाढ शुक्ल द्वितीया तिथी 26 जून रोजी दुपारी 01:24 ते 27 जून रोजी सकाळी 11:19 पर्यंत आहे. अशावेळी उदयतिथीच्या आधारे मुहूर्त काढला जातो. त्यामुळे आषाढ शुक्ल द्वितीया तिथी 27 जून रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, त्यानुसार जगन्नाथ रथयात्रा 27 जूनपासून सुरू होईल. जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात अभिजित मुहूर्तवर सकाळी 11:56 ते दुपारी 12:52 पर्यंत या दरम्यान करण्यात येणार आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा हे आपल्या रथांमधून गुंडीचा मंदिरात पोहचतील. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा हे आपल्या रथावर बसतात तेव्हा पुरीचे राजे ‘छेरा पन्हारा’ विधी करतील. यातून राजे सोन्याच्या झाडूने रथयात्रा जाणार आहे, तो मार्ग स्वच्छ करतात. त्यानंतर 1 जुलै रोजी हेरा पंचमी होईल. गुंडीचा मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा हे 5 दिवस राहतात. (Jagannath Temple)

पाचव्या दिवशी देवी लक्ष्मी भगवान जगन्नाथांना भेटण्यासाठी येते. त्या दिवसाला हेरा पंचमी म्हणतात. 4 जुलै रोजी भगवान जगन्नाथांचे सायंकाळचे दर्शन होईल. गुंडीचा मंदिरात हे सायंकाळचे दर्शन आयोजित केले जाते. यामध्ये, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्राजींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. 5 जुलैपासून बहुदा यात्रा होईल. याच दिवसापासून गुंडीचा मंदिरापासून जगन्नाथ मंदिरापर्यंत रथयात्रा पुन्हा सुरू होईल. याला बहुदा यात्रा म्हणतात. या यात्रेदरम्यान, भगवान जगन्नाथांच्या रथासह अन्य दोन रथही मौसी मंदिरात थांबतात. येथे ‘पोडा पिठा’ प्रसाद म्हणून दिला जातो. हा प्रसाद घेण्यासाठीही हजारो भाविक उपस्थित असतात. 6 जुलै रोजी सुना बेशा हा धार्मिक विधी होईल. गुंडीच्या मंदिरापासून रथयात्रा निघाल्यापासून दुसऱ्या दिवशी जे धार्मिक विधी होतात, त्यांना सुन बेशा म्हटले जाते. यामध्ये भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांना सोन्याच्या अलंकारांनी सजवले जाते. (Social News)
=============
हे ही वाचा : Jagannath Temple : भगवान जगन्नाथाचा रथ या कबरीसमोर का थांबतो !
Jagannath Temple : हनुमान हे जगन्नाथ मंदिराचे रक्षक म्हणून ओळखले जातात.
============
7 जुलै रोजी अध्रा पान होईल. यामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना पिण्यासाठी आधार पान अर्पण केले जाते. अध्रा पान हे मोठ्या मातीच्या भांड्यांमध्ये पाणी, दूध, साखर, चीज आणि मसाल्यांपासून बनवलेले गोड पेय आहे. या जगन्नाथ रथयात्रेचा शेवट 8 जुलै रोजी होईल. तेव्हा निलाद्री विजया हा धार्मिक विधी होईल. यामध्ये भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांची पुरी मंदिराच्या गर्भगृहात स्थापना केली जाईल. या निलाद्री वाजया विधीनंतर जगन्नाथ रथयात्रेची सांगता होणार आहे. बारा दिवस चालणा-या या रथयात्रेत सहभागी घेण्यासाठी पुरी नगरीमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. या सर्वांनाच रथावर स्वार झालेल्या भगवान जगन्नाथांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. (Jagannath Temple)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- Balabhadra
- BJP
- brother Balabhadra's Taldhwaja chariot
- china
- congress
- donald trump
- Entertainment
- india
- information
- International news
- jagganath mandir history
- jagganath mandir information
- jagganath mandir mystery
- jagganath mandir rathayatra
- jagganath puri
- jagganath rathyatra 2025
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Lord jagannath
- Maharashtra
- Mandir
- Nandighosh chariot
- Narendra Modi
- News
- Niladri Vijaya
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- rathayatra
- sister Subhadra's Darpadal chariot
- Social News
- Social Updates
- subhadra
- Temple
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण